Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSEntertainmentINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

झाकीर हुसेन

1 Mins read

झाकीर हुसेन

वाsssगुरुssवा

सगळ्यांचे लाडके जागतिक कीर्तीचे तबलावादक,संगीतकार, पद्मभूषण झाकीर हुसेन

 

 

झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी माहीम येथे पंजाबी कुटुंबात झाला.जरी त्यांच्या कुटुंबाचे नाव कुरेशी असले तरी झाकीर यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले.तबला वादनाच्या पंजाब घराण्याच्या परंपरेचे तबला ‘ उस्ताद अल्ला रखा ‘ त्यांचे वडील. उस्ताद अल्ला रखा त्यांना वयाच्या तिसऱ्यावर्षापासून पखवाज शिकवीत असत.त्यांना त्यांचे वडील पहाटे उठवायचे आणि पहाटे वेगवेगळ्या तालांचे पठण करून गायन शिकवायचे.त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले.त्यांचे शिक्षण माहीममधील सेंट मायकेल हायस्कूलमध्ये झाले व महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये झाले.
वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच आपली कला एका मैफिलीत सादर केली.वयाच्या अकराव्या वर्षापासूनच ते जाहीर कार्यक्रममधून भाग घेऊ लागले.

वर्ष १९७० मधे प्रसिद्ध सतारवादक रविशंकर यांच्यासमवेत अमेरिका दौऱ्यावर गेले.दौरा पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी पीएच.डी. अभ्यास करण्याचा विचार केला होता.परंतु त्यावेळी ‘ उस्ताद अली अकबर खान ‘ याना तबला वादकांची गरज होती,त्यामुळे त्यांच्याबरोबर ते अमेरिकेत कार्यक्रमात सहभागी झाले.त्यानंतर त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली, वर्षाकाठी दीडशेपेक्षा जास्त मैफिली त्यांनी केल्या.लहान वयातच त्यांनी पंडित रविशंकर, उस्ताद विलायतखान,उस्ताद अली अकबर खान, पंडित हरि प्रसाद चौरसिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्हीजी जोग,पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज अश्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रमुख दिग्गजांचे बरोबर मैफिली केल्या.त्यांच्या कामगिरीमुळे तबला वादकांची किंमत या क्षेत्रात काम करणाऱ्यांना तसेच प्रेक्षकांनी कळली.

त्यापूर्वी तबलावादक म्हणजे एक मैफिलीत साथीदार एवढीच ओळख होती.उस्ताद झाकीर हुसेन यांनी त्यांच्या आवेशपूर्ण तबलावादनाने मंचावर मोठे स्थान निर्माण केले.सतार, सरोद, संतूर इत्यादि संगीत साधनाचे बरोबर त्यांच्या तबल्याची जुगलबंदीपण होऊ लागली.अमेरिका आणि युरोपमधील कामगिरीनंतर झाकीरहुसेन यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली.त्यांनी संपूर्ण भारत आणि जगातील अनेक संगीतकारांबरीबर कार्यक्रम केले.त्यांनी व्हायोलिन वादक एल. शंकर, गिटार वादक जॉन मॅक्लफ्लिन, मृदंगम वादक रामनाद राघवन आणि विनायकराम यांच्याबरोबर मैफिली केल्या.वीस वर्षांनंतर यू. श्रीनिवास, झाकीर हुसेन, टीव्ही सेल्वागनेश आणि शंकर महादेवन यांच्यासह शक्ती समूहाची स्थापना केली.

वर्ष १९९९मध्ये लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (एएफआय फेस्ट) ग्रँडज्युरी पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या ‘ वनप्रास्थाश्रम ‘ या मल्याळम चित्रपटासाठी भारतीय संगीत सल्लागार म्हणून काम केले,तसेच वर्ष २००० मध्ये इस्तंबूल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तसेच त्याच वर्षी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (भारत), आणि २००० राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (भारत)पुरस्कार मिळविले. झाकीर हुसेन, बिल लासवेलच्या ‘वर्ल्ड म्युझिक सुपरग्रुपचे एक संस्थापक सदस्य आहेत.

वर्ष १९७८ मधे झाकीर हुसेन यांनी कथक नर्तिका व शिक्षिका अँथोनिया मिन्नेकोला या इटालियन वंशाच्या महिलेशी विवाह केला,त्यांना अनीसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत.अनीसाने यूसीएलएमधून पदवी संपादन केली आहे आणि व्हिडिओ निर्मिती आणि चित्रपट निर्मितीमध्ये ती काम करीत आहे. इझाबेला मॅनहॅटनमध्ये नृत्य शिकत आहे.झाकीर हुसेन यांचे दोन भाऊ उस्ताद तौफिक कुरेशी, एक तंतुवादक आणि उस्ताद फजल कुरेशी हे देखील तबला वादक आहेत. 

माधव विध्वंस

Leave a Reply

error: Content is protected !!