Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Sardar Patel – सरदार वल्लभभाई पटेल

1 Mins read
  • Sardar Patel

Sardar Patel –  सरदार वल्लभभाई पटेल

यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

 

 

Sardar Patel – वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म एका जमिनदार परिवारामधे ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरात येथे झाला.
त्याकाळी बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह अवघ्या सोळाव्या वर्षी झाला. त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. Sardar Patel –  वल्लभभाई यांच्या पत्नी लवकरच निधन पावल्या. ज्यावेळी यांच्या निधनाची बातमी मिळाली त्यावेळी ते कोर्टाच्या कामात व्यस्त होते .ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपले कामकाज पूर्ण केले आणि कोर्टातील खटला जिंकला. त्यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी त्यांनी सर्वांना दिली. आपले संपूर्ण जीवन आपल्या मुलांसमवेत त्यांनी व्यतीत केले.

पटेलांनी आपले शिक्षण गुजराती मीडियम स्कूलमधून पूर्ण केले.नंतर इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश घेतला. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना दहावीची परीक्षा वयाच्या २२ व्या वर्षी द्यावी लागली. Sardar Patel –  वल्लभभाई पटेल अभ्यासात अत्यंत हुशार होते.

वल्लभ भाई पटेल वकिलीची प्रॅक्टिस करू लागले होते. त्यांची समज पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना मोठ्या पदावर नियुक्ती देण्यास आमंत्रित केले. परंतु Sardar Patel –  वल्लभ भाई पटेलांनी एकही प्रस्ताव स्वीकारला नाही. कारण त्यांना ब्रिटीशांचा कोणताही कायदा पसंत नव्हता .आणि ते ब्रिटीशांचे कट्टर विरोधक होते. वल्लभभाई पटेल गांधीवादी विचारांनी प्रेरित झाले होते. पुढे ते अहमदाबाद येथे यशस्वी बॅरिस्टर म्हणून काम पाहू लागले.

सोबतच ते गुजरात क्लबचे सदस्य देखील झाले .या दरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या एका व्याख्यानात भाग घेतला. त्यावेळी ते गांधीजींच्या विचारांनी फार प्रभावित झाले. महात्मा गांधी यांच्या प्रभावामुळे प्रेरित होऊन वल्लभ भाई यांनी अस्पृश्यता ,जातीय वाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज ऊठवला. समाजात पसरलेली नकारात्मकता दूर करण्याकरिता त्यांनी खूप प्रयत्न केले.

महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या Sardar Patel – वल्लभभाई पटेलांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान गुजरातमधील ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत होता. ब्रिटिशांनी लावलेले अवास्तव कर देण्यास शेतकरी समर्थ नव्हते .शेतकऱ्यांनी ब्रिटिश शासनाला करात सवलत देण्याची विनंती केली होती .परंतु शेतकऱ्यांच्या या प्रस्तावाला ब्रिटिश सरकारने धुडकावून लावले. त्यावेळी Sardar Patel –  सरदार वल्लभाई पटेल यांनी मोठ्या प्रमाणावर ‘नो टॅक्स कँपेन ‘या मोहिमेचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यास प्रोत्साहन दिले .या संघर्षामुळे ब्रिटिश शासनाला Sardar Patel – सरदार पटेलांच्या दृढ संकल्पापुढे मजबुर व्हावे लागले , आणि शेतकऱ्यांना करांमध्ये सवलत द्यावी लागली.

स्वातंत्र्यसंग्रामात Sardar Patel – सरदार वल्लभभाई पटेल यांचे हे पहिले मोठे यश मानले गेले .१९२० साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तूंचा स्वीकार केला. आणि विदेशी कपड्यांची होळी केली. याशिवाय शांततापूर्वक चालवलेल्या देशव्यापी आंदोलनात आपल्या कर्तृत्वाला ,आपल्या वक्तृत्वाने प्रभावित केले. इंग्रजांनी वाढवलेला कर न भरण्यास लोकांना प्रवृत्त केले.

१९२८ च्या सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या आंदोलनात आपल्या नेतृत्वामुळे वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिद्ध झाले. आणि बोर्डोलीचे लोक त्यांना सरदार म्हणू लागले .दिवसेंदिवस सरदार वल्लभाई पटेल यांची ख्याती वाढत चालली होती. त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमध्ये त्यांनी सतत विजय मिळवला.

Sardar Patel –  वल्लभभाई पटेल यांना अनेकदा कारागृहात जावे लागले. वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेलांनी सगळ्यात आधी भारतातील वेगवेगळ्या साम्राज्यातील राजांना आपल्या राजनैतिक दूरदर्शीपणाने संघटित केले. हैदराबादचे निजाम ,जुनागड आणि जम्मू-काश्मीरच्या नबाबाने मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शवला .त्यावेळी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर व सैन्याचा वापर करीत, राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास भाग पाडले. आपल्या राज्यांचे स्वप्न सत्यात उतरणे शक्य नसल्याची जाणीव भारतातील राज्यांना व साम राज्यांना पटेलांनी करून दिली.

वल्लभभाई पटेलांनी अशा तर्‍हेने भारती राजांना कोणत्याही युद्धा शिवाय शांततेच्या मार्गाने एकत्रित केले.या महान कार्यामुळे वल्लभभाई पटेल यांना ‘ लोहपुरुष ‘ही पदवी देण्यात आली .

Sardar Patel – वल्लभभाई पटेल हे एक राजकीय व सामाजिक नेते होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले होते.त्यामुळे त्यांना ‘सरदार’ ही पदवी दिली गेली. सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून अत्यंत आदराने गौरविले जाते.महात्मा गांधी यांच्या जवळचे सहकारी म्हणून सरदार पटेल स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्टयपूर्ण होते. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते मानले जात. १९३४ आणि १९३७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही केले.

छोडो भारत आंदोलनात ते आघाडीवर होते.वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान म्हणून कार्यरत होते.या पदावर कार्यरत असताना Sardar Patel – वल्लभभाई पटेल यांनी पाकिस्तानातून आलेल्याआणि पंजाब-दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले होते. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतता प्रस्थापित करण्याकरिता त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

भारताचा राज्यकारभार पाहण्याकरिता काँग्रेस, मुस्लीम लीग या अन्य पक्षांशी चर्चा करून इंग्रज सरकारने सप्टेंबर १९४६ साली सरकार नियुक्त केले होते. या सरकारमध्ये सरदार Sardar Patel – वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत–पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली होती. त्यानंतर हिंदू–मुस्लीम यांच्यात उसळलेल्या प्रचंड जातीय दंगलीमध्ये कणखर भूमिका घेऊन त्यांनी जातीय दंगली आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या आगळिकी विरुद्ध जोरदार इशारा दिला. हिंदू आणि मुस्लीम यांच्याशी व्यवहारवादी भूमिकेतून संवाद साधून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांच्या बोलण्यात आणि कृतीत धर्मनिरपेक्षता होती.

१९५० साली Sardar Patel – सरदार वल्लभाई पटेल यांचे स्वास्थ्य बिघडले. 15 डिसेंबर 1950 ला त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व या महात्म्याची प्राणज्योत मालवली.३१ ऑक्टोबर २०१४ साली राष्ट्रीय एकता दिवस म्हणून घोषित करण्यात आले.

 अशा या पोलादी लोहपुरूषाला Sardar Patel – जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन

 

 

Pros

  • +Sardar Patel

Cons

  • -

Leave a Reply

error: Content is protected !!