Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

bjp – भाजपची खेळी भाजपवरच बुमरँग ! 

1 Mins read

bjp भाजपची खेळी भाजपवरच बुमरँग ! 

bjp भाजपने देशात “तोडा फोडा आणि राज्य करा” ही निती वापरायला सुरवात केली आहे. ही निती त्यांनी विरोधीपक्षाचे आमदार आणि इतर पदाधिकारी फोडण्यासाठी वापरत आहेत. यासाठी ते साम, दाम, दंड, भेद या चतुःसुत्रीचा वापर करीत आहेत. नुकतेच महाराष्ट्रात “पन्नास खोके, एकदम ओके” वापरून ४० आमदार फोडण्याची किमया भाजपने साधली हे आता लपून राहिले नाही. हाच फार्मुला त्यांनी दिल्ली, गोवा व इतर राज्यात वापरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांना अपयश आले हा भाग वेगळा. जो खासदार, आमदार, पदाधिकारी यांचे (भजपचे) ऐकणार नाही त्यांच्या मागे ED बिडी लावून त्यांना हैराण करणे, त्राण देण्याचे सत्र bjp भाजपकडून अवलंबविले जात आहे. संपूर्ण देशातून विरोधीपक्ष संपवण्याचा विडा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खुलेआम उचलल्याचे त्यांनीच सांगितले आहे. यावरूनच देशात पुन्हा हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचे लक्षात येते. असो.

bjp भाजपने महाराष्ट्रातील सर्वात ताकदवान आणि ५६ वर्षाची परंपरा असेलेल्या शिवसेना पक्षाला संपविण्यासाठी सेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फोडले. यासाठी त्यांनी वरीलप्रमाणेच चतुःसुत्रीचा वापर केला. शिवसेना संपली म्हणजे महाराष्ट्रावर आपले वर्चस्व मिळविणे सोपे होईल असा डाव bjp भाजपने आखला होता. शिवाय सोबत मुंबई महानगरपालिकाही ताब्यात येईल असे स्वप्न (जागेपणी) भाजप पाहत होती. नुसते शिवसेनेचे आमदारच फोडले नाही तर १२ खासदारांसह “शिवसेना आमचीच” असा कुटील डाव ही खेळला. म्हणजे शिवसेने बरोबरच “ठाकरे” नाव संपविण्याचा कुटील डाव ही भाजपच्या सडक्या मेंदूत फिट होता. केंद्र सरकारच्या मदतीने सर्व शासकीय यंत्रणा त्यात न्यायालय, ED, CBI, निवडणूक आयोग यांच्या मार्फत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. चहुबाजुंनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे चक्रव्यूहात फसले गेले. तरीही या सर्व भडीमाराला उध्दव ठाकरे हे धिरोदत्तपणे सामोरे गेले.

एकीकडे एक एक करुन खासदार, आमदार, पदाधिकारी दबावाला बळी पडून उध्दव ठाकरे यांची साथ सोडत होते. तर दुसरीकडे न्यायालीन आणि निवडणूक आयोगाकडे लढाई लढली जात होती. त्यामुळे शिवसेना आता संपल्याचे चित्र मिडीयाच्या माध्यमातून उभे करण्याचा प्रयत्नही केला गेला. मात्र, एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे शिवसेनेचा कट्टर विरोधक संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आंबडकरी विचारसरणीचे पदाधिकारी, मु्स्लिम समाज असे समाजातील विविध घटक शिवसेनेकडे आकर्षित झाली. त्यातच अदाणी, अंबानीसारखे बडे व्यापारी उध्दव ठाकरेंच्या भेटीला गेले. संपूर्ण महाराष्ट्रातून जनतेचे जथ्थेच्या जथ्थे मातोश्रीकडे प्रस्थान करु लागले. संपूर्ण महाराष्ट्रातून उध्दव ठाकरे यांना समर्थन मिळू लागले. उध्दव ठाकरे यांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळात राज्यातील जनतेचे पालकत्व स्वीकारुन हजारोंच्या संख्येने जनतेचे प्राण वाचवून अनेकांचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचविले आहे हे जनता अजून विसरली नाही. आणि याच विश्वासार्हतेवर उध्दव ठाकरेंकडे समर्थन वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेस्तनाबूत करण्यासाठी निघालेल्या भाजपला हा फार मोठा धक्का बसला असून अंधेरी पोट निवडणूकीतून भाजपला अक्षरशः माघार घ्यावी लागली आहे. त्यातच संपूर्ण देशातून उध्दव ठाकरेंना सहानुभूती मिळत असून देशातील सर्व विरोधीपक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे देशाचे नेतृत्व म्हणून पाहत आहे आणि हीच bjp भाजपसाठी चिंतेची बाब आहे. उध्दव ठाकरे यांच्याकडे वाढते समर्थन असेच राहिले तर मुंबई महानगरपालिका तर हातची जाईलच शिवाय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्यास २०२४ च्या लोकसभेत bjp भाजपला फार मोठा झटका बसू शकतो. तसेच देशातील सर्व विरोधीपक्षांनी मिळून देशाचे नेतृत्व करण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या चांगल्या छबीचा फायदा घेऊन दुसऱ्या धर्माला न दुखावणारा हिंदुत्व आणि देशाचा विकास या मुद्यांना महत्त्व देऊन उध्दव ठाकरे यांचे नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुढे केले तर भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरु शकते. शिवसेना संपवायला निघालेल्या भाजपने टाकलेला डाव हा त्यांच्यासाठीच बुमरँग होऊन पलटवार होण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात स्वतःच गाडले जाण्याची भिती bjp भाजपला वाटू लागली असल्यास आश्चर्य वाटायला नको. १ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाची महत्त्वाची सुनावणी आणि असे गट तट भविष्यात कधीच पुढे यशस्वी होत नाही हा इतिहास पाहता bjp भाजपसाठी ही चिंतेचीच बाब होय.

 

 

महेंद्र कुंभारे

Pros

  • +bjp - भाजपची खेळी भाजपवरच बुमरँग

Cons

  • -

Leave a Reply

error: Content is protected !!