Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Bharat Jodo Yatra – एक होऊ या चला रे..!’

1 Mins read
  • Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra – एक होऊ या चला रे..!’

 

 

लढाई केवळ ’राहूल-सोनिया’ यांची नाही !
’भीष्म, कर्ण अन् पांडव सारे

ज्ञानेश वाकुडकर

स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट कालखंडातून आपला देश आता जातो आहे. सामाजिक, राजकीय, नैतिक अधःपतन आज शिखरावर पोचले आहे. एका व्यक्तीच्या विकृतीमुळे सारा देश लुळा पांगळा होऊन पडला आहे. विरोधकांना बर्बाद करण्यासाठी वाटेल तसे खोटे नाटे आरोप लावणे, बदनामी करणे, जेलमध्ये टाकणे, वेळप्रसंगी खून करणे ह्या साऱ्या गोष्टी आता सत्ताधाऱ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा भाग झालेल्या आहेत. त्यातच त्यांना पराक्रम वाटतो. ही अशी रानटी अवस्था गेल्या आठ वर्षांत आपल्या देशात अस्तित्वात आली आहे.

भाजपची विचारधारा कधीही देशाच्या हिताची नव्हती. संघाबद्दल तर या बाबतीत बोलायलाच नको. मुळात त्यांच्याकडे विधायक असा विचारच नाही. विकृती आणि विध्वंस हाच त्यांचा मुख्य अजेंडा आहे.

Bharat Jodo Yatra – भारतीय मतदार भोळा आहे. धार्मिक आहे. अंधश्रद्धाळू आहे. जातीपातीत विखुरला आहे. विवेकाचा फारसा वापर करत नाही. वैचारिक चळवळीमध्ये देखिल बऱ्याच प्रमाणात गोंधळ आहे. सामाजिक चळवळी विखुरलेल्या आहेत. त्यांना राजकीय आकलन नाही. राजकरण म्हणजे काहीतरी भयंकर पाप आहे, अशा प्रकारचा आत्मघाती विचार करणारे बरेच विचारवंत पाहिले, की परिस्थिती किती वाईट आहे, याची कल्पना येते. स्वतःला सभ्य समजणारे लोकच राजकीय भूमिका घेण्याचे टाळतात. नरो वा कुंजरो वा.. अशा त्यांच्या भूमिकेमुळे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत.

Bharat Jodo Yatra – भारतीय समाजाचे योग्य प्रकारे राजकीय प्रबोधन झालेले नाही, म्हणून असल्या दिवाळखोर लोकांच्या हातात सत्ता सोपविण्याचा अपराध आम्ही करत आलो. बंडलबाज, जुमले बाज, बलात्कारी, डाकू, आतंकवादी अशा लोकांना तिकीट देणारे पक्ष आणि निवडून देणारे मतदार सुध्दा आपल्याकडे आहेत. तेच पाप आता देशाच्या मुळावर उठलेलं आहे. चुका आपण केल्या, खड्डयात आपण स्वतःहून पडलो, त्याची किंमत आपण मोजत आहोतच. पण त्यातून बाहेर निघण्यासाठी देखिल आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. निकराची लढाई लढावी लागणार आहे.

Bharat Jodo Yatra – २०२४ ची निवडणूक आपल्याला आपल्यासाठी लढायची आहे. देशासाठी लढायची आहे. ही लढाई काही एकट्या राहूल गांधींची नाही, सोनिया गांधींची नाही किंवा प्रियंका गांधीं यांचीही नाही. ही लढाई तुमची स्वतःची आहे. नरेंद्र मोदी यांना सत्तेमधून बाहेर काढणं, ही तुमची गरज आहे. नरेन्द्र मोदी यांचा अनागोंदी कारभार विरुध्द सारा देश अशी ही निवडणूक आहे. भाजपाची विकृती, दंडेली विरुद्ध सारा देश अशी ही लढाई आहे. मोदी – शहा विरूद्ध थेट तुम्ही – आम्ही अशीच लढाई आहे. एवढं लक्षात ठेवूनच आपल्याला लढाईची तयारी करावी लागेल. राहूल गांधींचं काय होईल, सोनिया गांधींचं काय होईल, काँगेस सत्तेत येईल की नाही, याचा विचार करण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीत भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही याच्यासाठी प्राणपणाने लढा. काही चुका झाल्या असतीलही पण भाजपाला टक्कर देण्याची ताकद फक्त काँगेस पक्षातच आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. भाजपानंतर काँग्रेस हाच राष्ट्रीय पातळीवर विस्तार असलेला एकमेव पक्ष आहे. अशावेळी प्रादेशिक पक्षांनी लोकसभेसाठी काँग्रेविरोधात भूमिका घेणे योग्य होणार नाही. याची जाणिव प्रादेशिक पक्ष व त्यांच्या नेत्यांना जनतेनेच करून द्यायला हवी.

आपल्यातलेच जे काही लोक भाजपाच्या टोळीत स्वार्थापोटी म्हणा किंवा कळत नकळत म्हणा सामील झाले असतील. त्यांच्याशीही बोला. त्यांनाही त्यांच्या चुकांची जाणिव करून द्या. वेळ प्रसंगी कठोर व्हा. ज्या ज्या चुकीच्या पक्षात चांगले लोक अडकून पडले असतिल, त्यांनी कौरवांची बाजू सोडून सत्याच्या, न्यायाच्या, लोकशाहीच्या बाजूने आले पाहिजे, ही काळाची गरज आहे. देश आणि लोकशाही वाचविण्याची ही शेवटची संधी आहे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

• त्यांच्याकडे इव्हीएम आहे. जोपर्यंत इव्हीएम तोपर्यंत त्यांना हरवणे शक्य नाही’ असा भ्रम काही लोक पसरवतात. या भ्रमातून आधी बाहेर या. अपवादात्मक ठिकाणी गडबड होऊ शकते. पण सरसकट हॅकिंग करणे शक्य नाही. तशी गडबड तर बॅलेट पेपरवर निवडणूक झाली तरीही होते. त्यामुळे इव्हीएमची भीती मनातून काढून टाका. (मात्र बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे, याबद्दल संशय नाही). पण मोदी सरकार ते बदलणार नाही. त्यामुळे मागणी करत रहा, पण भीती आणि न्यूनगंड मनातून काढून टाका.

• भाजपामध्ये देखिल मोठ्या प्रमाणात भांडणे सुरू झालेली आहेत. गडकरी, फडणवीस, राजनाथ सिंग, योगी आदित्यनाथ हे मोदींच्या विरोधात आहेत. खुद्द संघ आणि मोहन भागवत देखिल मोदी यांच्यावर नाराज आहेत, हे निश्चित समजा. इतरासारखी त्यांच्यातली भांडणं बाहेर दिसत नसली तरी मोदींचा गेम करण्यासाठी सारे टपून बसले आहेत. त्यांचे नियोजन सुरू झाले आहे. त्यामुळे ’त्यांच्यात भांडणे होऊच शकत नाहीत, ते सारे एक आहेत’ असला हेका धरून बसू नका.

• त्यांचे संघटन मजबूत आहे. गावागावात त्यांचे कार्यकर्ते आहेत. सर्व यंत्रणेवर त्यांचा कब्जा आहे, त्यामुळे काहीही झाले तरी आपण त्यांना हरवू शकत नाही’ असाही काही लोकांचा आवडता युक्तिवाद असतो. हे रडगाणं बंद करा. त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. पण तुमच्या अशा रडक्या आणि नकारात्मक भूमिकेमुळे काठावरचे लोक लढण्याची हिम्मत सोडतात. इच्छा नसतानाही त्यांच्या बाजूने वळतात.

• त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. सत्ता आहे. दारू आहे. आपण त्यांच्या समोर टिकू शकत नाही’ या भ्रमातून बाहेर या. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, याबद्दल वाद नाही. ते हवी तेवढी दारू पाजू शकतात, मटण चारू शकतात हेही खरं. पण केवळ दारू, मटण आणि पैसा यांच्या भरवश्यावर निवडणुका जिंकता आल्या असत्या, तर दारू सम्राट विजय माल्या यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली नसती. त्यांच्याकडे पैशाचीही कमी नव्हती आणि दारूचे तर कारखानेच होते. त्यामुळे नकारात्मक विचार करू नका. स्वतःपासून सुरूवात करा. मी कोणत्याही परिस्थितीत धर्मांध शक्तींना मतदान करणार नाही, असा निर्धार करा. तशी शपथ घ्या. हे तुमच्यासाठी, तुमच्या घरादारासाठी, तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आवश्यक आहे.

• आपल्या अवती भवतीचे लोक शांत बसलेले आहेत, ते काहीच करत नाहीत, खुद्द काँग्रेसचे लोक देखिल शांत बसल्यासारखे दिसतात, भाजपाला घाबरलेले दिसतात, अशावेळी आपण काय करू शकतो? आपली एवढी ताकद थोडीच आहे?’ असला दळभद्री विचार मनात येऊ देऊ नका. देशाला वणवा लागला आहे. अशावेळी ’इतरांनी समोर झालं पाहिजे, तो श्रीमंत आहे, तो सिनियर आहे, तो नेता आहे, मी उगाच कशाला करू?’ असला अविचार या क्षणी चुकूनही मनात येऊ देऊ नका. गावाला आग लागली असेल, तर विझवण्यासाठी सरपंच किंवा पोलिस पाटलानेच पुढं झालं पाहिजे असं नाही. ते त्याचं कर्तव्य असलं, तरी तो येत नसेल तर त्याला टांग मारून पुढे जा. त्याची वाट बघत बसू नका. उद्या तुम्हीही नेते होऊ शकता. ही संधी सोडू नका.

तात्पर्य, राहूल गांधी यांनी स्वतः Bharat Jodo Yatra – रणशिंग फुंकले आहे. सारा देश त्यांच्या बाजूने उभा राहतो आहे. आपणही या Bharat Jodo Yatra – ऐतिहासिक लढाईत सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे. तुम्ही कुठेही असा, कुणीही असा, जिवाच्या आकांताने ह्या लढाईत सहभागी होणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

 

 

ज्ञानेश वाकुडकर

Leave a Reply

error: Content is protected !!