Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

Pathhe bapurao – पठ्ठे बापूराव

1 Mins read
  • पठ्ठे बापूराव

Pathhe bapurao – पठ्ठे बापूराव

ज्यांच्या साहित्यावर अनेकांनी पी. एच. डी. केली असे तमाशा क्षेत्रातील भूषण
Pathhe bapurao – पठ्ठे बापूराव यांचे आज पुण्यस्मरण

Pathhe bapurao – पठ्ठेबापूराव यांचे मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी (११ नोव्हेंबर १८६६-२२ डिसेंबर १९४५). जन्म हरणाक्ष रेठरे (तालुका वाळवे, जिल्हा सागंली) ह्या गावी. शिक्षण इंग्रजी चार-पाच इयत्तांपर्यंत. बापूरावांकडे कुलकर्णीपणाची वृत्ती होती. बडवे घराण्यातील सरस्वती नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झालेला होता; परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला.
पठ्ठे बापूराव तहसील कचेरीत कारकून होते त्यांचेकडे एक बाई दस्त लिहीणेसाठी आली .

तिचा दस्त राहिला बाजूला तिच्याकडे बघून त्याना कविता सुचली.
तीळ शोभे गोरा लाल तुझी नथनी झुबकेदार !!

आणि त्यांनी त्या ओळी दस्तावर लिहिल्या आणि कागद साहेबा पुढे तसेच गेले पुढे काय झाले याची कल्पना तुम्हास आली असेलच .
गायक संगीतकार कवी शाहीर अश्या सर्वच भूमिका ते पार पडत होते . मुंबईच्या कामाठीपुऱ्यात त्यांचे वास्तव्य असलेल्या भागातील रस्त्यास त्यांचे नाव देणेत आले आहे.

ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ऐकून ऐकून त्यांनी त्यांतही बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` अशी लोकप्रियता मिळाली. श्रीधरच्या शिक्षकांनी शिफारस करून त्याचे नाव औंध सरकारांना कळविले. त्याची दखल घेऊन औंधच्या राजांनी श्रीधरला आपल्याकडे बोलावून घेतले. श्रीधरचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. पुढे त्याच्या १६व्या वर्षी राणीसाहेबांनी श्रीधरला बडोद्यास नेले. तेथे ते संस्कृत भाषा शिकले. त्याबरोबरच त्याने कलाभुवन या संस्थेत यंत्र दुरुस्तीचे शिक्षणही घेतले व नोकरीही केली. दुर्दैवाने श्रीधर अवघ्या सतरा वर्षे वयाचे असताना त्याचे आई-वडील निवर्तले. शेवटी बडोद्याची नोकरी सोडून श्रीधर परत आले .

स्वतःचा फड उभारून त्यात स्वरचित लावण्या व कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले. त्यांच्या फडात पवळा नावाची, महार जातीची एक सुंदर स्त्री होती. तिच्यावर त्यांचे अतोनात प्रेम होते. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इ. विपुल लावण्या रचिल्या. त्यांतील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत (१९५८) तथापि त्यांची बरीचशी रचना आजही अनुपलब्ध आहे. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानतात. Pathhe bapurao – बापूरावांच्या आयुष्यातून पवळा निघून गेल्यानंतर त्यांचा तमाशाचा व्यवसाय हळूहळू ढासळत गेला.

एकेकाळी मुंबईच्या एल्फिन्‍स्टन थिएटरवर पवळा – पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावण्यात आल्याचा उल्लेख तमाशा इतिहासामध्ये सांगितला जातो. त्याकाळी दोन आण्याच्या तिकिटावर दररोज चारशे रुपयांचा गल्ला जमत असे. असे नामदेव व्हटकरांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.शेवटी शेवटी तर ते खूपच विपन्न अवस्थेमध्ये होते.’कली युगाचा ऐका दाखला ! पठ्ठे बापूराव भुलला पवळिला ` असे ठामपणे सांगणारा हा शाहीर हलाखीत दिवस काढू लागला. त्यांच्याच तमाशात काम करणाऱ्या `ताई परिंचेकर’ ह्या बाईने त्यांना शेवटपर्यंत सांभाळले. या श्रेष्ठ कवीने २२ डिसेंबर १९४५ रोजी आपली इहलोकीची यात्रा संपविली. हे शाहीर सांगली जिल्ह्याचे भूषण होते.

गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा. श्रीधरांच्या कानावर त्या वाड्यातल्या तमाशाचे सूर येत. पण ब्राह्मण आणि कुलकर्णीपद, त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरून तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनि घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !!’ ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन` हा संकल्प करूनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागले. बापूरावांचे स्वतःचे काव्य, योग्य साथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा होता होता Pathhe bapurao – `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले.

` दोन लक्ष आम्ही केली लावणी केवढी म्हणावी मात बडी ` असा स्वतःच्या काव्य लेखनाचा निर्देश करणारा हा शाहीर, मुंबईत आला, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुलवडकरांच्या फडात पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. ती आधीच ’नामचंद पवळा’ म्हणून प्रसिद्ध होती. Pathhe bapurao – बापूरावांची काव्यप्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन्‌ पवळाबाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली. बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरली. १९०८-०९ साली छत्रपती शाहू महाराजांसमोर `’मिठाराणी’चा वग पठ्ठे बापूरावांनी सादर केला.

आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
धन्य शारदा ब्रह्म नायका, घेऊन येईल रूद्रविणा
साही शास्‍त्रांचा मंत्र अस्‍त्रांचा, दाविल यंत्र खुणाखुणा
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
सद्‌गुरू माझा स्वामी जगद्‌गुरू, मेरूवरचा धुरू आणाआणा
ब्रम्हांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणाम्हणा
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना
माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुनाचुना
पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुनाजुना
नाहीतर रंग पुन्हा सुनासुना

Leave a Reply

error: Content is protected !!