Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSEntertainmentINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

संगीतातील वसंतऋतू – कै. वसंत.देसाई

1 Mins read
  • संगीतातील वसंतऋतू - कै. वसंत.देसाई

संगीतातील वसंतऋतू – कै. वसंत.देसाई

संगीतातील वसंतऋतू अर्थातच कै. वसंत.देसाई यांचे आज पुण्यस्मरण ( २२ डिसेंबर १९७५)

“दो आँखे बारह हाथ’, ’झनक झनक पायल बाजे’, ’गुँज उठी शहनाई’ ’राम जोशी’, ’अमर भूपाळी’,आदी गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन करणारे वसंत देसाई यांची आठवण रसिकांना कायम राहील . त्यांचा अंत लिफ्टमध्ये अडकून झाला .

चित्रपट संगीतात देसाईंनी आणलेल्या अनवटमिश्र रागांचा, रागदारी संगीताचा चित्रपटातील समूहगानासाठी वापर करण्याच्या प्रयोगाचा आणि अनेक अभिजात गायक-वादकांना उपयोजित संगीताकडे वळवण्याच्या वसंत देसाईंयांनी वळविले ..

जुन्या जमान्यातले दिग्गज गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे ‘मियाँ की मल्हार’ हा राग लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. ज्या काळात तबकडय़ा नुकत्याच बाजारात येऊ लागल्या होत्या. त्या काळात वझेबुवांनी ‘बोले रे पपीहरा’ ही ‘मियाँमल्हार’ रागातली रचना ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने प्रसृत केली. वझेबुवांच्या या ध्वनिमुद्रिकेत खटका, गमक आणि मीड हे रागदारी संगीतात अत्यावश्यक समजले गेलेले आवाजाचे लगाव आहेत आणि त्यातूनच ‘मियाँमल्हार’ रागाचं रूप अधिकाधिक खुलत जातं. ही रचना चित्रपटगीताच्या रूपाने जनप्रिय करण्याचं श्रेय मात्र वसंत देसाईंना द्यायला हवं.

‘गुड्डी’ या चित्रपटासाठी वाणी जयराम यांच्या आवाजात देसाईंनी ती स्वरबद्ध केली. नाही म्हटलं तरी वझेबुवांची रचना आणि तिची लोकप्रियता रागदारी संगीताच्या श्रोतृवर्गापर्यंतच मर्यादित होती. वसंत देसाईंमुळे ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाला वसंत देसाईंनी संगीत दिलं त्यातून ‘कलावती’ हा कर्नाटक संगीतातला राग महाराष्ट्राला परिचित झाला. प्रसाद सावकारांच्या खडय़ा आवाजातील ‘जय गंगे भागीरथी’ हे पद वास्तविक ‘कलावती’ आणि ‘बसंत’ या दोन रागांच्या मिश्रणातून वसंतरावांनी निर्माण केले आहे. परंतु त्यातला अधिक लक्षात रहातो तो राग ‘कलावती’. त्यानंतर हा राग महाराष्ट्राच्या मातीत रुळला आणि भावगीतांमधूनही तो प्रकट होऊ लागला.

‘स्वयंवर झाले सीतेचे’ या चित्रपटासाठी त्यांनी भीमसेन जोशींच्या आवाजात ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ हे गीत गाऊन घेतले होते. हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले आणि रागदारीचा गंधही नसणारा श्रोता ते आपुलकीने गुणगुणत असे. वास्तविक हे गाणे ‘िहडोल बहार’ या रागावर आधारित आहे. ‘िहडोल’ हा मुळात कठीण मानण्यात येणारा राग आहे. कारण त्यात फक्त चार स्वर लागतात. त्यात ‘बहार’ मिसळून हा राग जुन्या काळात उस्तादांनी बनवला. भीमसेन जोशी हे सिद्ध रागांचे बादशहा होते. त्यांच्या उमेदीच्या काळात तर ते सहसा ‘मिश्र’ अथवा ‘अछोप’ रागांच्या वाटेला जात नसत. पण वसंत दसाईंनी हे गाणं त्यांच्याकडून गाऊन घेतले आणि ते जनमानसात थेट जाऊन बसले.

‘देव दीनाघरी धावला’ या नाटकासाठी वसंत देसाईंनी कुमार गंधर्वाकडून ‘उठी उठी गोपाळा’ ही भूपाळी गाऊन घेतली. ‘अमरभूपाळी’ या मराठी चित्रपटातली ‘घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांनी गायली होती. सुमारे साठ वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रित झालेली ही भूपाळी आजही तितक्याच भक्तिभावाने आणि चवीने ऐकली जाते. ‘भूपाळी’ म्हणजे ‘घनश्याम सुंदरा’ असे जणू समीकरणच बनले आहे. तरीही याच संगीत दिग्दर्शकाने रचलेल्या ‘उठी उठी गोपाळा’ या भूपाळीची लज्जत काही औरच म्हटली पाहिजे. वसंत दसाईंनी भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्वाप्रमाणेच अमीर खान या रागदारी संगीताच्या क्षेत्रातल्या महान कलाकाराच्या आवाजाचा उपयोग आपल्या संगीताची शान वाढविण्यासाठी केला.

‘झनक झनक पायल बाजे’चे बहुचर्चित शीर्षक गीत अमीर खान खाँसाहेबांनी गायले आहे. मुळात हे गाणे अमीर खान खाँसाहेबांच्या मंद्र सप्तकात चनीत विहार करणार्या आवाजाला अनुरूप अशा ‘दरबारी’ रागात ध्वनिमुद्रित झाले होते. व्ही. शांताराम वगळता सर्वाना ते अतिशय पसंत पडले होते. पण शांतारामांचे मत लक्षात घेऊन वसंतरावांनी ते पुन्हा ध्वनिमुद्रित करायचे ठरविले. मात्र यावेळी ‘दरबारी’ मंद्रप्रधान रागाऐवजी ‘अडाणा’ हा उत्तरांगप्रधान राग निवडला आणि अमीर खान खाँसाहेबांनी जलद तानांची बरसात करून या गीताचे सोने केले.

दिग्गज गायकांप्रमाणे अत्यंत प्रतिभावान वादकांनाही त्यांनी आपल्या संचात गोवले. ‘गूंज उठी शहनाई’मधून बिस्मिल्ला खान खाँसाहेबांची शहनाई अक्षरश घराघरात पोचली. त्यांचे वादन समारोहामधून होत असे तेव्हा सामान्य श्रोते ‘गूंज उठी’ची फर्माईश करीत आणि खाँसाहेबही ती मान्य करीत असत. सतारनवाझ अब्दुल हलीम जाफर खान यांनीही ‘झनक झनक’ च्या पाश्र्वसंगीतातला संपन्न करण्यात मोठी भूमिका बजावली. या चित्रपटाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले होते. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी खेळानिमित्ताने ‘लिबर्टी’ चित्रपटागृहात हलीम जाफर खान यांचे सतारवादन अहमदजान थिरकवाखाँसाहेबांच्या तबला संगतीसह आयोजित करण्यात आले होते असे जाणकार सांगतात. शिवकुमार शर्मा आणि सामताप्रसाद हे वादकही ‘झनक’मुळे प्रथम चमकले. 

संगीतकार – वसंत देसाई संगीतसंपदा

आई म्हणोनी कोणी आईस ** * ** आज आपुल्या प्रथम प्रीतिचा ** *** ** आज गूज सांगते तुला ** ** * इये मराठीचिये नगरी ** ** उठि उठि गोपाला ** एकवार तरी राम दिसावा ** * * ** कशि नाचे छमाछ्म् * * *** कशी झोकात चालली * * ** किती पांडुरंगा वाहू *** * कुंजात मधुप गुंजारव * * ** कृष्ण माझी माता * * ** कृष्णा कशी रे लागली * * ** गळ्यात घालुनी गळा ** * ** गुलजार गुलछडी नटून मी * ** * गोल तुझ्या शरीराचा * *** घडीघडी अरे मनमोहना * * * * घनदाट रानी वाहे ** * * घनश्याम सुंदरा श्रीधरा ** ** घेऊन मैफलीचा रात्रीतला *** *** छडी लागे छमछम * * * * जय गंगे भागीरथी * * ** जय जय कुंजविहारी * * * जय जय रमारमण श्रीरंग * * *-* जय जय हो महाराष्ट्राचा * * ***** जाण आहे आपणांसी मीजिंकू किंवा मरू * * ती सुंदरा गिरिजा ** * तुझीमाझी प्रीत एकदा * ** तुझ्या प्रीतीचे दु:ख मला * * तू पाक सूरत कामिना * * ** तू सुंदर चाफेकळी * ** देव जरी मज कधी भेटला * * * ** देवा तुझे किती सुंदर * * देश हा देव असे माझा * * ** देह देवाचे मंदिर * * दैव जाणिले कुणी * * दो दिवसांची तनु ही ** * धाव-पाव सावळे विठाई * ** ** * नको दूर देशी जाऊ * * नयन तुझे जादुगार ** ** नरजन्मामधिं नरा * ** * ** नसे हा छंद भला * * * ** नारायणा रमा रमणा **** ** *** निघाले असतिल राजकुमार * ** ** निराकार ओंकार साकार ** * ** नीज नीज माझ्या बाळा ** ** पाहुनी प्यारभरी मुसकान * ** * प्रेमपिसें भरलें अंगीं ** बदलती नभाचे रंग कसे *** ** * बलसागर भारत होवो *** ** भरजरी ग पीतांबर *** * ** भरे मनात सुंदरा * ** ** मथुरेला कृष्ण निघाला ** * ** मदनाची मंजिरी साजिरी *** * * मनीं वसे जे स्वप्नीं दिसे * * * मेरी झांसी नही दूंगी * * मंगल देशा पवित्र ** * ** या कोकणात आता * ** *** या बाइ या * * * या बालांनो या रे या * ** * * या रे या सुजन * * * याल कधी हो घरी ** * * योगी पावन मनाचा ** *** रम्य ही स्वर्गाहून लंका ** ** रात्रंदिन आह्मां युद्धाचा ** *** लटपट लटपट तुझं चालणं ** ** * *** विश्वनाट्य सूत्रधार * ** ** शपथ या बोटांची ** * * शिव-शक्तिचा अटीतटीचा -** *** शंकरा करुणाकरा *** **** सदैव सैनिका पुढेच ** ** सप्तशसूर झंकारित बोले * ** सावज माझं गवसलं ** * **** सावन घन गरजे बजाये ** * ** ** सुखाचें हें सुख श्रीहरि *
सूरगंगा मंगला ** *** सांगा मुकुंद कुणि हा ** * सुंदरा मनामध्ये भरली ** *** स्ना न करिती लोचने * * * हटातटाने पटा रंगवुनि *-* ** हसले आधी कुणी ** ** हा शब्द नवा * * ** हे चि येळ देवा * ** हेच ते ग तेच हे ते * हेच ते चरण अनंताचे ** *** होणार स्वयंवर तुझे * *** ऋणानुबंधांच्या जिथून”

संकलन माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!