Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

शिक्षणा विषय तळमळ 

1 Mins read
  • education india

शिक्षणा विषय तळमळ 

 

 

महात्मा फुले यांनी शाळा सुरू करण्यासाठी कोणाकडेही मदत मागितली नाही .फुले हे त्या काळातील अत्यंत श्रीमंत व्यक्ती होते. स्वतःचे पैसे खर्च करून भिडेवाडा भाड्याने घेऊन शाळा सुरू केल्यामुळे स्त्रिया शाळेत जाऊ शकल्या. महात्मा फुले यांनी जेव्हा मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना त्यांच्या सर्व मित्रांनी मदत केली. त्यांनी हात पसरून कोणाकडेही मदत मागितले नाहीत. फुले यांचे वडील फुलांचे व्यापारी होते म्हणून ते महात्मा फुले यांना शिकवू शकले व इतरांसाठी अत्यंत तळमळीने शैक्षणिक कार्य करू शकले.

रेवेन्यू कमिशनर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या शाळेला सहा एकर जमीन व त्याकाळी पाच हजार रुपये देणगी दिली होती.या रीव्हस यांच्या विषयी महात्मा जोतिबा फुले म्हणतात रेवेन्यू कमिशनर साहेब यांनी जी मदत केली आहे ती मी कधीही विसरणार नाही.त्यांनी द्रव्याद्वारेच मदत केली नाही तर आपला महत्त्वाचा काम धंदा सांभाळून त्या अतिशुद्रांच्या शाळेत वरचेवर येऊन मुलांची विद्येमध्ये किती गती झाली याची चौकशी केली. मुलांना विद्या शिकविण्या ऐवजी उत्तेजन द्यावे म्हणून ते फार झटत. त्यांचे उपकार अतिशुद्रांच्या मुलांच्या हाडांमध्ये खेळले आहे .मुलांनी आपल्या कातडीचे जोडे करून त्यांच्या पायात घातले तरी ते त्यांचे उतराई होणार नाहीत मी त्यांचे फार आभार मानतो.

जर तुम्ही तुमच्या शिवाजी कॉलेजला माझे नाव देत असाल तर तुम्हाला २ लाखाची देणगी देतो, ” खानदेशातील एका धनाढ्य माणसाने कर्मवीर अण्णांना निरोप पाठवला. रयत शिक्षण संस्था त्यावेळी प्रचंड अडचणीत होती, पैशाची अत्यंत निकड होती, मुलांची शिक्षणं, त्याचं जेवणखाण बरेच प्रश्न मार्गी लागले असते, इतकी त्या दोन लाखांची त्यावेळी किंमत होती. पण त्याक्षणी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बाणेदार उत्तर पाठवले,
” एक वेळ जन्मदात्या वडलांचे नाव बदलेन पण महाविद्यालयाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अभिनेते दिलीप कुमार यांची ऐतहासिक भेट !

 

स्थळ – अशोक हॉटेल – औरंगाबाद.

घटना क्रं.1.

दिलीपकुमार –
आपण बांधत असलेल्या मिलिंद कॉलेजसाठी मी आपणास काही रक्कम देणगी म्हणून देऊ इच्छितो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर –
तुमच्या सिनेमा सृष्टीतील लोकांना चारित्र्य नाही. त्यामुळे मी तुमची देणगी स्वीकारून माझ्या विध्यार्थ्यांना तुमचा आदर्श देऊ इच्छित नाही. त्यामुळे मी तुमची देणगी स्वीकारू शकत नाही.
खास बाब –
माईसाहेब आणी बाळू कबीर ( सविता कबीरांचा भाऊ ) या दोघांचीही इच्छा होती की, डॉ. बाबासाहेबांनी दिलीप कुमारांची देणगी स्वीकारायला हवी होती.
बाळू कबीर –
आपण दिलीप कुमार यांनी देऊ केलेली रक्कम स्विकारायला पाहिजे होती.
डॉ. बाबासाहेब –
तू मूर्ख आहेस, मी या देणगीसाठी माझ्या तत्वासोबत तडजोड करू शकत नाही मग भले ही माझे कॉलेज बंद पडलं तरी चालेल.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या सहवासात.
डॉ. सविता आंबेडकर.

घटना क्रं.2.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी पट्ठे बापूराव.
भेटीची तारीख –
10 सप्टेंबर 1927, मुबंई.
पट्ठे बापूराव –
बॅरिस्टर, बाबासाहेब मी तुह्माला पूर्ण चार खेळाचे पैसे मदत म्हणून देण्यास आलो आहे. आपण माझ्या मदतीचा स्वीकार करावा.
डॉ. बाबासाहेब –
कलेच्या नावाखाली बायका नाचविणाऱ्या या माणसाचा पैसा माझ्या उदात्त कार्यास नको असे बोलून त्यांना जाण्यास सांगतात हिरमुसलेले पठ्ठे बापूराव निघून जातात.

खास बाब –

अत्यन्त अडचणीचे वेळी चालून आलेली मदत नाकारल्यामुळे सोबत असलेले कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरावर नाराज होतात व तसे बोलून दाखवितात. डॉ बाबासाहे आपल्या कार्यकर्त्यावर खवळून उठतात त्यांचा चेहरा रागाने लालबुंद होतो नजरेत आग उतरून येते संतप्त डॉ. बाबासाहेब घोगऱ्या आवाजात म्हणतात – तुम्हा लोकांना लाज नाही वाटत? नितिमत्ता व स्वाभिमान नावाची चीज तुमच्यात आहे की नाही? बायका नाचवून हा पैसे कमवतो व तुह्मी मला असे पैसे घेण्यास सांगता? ” माझे सत्याग्रही उपासी झोपले तरी बेहत्तर मी असा पैसा घेणार नाही.

महात्मा फुले हे समग्र क्रांतीचे अग्रदूत होते. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या जीवन विचारापासून स्फूर्ती घेतली. महात्मा फुले यांच्या सामाजिक सत्यशोधनात सहभागी होणारे एक आचारवंत एक विद्याव्रती, बहुजन समाजाचे एक कैवारी, राजर्षी शाहूछत्रपती, महात्मा जोतिबा फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ,कर्मवीर भाऊराव पाटील, हे महाराष्ट्राच्या समाजकारणातील, शैक्षणिक कार्यातील अत्यंत तेजस्वी असे तारे होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आसमंत हे उजळून टाकणारे ठरले. त्यामुळे नव समाज रचनेच्या परवाला प्रारंभ झाला.यांच्या रूपाने परिवर्तनाची जणू लाटच आली समाजामधे.

रयत शिक्षणसंस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेड्यापाड्यातील अठरापगड प्रजेला शिक्षण प्रसाराने जागे केले. कर्मवीरांनी त्यांच्या कार्यात माणसे जोडावी कशी हे शिकवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले गुरु मानले. महात्मा गांधीजींनी खरा महात्मा ‘म्हणून त्यांचा गौरव केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी’ ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणून त्यांचे जयगान केले. महाराष्ट्रातील अठरापगड प्रजेने समारंभपूर्वक ज्योतिबांचे माहात्म महाराष्ट्राच्या मुंबईत उदघोषित केले.आणि आपण त्यांचा उल्लेख भिकारी म्हणून करतो, किव येते आम्हाला आपल्या बुद्धीची.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत माझे तीन गुरु आहेत .भगवान बुद्ध, कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले. माझे तीन दैवते आहेत .विद्या ,विनय आणि शील .आयुष्यात मी कधिही दगाबाजी केली नाही .विलायतेला मी अनेक वेळा गेलो मला कसलेही व्यसन लागले नाही व कशाचेही आकर्षण वाटले नाही. माझे तत्त्वज्ञान तीन शब्दात गुंतता येईल ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. बंधुता आणि मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे.

महात्मा फुले हे समग्र क्रांतीचे अग्रदूत होते. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या जीवनविचारापासून स्फूर्ती घेतली. महात्मा फुले यांच्या सामाजिक सत्यशोधनात सहभागी होणारे एक आचारवंत एक विद्याव्रती बहुजन समाजाचा एक कैवारी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रूपाने देशाला लाभला. शाहू ,फुले ,आंबेडकर ,कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणीक कार्याचे खरे जणक होते.महाराष्ट्राचा सांस्कृतिक व शैक्षणिक आसमंत उजळून टाकणारे ठरले. त्यामुळे नव समाज रचनेच्या परवाला प्रारंभ झाला. रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खेड्यापाड्यातील अठरापगड प्रजेला शिक्षण प्रसाराने जागे केले. माणसे जोडावी कशी हे कर्मवीरांनी शिकवले.

आताच्या राज्यकर्त्यांना आपण काय बोलतो ,कुठे बोलतो, कोणाच्या विषयी बोलतो याचे अजिबात भान नाही. शब्दाचे मोल अजिबात जपले जात नाही. बोलून आपल्या अंगावर नको त्या गोष्टी ओढवून घ्यायची सवय लागली आहे. या विचारवंत, समाज क्रांतिकारक, शिक्षण महर्षी यांच्याकडून आपण एक टक्कातरी काही करू शकत नाही मग आपल्याला बोलण्याचा अधिकार कोणी दिला?

माझी सर्व राज्यकर्त्यांना एकच विनंती आहे की बोलताना शब्दाचा वापर जपून करावा म्हणजे पुढील अनर्थ टळतो.

 

 

 

डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!