Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSEntertainmentHISTORYINDIANewsPostbox Marathi

मधुबाला

1 Mins read
  • मधुबाला

मधुबाला

सिनेमाची_सौन्दर्यदेवी  (Venus Of The Screen)

 

 

सिनेमाची सौन्दर्यदेवी’ (Venus Of The Screen) ‘ मधुबाला ‘ हीचा आज स्मृती दिन संपूर्ण नाव ‘ मुमताज़ बेग़म जहाँ देहलवी ‘ असे होते.मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्ली येथे एका अत्यंत गरीब पख्तुनी कुटुंबात झाला.मधुबाला तिच्या आई-वडिलांची ११ अपत्यांपैकी पाचवी कन्या होती.(असे म्हणतात एका भविष्यकाराने तिच्या आई-वडिलांना सांगितले की मुमताज खूप प्रसिद्धी आणि संपत्ती कमावेल, परंतु तिचे आयुष्य खडतर असेल. तिचे वडील अयातुल्ला खान हे चांगल्या आयुष्याच्या शोधात दिल्लीहून मुंबईला आले.तिचे वडील अताउल्ला खान यांच्यासमवेत ९ वर्षांची मुमताज चित्रपटांत काम शोधत होती.

त्यावेळी हिमांशु राय यांच्या नजरेस पडली व त्यांनी तिला बालकलाकार म्हणून संधी दिली व दरमहा पाचशे रुपयावर नेमणूक केली व ‘ बसंत ‘ मध्ये तिला बालकलाकार म्हणून वर्ष १९४२ मधे पडद्यावर पाऊल ठेवले.पहिली ५ वर्षे तिने बालकलाकार म्हणूनच काम केले व कुटुंबाचा आधारही बनली. वर्ष १९४७ मधे त्या अवघ्या १४ वर्षाच्या असताना, किदार शर्मा दिग्दर्शित ‘नीलकमल’ या चित्रपटात राजकपूरची नायिका म्हणून काम केले.या चित्रपटामुळे तिच्या सौन्दर्याची व अभिनयाची ओळख चित्रपसृष्टीला झाली. नीलकमल,शराबी, मुगल-ए-आज़म,बरसात की रात,दो उस्तादहावड़ा ब्रिज, चलती का नाम गाड़ी,फागुन,पारस,असे अनेक चित्रपट यादी खूपच मोठी होईल , केवळ तिच्या अभिनय व सौन्दर्यामुळे यशस्वी झाले.

१९५०चे दशकात त्यांचे काही चित्रपटही अयशस्वी झाले.कारण तिचे वडीलच तिचे व्यवस्थापक होते.कुटुंबाच्या संगोपनासाठी वडील पारख न करता कोणतेही चित्रपट स्वीकारायचे.वर्ष १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ हंसते आंसू ‘ या चित्रपटाला बॉलिवूडच्या इतिहासात सेन्सॉर बोर्डाचे पहिले ‘ए’ सर्टिफिकेट मिळाले होते.अर्थात सेक्स सीन्स किंवा बोल्ड कंटेंट साठी नाही तर शीर्षका साठी आक्षेप घेणेत आला होता.दिग्दर्शक केबी लाल यांच्या या चित्रपटात मोतीलाल आणि मधुबाला मुख्य भूमिकेत होते.

‘ महलच्या ‘ यशानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या कारकिर्दीत सुमारे ७३ चित्रपटामधून मधुबालाने अभिनय केला.त्या काळातील सुपरस्टार अशोक कुमार, रहमान, दिलीप कुमार, देवानंद इत्यादींबरोबर त्यांनी काम केले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी मुंबईला भेट देताना अकादमी पुरस्कार विजेता अमेरिकन दिग्दर्शक फ्रँक कॅपरा तिला हॉलिवूडमध्ये भूमिका देण्यास उत्सुक होते, परंतु वडील अताउल्ला खान यांनी यास नकार दिला.मधुबालाचे जीवनात तिचे अनेक व्यक्तींचे बरोबर संबंध चर्चेत राहिले.सुरवातीला महल चित्रपटाचे वेळी कमल अमरोहींबरोबर नाव जोडले गेले पण तसे घडले नाही मात्र दिलीपकुमारबरोबर ‘मुगल-ए-आजम’ चे सेटवर जवळीक वाढत गेली.त्यावेळी तिच्या घरच्यांच्या कडून विरोध झाला. वर्ष १९५० मधे मुग़ल-ए-आज़म चित्रपटाचे वेळी मधुबालास ह्रदयविकार असल्याचे निदान झाले होते. हि गोष्ट लपविण्याचा प्रयत्न झाला परंतु हि गोष्ट लपून राहिली नाही.तरीही त्याच अवस्थेत ९ वर्षे तिने अनेक चित्रपटात काम केले.

वर्ष १९५६ मध्ये किशोरकुमार बरोबर स्नेह वाढत गेला.वर्ष १९६० मध्ये दोघांचा विवाह झाला.मधुबाला यांना लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले होते.पण मधुबालाने किशोरकुमारची निवड केली. किशोरकुमार यांनी तिच्या आजाराची कल्पना असूनही विवाह केला.किशोर कुमारने मधुबालाशी लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला आणि किशोर कुमारचे नाव करीम अब्दुल झाले. किशोर कुमार यांना माहित होते की मधुबाला मृत्यूच्या आधी लग्न करायचे आहे. अखेरची ९ वर्ष अंथरुणावर मृत्यूशी झुंज घेत. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी अखेरचा श्वास घेतला.

लेखन
माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!