Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

बॅ. शरदचंद्र बोस

1 Mins read
  • बॅ. शरदचंद्र बोस

स्वातंत्र्यसैनिक फॉरवर्ड ब्लॉकचे नेते

बॅ. शरदचंद्र बोस

 

 

 

जन्म ओरिसातील कटक येथे ६ सप्टेंबर १८६९ रोजी झाला.त्याचे वडील जानकीनाथ बोस हे मूळचे बंगाल मधील २४ परगणा जिल्ह्यातील कोडालिया येथील रहिवासी होते. वकिलीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी कटक येथे वकिली व्यवसाय सुरु केला.ते ब्राह्मो समाजाचे अनुयायायी होते.तसेच ते स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांचे संपर्कात आले.त्यांना एकूण ८ मुलगे व ६ मुली अशी १४ अपत्ये झाली,त्यापैकी नेताजी सुभाषचंद्र बोस व बॅ. शरदचंद्र बोस आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.सुनीलचंद्र बोस हि त्यांची मुले सर्वश्रुत आहेत.

शरदचंद्र बोस यांनी कोलकाता येथे प्रेसिडेन्सी कॉलेज व स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, त्या नंतर बॅरिस्टर होण्यासाठी वर्ष १९११ मध्ये इंग्लंडला गेले.त्यांनी प्रसिद्ध “लिंकन्स इन”च्या बारमध्ये बॅरिस्टर पदवी संपादन केली.त्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात यशस्वी वकिली व्यवसाय सुरू केला, त्यांच्या व्यावंसायात दिवसेंदिवस भरभराट होऊ लागली. परंतु त्याचवेळी देशात भारतीय स्वातंत्र्य चळवळ सुरु झाली व त्यात सामील होण्यासाठी त्यांनी व्यवसाय सोडून दिला.

सी.आर.दास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनास सुरवात केली,त्यावेळी कोलकाता महानगर पालिकेच्या कामात अनेक वर्षे कार्यरत होते.काँग्रेसच्या अहिंसेवर विश्वास असूनही त्यांना क्रांतिकारकांबद्दल सहानुभूती होती.वर्ष १९३६ मध्ये, बोस बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले तसेच विधानसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते होतेआणि १९३६ ते १९४७ पर्यंत त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य म्हणून काम केले.

वर्ष १९४१ मधे ते तत्कालीन बंगालच्या फझहूल हक मंत्रिमंडळात सामील होणार होते.परंतु आदले दिवशीच त्यांचे बंधू नेताजी सुभ्साचंद्र बोस हे भूमिगत झाले पण दुसऱ्याचदिवशी त्यांना अटक झाली. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मारकारा आणि नंतर कुन्नूर तुरुंगात नेण्यात आले.४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर सप्टेंबर १९४५ मध्ये त्यांची सुटका झाली. वर्ष १९४६ १९४७ मधे त्यांनी केंद्रीय विधानसभेत काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.वर्ष १९४५ मध्ये त्यांचे बंधू नेताजी सुभाषचंद्र यांच्या मृत्यूनंतर,त्यांनी आझाद हिंद सेनेच्या कुटुंबीयांना मदत आणि मदत देण्याचे प्रयत्न केले.

वर्ष १९४६ मध्ये अंतरिम सरकारमधे जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कार्यकारी परिषदेत,त्यांची खनिजमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.तथापि, हिंदू-बहुल आणि मुस्लिम-बहुल प्रदेशांमध्ये बंगालची फाळणी करण्याच्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या आवाहनावर मतभेद झाल्याने बोस यांनी अखिल भारतीय काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी बंगाली मुस्लिम लीगचे नेते हुसेन शहीद सुहरावर्दी आणि अबुल हाशिम यांच्यासमवेत संयुक्त बंगाल आणि ईशान्य भागासाठी नवीन प्रांत तयार करण्याचा प्रयत्न केला.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर, बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकचे नेतृत्व केले आणि बंगाल आणि भारतासाठी समाजवादी व्यवस्थेची मागणी करीत सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली.वयाच्या ६० व्या वर्षी २० फेब्रुवारी १९५० रोजी कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले. त्यांचा वर्ष १९०९ विभावती यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना ८ अपत्ये झाली.त्यापैकी अशोक नाथ बोस जर्मनीतील रसायनशास्त्रात डॉक्टरेट आणि प्रख्यात अभियंता होते. त्यांचे दुसरे पुत्र अमिया नाथ बोस संसद सदस्य झाले त्यांच्या सन्मानार्थ कलकत्ता उच्च न्यायालयाच्या परिसरात शरदचंद्र बोस यांचा पुतळा उभारला आहे.

 

लेखन
माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!