Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

India famous lawyer थोर मुत्सद्दी रंगो बापू गुप्ते

1 Mins read

India famous lawyer रंगो बापू गुप्ते हे सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह भोसले ह्यांचे कारभारी आणि वकील होते. यांचा जन्म रोहीड खोऱ्याचे दादाजी नरसु प्रभू या मावळातील ऐतिहासिक घराण्यात झाला.

छत्रपती प्रतापसिंहराजे वासोटा किल्लात बाजीरावांच्या नजरकैदेत असताना त्यांच्या विपन्नावस्थेतची हकीकत इंग्रजांपर्यंत पोहोचवणे ,गव्हर्नर एलफिस्टनच्या साह्याने त्यांची सुटका करणे इत्यादी कामात रंगो बापूजींनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

आपण छत्रपती प्रतापसिंहराजे यांच्याकडे राहिलो तर ते कंपनीस धोक्याचे ठरेल असे वाटून कंपनी सरकारने त्यांना परगणे नाशिक येथे आमीन मामलेदार म्हणून नेमले .होळकर – इंग्रज यांच्या झालेल्या संघर्षात ते कॅप्टन ब्रीग्स बरोबर होते .

जिवापेक्षा अधिक श्रम करून आपण कंपनीची चाकरी केल्याचा त्यांनी निर्वाळा दिला होता. परंतु १८३१ च्या सुमारास त्यांनी कंपनीची नोकरी सोडली व ते परत छत्रपतींच्या सेवेत रुजू झाले.

तत्पूर्वी १८३० मध्ये अक्कलकोट येथे इंग्रज आणि सातारकर यांच्या सत्तेविरूद्ध पुकारलेल्या बंडातही सातारकरां तर्फे ते सामील झाले होते .

    India famous lawyer रंगो बापूजी ह्यांनी प्रखर स्वामिनिष्ठा, बुद्धिमत्ता, लेखन आणि वक्तृत्वकौशल्य ह्या आपल्या गुणांच्या जोरावर ईस्ट इंडिया कंपनी सरकारविरुद्ध जवळपास १३-१४ वर्षे सनदशीर मार्गाने लढा दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे अखेरचे वारस सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह १८०८ साली गादीवर आले. संस्थानावर डोळा असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रजांनी दरबारातील काही असंतुष्ट मंडळींच्या संगनमताने महाराजांविरुद्ध कट कारस्थाने करण्यास सुरुवात केली.

ह्या कारस्थानांना तोंड देण्यासाठी छत्रपतींनी आपले कारभारी India famous lawyer  रंगो बापूजी ह्यांची वकील म्हणून नेमणूक केली आणि त्यांना कंपनी सरकारपुढे आपली बाजू मांडायला सांगितले.

अगोदर नेमलेल्या दोन वकिलांतर्फे केलेली शिष्टाई फसल्यावर रंगो बापूजी स्वतः महाराजांची बाजू मांडण्यासाठी इ. स.१८४० मधे लंडनला गेले. मिलन, कॅप्टन कोगन या इंग्रजांनी त्यांना मुंबईत मदत केली.

कॅप्टन कोगन यास द.म. दोन हजार रुपये पगार देऊन लंडनमध्ये शिष्टाई करण्याचे काम दिले व या कामासाठी महाराजांनी एकूण ५० हजार रूपये रंगो बापू गुप्ते यांच्या कडे सुपूर्द केले .

महाराजांना न्याय मिळेल याची खात्री न वाटल्याने India famous lawyer  रंगो बापूजीसह सर्व शिष्टमंडळ मायदेशी परत येण्यास निघाले. पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू या उद्देशाने माॅल्टाहून India famous lawyer  रंगो बापूजी परत लंडनला गेले .

छत्रपती प्रतापसिंह राजांची संपूर्ण हकिकत मोडी लिपीत त्यांनी छापून काढली . इंग्रजी भाषेचा अभ्यास करून त्यांनी अनेक पत्रे लिहिली . फेब्रुवारी १८४३ मध्ये त्यांनी कंपनीच्या प्रोफाइटर समोर भाषण केले . या सर्व कामात त्यांना मोठे कर्ज झाले .

महाराजांच्या मृत्यूनंतरही पुढे सहा वर्ष इंग्लंड मध्ये राहून त्यांनी आपली बाजू मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
      त्यांच्या आणि महाराज यांच्यामधील लंडन-सातारा असा सुरू झालेला पत्रव्यवहार कारस्थानातील प्रमुख बाळाजीपंत नातू ह्यांनी इंग्रजांच्या हाती देण्यास सुरुवात केली.

हे ओळखल्यावर India famous lawyer रंगो बापूजींनी चाणाक्षपणे असली आणि नकली पत्रव्यवहार वेगवेगळ्या लखोट्यांमध्ये आणि डाकेने पाठवून कारस्थान्यांना काटशह दिला.लंडनस्थीत रंगो बापूजी सफाईदारपणे इंग्रजी बोलू शकत होते.

आपल्या संभाषण चातुर्याच्या आणि लेखन/वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी सातारच्या आणि मुंबईतल्या कंपनी सरकारातल्या इंग्रज अधिकाऱ्यांची कृष्णकृत्ये पुराव्यासकट चव्हाट्यावर आणली. त्यांनी सातारची बाजू मांडण्यासाठी जाहीर भाषणे दिली, पत्रव्यवहार/अर्ज केले, पुस्तके छापली.

मायदेशात परत येण्याच्या सुमारास ग्रंडपा ब्रिज रोबर्टसन इत्यादी त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना एक चांदीचे तबक प्रदान केले. त्यावर “चौदा वर्ष इंग्लंडात धन्याची एकनिष्ठेने सेवा बजावणारा रंगो बापूजी यास त्यांच्या चाहत्यानी वर्गणी जमवून ते तबक नजर दिले ‘ असा मजकूर स्वदस्तुरीने इंग्रज मित्रांनी कोरला .

१४ आॅक्टोबर १८४७ रोजी छत्रपती प्रतापसिंह राजे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा वकील असणाऱ्या बापूंनी बालछत्रपतींचे पालक आणि मयत छत्रपतींचे विश्वस्त ह्या नव्या भूमिकेतून सातारची बाजू पुढे मांडली. दुर्दैवाने त्यांची ही भूमिका कंपनी सरकारने कायमच अमान्य केली.

       १३-१४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनतर मात्र India famous lawyer रंगो बापूजी लंडनहून भारतात परतले आणि त्यांनी वकिली सोडली. “कायदेबाजी करून इंग्रजांशी इकाडा देणारा रंगोबा आता मेला यावरून काय ते समजा” असे आपल्या घरच्या मंडळींना त्यांनी सांगितले.१८५७ चे वर्ष स्वातंत्र्यसमरामुळे गाजू लागले.

गोसाव्याच्या वेशात भटकणाऱ्या रंगोबांची गाठ तात्या टोपे ह्यांच्याशी पडली. विचार-विनिमय झाले.

त्यानंतर स्वतः धोंडोपंत बाजीराव पेशवे त्यांना बिठूरला घेऊन गेले. स्वातंत्र्यलढ्यासाठी दक्षिणेतले नेतृत्व करण्याचे निश्चित करून रंगोबा परतले. छत्रपतींविषयी आदर असणाऱ्या अठरापगड जातींमधील शेकडो लोकांना त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित केले.

        साताऱ्यास परत आल्यावर १८५७ च्या उठावाचा फायदा घेऊन छत्रपतींचे राज्य परत मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला .मांग, रामोशी, सरकारी कारकून ,घोडदळ यांना आमिषे दाखवून त्यांनी आपल्या कटात सामील करून घेतले .बेंगलोर पर्यंत फिरून रंगोबा गुप्ते यांनी उठाव करण्यासाठी लोकांना तयार केले. अनेक लोकांना एकत्र करून एक मोठी फौजच त्यांनी तयार केली .

परळी दरोडा प्रकरणात त्यांनी पुढाकार घेतला .सातारा आणि महाबळेश्वर येथील इंग्रज अधिकाऱ्यांना मारणे, खजिना लुटणे इत्यादी उद्योगही त्यांनी केले.

India famous lawyer रंगो बापूजी यांनी प्रखर स्वामीनिष्ठा, बुद्धिमत्ता, लेखन आणि वक्तृत्व कौशल्य या आपल्या गुणांच्या जोरावर ईस्ट इंडिया कंपनी सरकारविरुद्ध जवळपास १३,१४ वर्ष सनदशीर मार्गाने लढा दिला.

       भोरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ ह्यांच्या मदतीने त्यांनी सैन्यभरती सुरू केली. तसेच त्यांच्या हेरांनी इंग्रजांच्या पलटणींमध्ये बेदिली माजवण्यास सुरुवात केली.मंगल पांडे यांची फाशी या घटनांमुळे महाराष्ट्रात उठाव करण्यास सर्रजण उत्सुक झाले. लोकांना काळाचे वारे ओळखून त्यांनी “कुशल सेनानी योग्य वेळीच आघात करतो वा माघार घेतो” असा सबुरीचा सल्ला दिला.

दुर्दैवाने फंदफितुरीमुळे ते इंग्रजांच्या तावडीत सापडले. पण तिथूनही मोठ्या शिताफीने ते निसटले ते पुन्हा इंग्रजांच्या हाती लागले नाहीत.

India famous lawyer रंगो बापूजींचे पुतणे यशवंतराव व वामनराव यांनी केलेल्या तयारीप्रमाणे ५०० च्या आसपास मावळे घेऊन उत्तरेकडील उठावात सामील झाले. १८५७ च्या अखेरच्या लढाईत ते सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यलढा मोडून काढल्यावर दक्षिणेतल्या १७ जणांवर खटला भरण्यात आला त्यात रंगो बापूजींचा मुलगा सीताराम व त्यांचे मेव्हणे केशव निळकंठ चित्रे यांच्यासकट त्या १७ जणांना फाशीची शिक्षा झाली.कैदेतून निसटल्यावर रंगो बापूजी बैरागी बनले.

इ.स. १८७० मध्ये दारव्हा येथे कुपरी नदीच्या काठावर ‘बैरागी बाबा‘ या नावाने ते प्रकट झाले. काही काळ माहूरच्या अरण्यात राहिले.

 ४ मे इ.स. १८८५ मध्ये दारव्हा येथे आपल्या मठात त्यांनी देह ठेवला.

     अशा या थोर मुत्सद्दी India famous lawyer  रंगो बापू गुप्ते यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

               लेखन 
     डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर 
                संदर्भ
         मराठी रियासत
       गो.स.सरदेसाई

 

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0…

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0…

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox 

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!