Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

MAHARASHTRANewsPostbox Marathi

brahman status – देवेंद्र फडणवीस उवाच !

1 Mins read

brahman status – देवेंद्र फडणवीस उवाच !

 

brahman status – मी ब्राह्मण आहे म्हणून मला विरोध होतो.. फडणवीस उवाच !

 

 

1/10/2021,

मी ब्राह्मण आहे म्हणून मला विरोध होतो.. फडणवीस उवाच !

देवेंद्रजी, मग तुम्ही कोणत्या बेसवर किंवा criteria वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले ?

फडणवीसजी, एकनाथ खडसे सारख्या सिनियर मोस्ट माणसाला डावलून व आयुष्यातून उठवून तुम्ही मुख्यमंत्री होण्यामधे कोणती विशेष पात्रता तुमच्यामधे होती ? हा बहुजन विरोधच होता ना !

महाराष्ट्राने ब्राह्मण समाजाला जेवढे डोक्यावर घेतले,तेवढे कोणत्याच समाजाला घेतले नाही.नाहीतर इतिहास खूप वेगळा असता की नाही ? हा ब्राह्मण विरोध होता का ?

बहुजनांना जागृत करणाऱ्या फुले दाम्पत्याचा आम्ही प्रचंड विरोध केला आणि ११ वर्षाच्या मुलीसोबत बालविवाह करणाऱ्या न्या.रानडेंना डोक्यावर घेतले. हा आमचा ब्राह्मण विरोध की प्रेम ?

बहुजनांना आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांना आम्ही करंट्यांनी नाकारले आणि शाहूंच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणाऱ्या टिळकांना उरावर घेतले.हा ब्राह्मण विरोध की प्रेम ?

आम्ही डाॕ.आंबेडकरांचा वेळोवेळी अपमान केला आणि आगरकर,गोखल्यांचा जयजयकार केला.याला कोणता विरोध म्हणायचा ?

७७ पुस्तके लिहिणारे अण्णाभाऊ साठे आम्हा बहुजनांना चालले नाही.पण १४ पुस्तके लिहणारे शिरवाडकर मात्र आम्ही मुलांच्या डोक्यात कोंबले.हा ब्राह्मण विरोध होता का ?

आम्हाला बहुजनांची मुले शेतकऱ्यांचे नेते म्हणून आवडले नाही.पण ब्राह्मण शरद जोशींसाठी आम्ही छातीवर गोळ्याही झेलल्या.हा ब्राह्मण विरोध होता का ?

देवेंद्रजी, १९९६ पासून सुरु झालेल्या महाराष्ट्र भूषण मधे एक सोडून बहुतांश ब्राह्मण आहे.तरी बहुजन शांतच आहे.हा ब्राह्मण विरोध की बहुजन विरोध ?

बाळासाहेब खेर,मनोहर जोशी,तुम्ही स्वतःं मुख्यमंत्री कोणाच्या मतांवर झाले ? ब्राह्मणांच्या की बहुजनांच्या ?

ज्ञानेश्वर,एकनाथांपासून सगळ्या ब्राह्मण संतांच्या पालख्या खांद्यावर घेवून बहुजनांनी त्यांना ह्दयात स्थान दिले.तरी म्हणता ब्राह्मण विरोध ?

देवेंद्रजी, किती ब्राह्मणांच्या घरात संत तुकाराम,नामदेव,सावता,गोरोबा,चोखोबा,गाडगेबाबा,तुकडोजी महाराजांच्या प्रतिमा आहेत ? हा कोणता व्देष व विरोध ?

शरद पवारांवर जेवढी टिका राजकारणात झाली असेल तेवढी महाराष्ट्रात कोणावरच झाली नाही.पण मी मराठा आहे म्हणून मला विरोध होतोय हे त्यांनी कधी म्हटले का ?

देवेंद्रजी,महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात घाणेरडे,द्वेषी,खुनशी आणि जातीयवादी राजकारण जर कोणी केले असेल तर ते फक्त आणि फक्त तुम्ही ! अनेक बहुजन नेत्यांचे राजकीय आयुष्यच तुम्ही उध्वस्त करुन टाकले की नाही ? हा ब्राह्मण विरोध होता की बहुजन विरोध ?

लतादिदी,तेंडूलकर,नारळीकर,माशेलकर,पाडगावकर,भीमसेन जोशी,बाबा आमटे,मेधा पाटकर,अत्रे,डांगे,एसएम जोशी,तर्कतीर्थ,चिपळूणकर,केशवसूत,मर्ढेकर,अशोक सराफ,निवेदिता जोशी,प्रमोद महाजन,गाडगीळ,गोरे,देव यासारख्या असंख्य ब्राह्मणांना हा महाराष्ट्र डोक्यावर घेवून पिढ्यानपिढ्या नाचत आला आहे आणि बहुजनातल्या महानायकांना शिव्या देवून नाकारत आला आहे तरी आम्ही ब्राह्मणविरोधी ?

आता स्वतःंवर टिका होत आहे तर जातीच्या बिळात घुसत आहात.

देवेंद्रभाऊ, शेवटी जात दाखवलीच राजेहो तुम्ही !

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

 

प्रेमकुमार बोके

Leave a Reply

error: Content is protected !!