Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

MAHARASHTRANewsPostbox Marathi

solapur police – सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी

1 Mins read

solapur police – सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी

solapur police – सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी

 

 

30/9/2021

वडाळा येथील डॉक्टरांना खंडणीच्या उददेषाने अपहरण करून लुटलेल्या 07 आंतरजिल्हा

दरोडेखोरांच्या 04 दिवसात मुसक्या आवळण्यात एल.सी.बी.ला यश

दिनांक 21/09/2021 रोजी रात्रौ 20ः30 वा. सुमारास यातील फिर्यादी डॉ. श्री. अनिल व्यंकटेश कुलकर्णी,

वय 47 व्यवसाय वैद्यकीय सेवा व इंडीयन ऑईल पेट्रोल पंप वडाळा रा.वडाळा ता.उत्तर सोलापूर

सध्या रा. 565 उत्तर कसबा सोलापूर हे त्यांची वेरना गाडी क्रमांक एमएच 13-बीएन-9367 मधून

मौजे वडाळा ते सोलापूरकडे जात असताना बीबी दारफळ ते कोंडी गावाचे रस्त्याचे दरम्यान

एम.आय.डी.सी च्या जवळ असलेल्या क्रॉस रोडवर आलेनंतर अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचे ताब्यातील

इनोव्हा गाडी आडवी लावुन फिर्यादी यांना गावंठी बंदुकीचा धाक दाखवुन कोयत्याने उजव्या हाताचे दंडावर,

काठी व हॉकी स्टीकने उजव्या पायावर मारहाण करून जखमी करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन

जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवुन त्याचे अपहरण करून 1 कोटीची खंडणीची मागणी करून त्यांना मोहोळ,

पंढरपूर, टेंभुर्णी, इंदापुर, बारामती,जेजूरी, सासवड मार्गे वारजे- माळवाडी पुणे येथे नेऊन त्याचे कडील पेट्रोल

पंपाची जमा असलेली 5 लाख 70 हजार 420 रूपये रोख रक्कम तसेच फिर्यादी यांचे खिशातील

18 हजार रूपये रोख रक्कम असा एकूण 5 लाख 88 हजार 420 रू. जबरदस्तीने काढुन घेवून यातील

फिर्यादीस वारजे मळेवाडी पुणे येथे ढकलुन दिले आहे म्हणुन वगैरे मजुकरची फिर्यादीवरून

सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 771/2021 भारतीय दंड संहिता कलम 395, 341, 364 (अ) 365

व शस्त्र अधिनियम कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक

हिंमत जाधव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सर्जेराव पाटील व इतर पोलीस अधिकारी

यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. भेटी दरम्यान solapur police मा. पोलीस अधिक्षक व अपर पोलीस अधिक्षक यांनी सदरचा

गुन्हा उघडकीस आणणेकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार गुन्हे शlखे चे पोनि सर्जेराव पाटील यांनी सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथक नेमुन पथकास यातील

फिर्यादीस वारजे माळवाडी पुणे येथे सोडले असून सदर गुन्हयात गांवातील एखादया व्यक्तीचा सहभाग असण्याची

दाट शक्यता असून त्या दृश्टिीकोणातून तपास करून गांवातील व पुणे भागातील अशl पध्दतीचे गुन्हे करणा-या

गुन्हेगारांची माहिती संकलित करून गुन्हा उघडकीस आणणे कामी सुचना दिल्या.

त्याप्रमाणे गुन्हे षाखेकडील सपोनि रविंद्र मांजरे व त्यांचे पथक सदर गुन्हयाचे तपासकामी पुणे शहरात असताना,

बातमीदारामार्फत खात्रीशर माहिती मिळाली की,

सदरचा गुन्हा हा वडगांव, सिंहगड रोड, पानमळा पुणे येथील गुन्हेगारांनी केल्याचे माहिती मिळाल्याने 05 आरोपीतांना पुण्यातुन ताब्यात घेवून त्यांचेकडे स्वतंत्ररित्या विचारपूस करता त्यांचेपैकी 01 आरोपीने सांगितले की, त्याचा मामाचा मुलगा हा मौजे वडाळा ता. उत्तर सोलापूर येथे राहवयास असून त्यास मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी मोठी असामी असलेल्या व्यक्तीस लुटण्याचे काम बघण्यास सांगितले होते, त्याप्रमाणे मामाच्या मुलाने सांगितले की, मौजे वडाळा गांवात एक डॉक्टर असून त्यांचा पेट्रोलपंप व दवाखाना आहे, त्यांचेकडे मोठया प्रमाणात पैसे असून ते दरदोज पेट्रोल पंम्पातील व दवाखान्यातील जमा झालेली रक्कम त्यांचेकडील वेरना कारमधून सोलापूरला जात असतात त्यांचे किडनॅपिंग केले तर ते आपल्याला एक दोन कोटी रूपये नक्की देईल अषी माहिती सांगितली होती.

तेंव्हा मामाचे मुलास लुटण्याचेकाम कधी करावयाचे आहे ते तु मला दोन चार दिवस अगोदर सांग, असे आरोपीने सांगितले होते. त्याप्रमाणे वडाळा येथील आरोपीच्या मामाच्या मुलाने नियोजन करून पुण्यातील आरोपीतांना तीन दिवस अगोदर बोलावून घेतल्याने ते सर्वजण इनोव्हा गाडीने सोलापूर शहरात येवुन सोलापुरातील हॉटेल अंम्बेसिडर येथे थांबले होते.

दरम्यान आरोपीच्या मामाचा मुलगा व त्याचा एक मित्र असे सदर लॉजमध्ये गुन्हयाचे नियोजन करून दिनांक 21/09/2021 रोजी सायंकाळच्या सुमारास डॉक्टर यांना किडण्यापिंग करून लुटण्याचे ठरले.

दिनांक 21/09/2021 रोजी सायंकाळच्या सुमारास ठरल्याप्रमाणे मामाचे मुलाने डॉक्टर गांवातून निघाले असून मी त्यांचे मागे मोटार सायकलवर असल्याचे सांगीतले त्यानंतर आरोपींतांनी डॉक्टरची वेरना गाडीस इनोव्हा गाडीने आडवून डॉक्टरांना त्यांचे कारमधून बाहेर काढून इनोव्हा गाडीमध्ये घातले. तेंव्हा इनोव्हा मधील एका आरोपीने डॉक्टरांची वेरना गाडी ताब्यात घेवून त्यानंतर आरोपींनी डॉक्टरांना घेवून बीबीदारफळ, मोहोळ, पंढरपूर, टेंभूर्णी, इंदापूर, बारामती, जेजूरी, सासवड मार्गे वारजे- माळवाडी ब्रिज पुणे येथे नेवुन सोडल्याचे सांगुन त्यासाठी मामाच्या मुलाने व त्याचे मित्राने मदत केल्याचे सांगुन चोरलेले पैसे आपसात वाटुन घेतल्याचे सांगीतले.

मा. न्यायालयाने अटक आरोपीताची गुन्हयाचे तपास कामी 04 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि/बंडगर, solapur police सोलापुर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.

अटक आरोपी पैकी मुख्य आरोपीता विरूध्द हवेली पोलीस ठाणे, पुणे गु.र.नं. 248/10 भादवि कलम 439, 392 व गु.र.नं. 526/2010 भादवि कलम 439, 395 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल असुन इतर दोन आरोपीता विरूध्द हवेली पोलीस ठाणे गु.र.न. 366/2012 भादवि कलम 302, 109, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयातील आरोपीतांकडुन चोरलेले रोख रक्कमेपैकी 2 लाख 50 हजार रोख रक्कम हस्तगत केली असून, गुन्हयात वापरलेले इनोव्हा कार नंबर एमएच 42 एन 4554 व हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटार सायकल एमएच 13 डीजे 8587, व आरोपीतांचे एकूण 07 मोबाईल असा एकूण 8 लाख 13 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली solapur police स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सपोनि रवींद्र मांजरे, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

Postbox india

अंजनी मिश्रा

Leave a Reply

error: Content is protected !!