Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

MAHARASHTRANewsPostbox Marathi

Ga Di Madgulkar – मरावे परी गीतरुपी उरावे !!

1 Mins read

Ga Di Madgulkar – मरावे परी गीतरुपी उरावे !!

 

Ga Di Madgulkar – कै.गदिमा तथा ग.दि.माडगूळकर यांची आज जयंती

1/10/2021,

मरावे परी गीतरुपी उरावे !!
माणदेशा सारख्या दुष्काळी भागात जन्मलेल्या तरीही कवितेची हिरवळ वाढविणारे,
कथाकार नाटककार अभिनेते संगीतकार,चित्रपटनिर्माते पटकथाकार दिग्दर्शक राजकारणी माजी आमदार,
कवी शाहीर भावगीत कार लावणी कार अभंगकार_समरगीतकार
सर्वांचे लाडके कै.गदिमा तथा ग.दि.माडगूळकर Ga Di Madgulkar यांची आज जयंती
त्यांचा जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा.विनायक दिग्दर्शित ‘ब्रम्हचारी’ (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोटया भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिध्द साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले.
‘नवयुग चित्रपट लि.’ ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. नवसंह पिक्चर्सच्या ‘भक्त दामाजी’ (१९४२) आणि ‘पहिला पाळणा’ (१९४२) ह्या चित्रपटांनी गीते लिहिण्याची संधी मिळाली.
पुढे राजकमल पिक्चर्सच्या ‘लोकशाहीर रामजोशी’ (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहिली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली;
गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून Ga Di Madgulkar दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते ‘चैत्रबन’ (१९६२) ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिध्द झालेल्या आहेत. (तीन चित्रकथा, १९६३). ‘युध्दाच्या सावल्या’ (प्रयोग, १९४४) ह्या नावाने एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही.
संगीतामधील बहुतेक प्रकारात त्यांनी गीते लिहिली लावणी , भावगीत हे तर त्यांचे होम पिछ ,त्यांनी लिहिलेली शेकडो गीते आजही लोकांचे तोंडी अहेत. Ga Di Madgulkar गदिमा आणि गीतरारामायण हे समीकरण झाले. त्याची अवीट गोडी कधीही न संपणारी आहे . कै शंकर पाटील-द मा मिरासदार -व्यंकटेश माडगुळकर यांचे कथाकथन म्हणजे मेजवानीच असे

Also Raed : https://www.postboxindia.com/brahman-status-devendra-fadnavis-playing-caste-card-in-maharashtra-politics/

गदिमा Ga Di Madgulkar यांची गाजलेली ४१५ गीत्यांची यादी त्यांच्या #जयंती निमित्त तुमच्यासाठी

अनुपमेय हो सुरूं युद्ध – – अपराध मीच केला – – अबोल झालीस का साजणी .–अय्याबाई इश्श्बाई – – अल्लड माझी प्रीत .—-असा नेसून शालू हिरवा ..—–असा हा एकच श्रीहनुमान् .—-अहो सजना दूर व्हा.—- आई आणखी बाबा यातुन .—-आई व्हावी मुलगी माझी.—-..१आईपण दे रे … आईसारखे दैवत सार्या .. .. .. .. आज कुणीतरी यावे .. . . आज कां निष्फळ होती बाण .. . . .. आज गूज सांगते तुला .. .. . आज दिसे का चंद्र गुलाबी .. . .. . आज मी शापमुक्त जाहलें .. . . .. आज या एकांत काली .. . . . आज सुगंधित झाले .. . . आठव येतो मज … . आठवतो का बालपणा …. . …. आठवे अजुनी यमुना तीर … . .. आता कसली चोरी ग … .. . आधार जीवाला वाटावा … .. … आनंद आगळा हा मी
आनंद सांगूं किती सखे ग .. . . . आभाळ फाटलेले टाका कुठे … .. .. आमुची वसने दे श्रीहरी .. .. . आला वसंत देही … .. आली बाई पंचिम रंगाची .. . . .. आवडती भारी मला माझे …. . .. . आवडसी तू एकच ध्यास …. . . आसावल्या मनाला माझाच ….. … .. आश्रम की हरिचे हे … . आंधळेपणा फिटे जिवंत ….. . इथेच टाका तंबू .. . इवल्या इवल्या वाळूचं .. .. .. इवल्याइवल्याशा .. … इंद्रायणी काठी .. . उगा कां काळिज माझें उले . . . . उगी उगी गे उगी उघडले एक चंदनी दार .. .. .. उघडी नयन शंकरा . .. … उडाला राजहंस गगनात .. . .. … उदासीन का वाटती . . .. उद्धवा अजब तुझे सरकार .. .. .. उद्याचा कोण धरी .. . उपवर झाली लेक लाडकी .. . .. उमा म्हणे यज्ञी माझे . . . . ऊठ ऊठ पंढरीनाथा . . .. ..
ऊठ पंढरीच्या राजा . … .. ऊठ मुकुंदा सरली रात . . .. .. ऊठ शंकरा सोड समाधी . … एक कोल्हा बहु भुकेला . . . एक धागा सुखाचा .. .. एक फुलले फूल आणि . .. एक होता चिमणा . .. एकटी शिवारी गडे . . . एकदा येऊन जा .. . एकवार तरी राम दिसावा .. . . .. एकवार पंखावरुनी . … एका तळ्यांत होती बदके . .. .. ऐकशील माझे का रे .. . . ओटीत घातली मुलगी .. . ओळखिले मी तुला नाथा . . .. औंदा लगीन करायचं (२) .. . (2) अंगणी गुलमोहर फुलला .. . .. अंगणी गंगा घरात काशी .. .. .. . अंबिका माया जगदीश्वरी .. .. .. आंधळ्यांनी का म्हणावे … . .. कधी तू दिसशील डोळ्यांपुढे . . कधी मी पाहीन ती पाऊले . . . कधी रे पाहिन डोळां तुला . . . . कधीतरी तुम्ही यावे इथे .. . कबीराचे विणतो शेले .. .
कर्म करिता ते निष्काम . .. . करु देत शृंगार . . कशी करू स्वागता . . … कशी झोकात चालली . . .. कशी मी सांगु वडिलांपुढे . . .. कळी उमलते मना एकदा . .. .. .. का रे दुरावा . .. का मोगरा फुलेना . .. . का हो धरिला मजवर . .. … काजवा उगा दावितो दिवा … . . . कानडा राजा पंढरीचा … .. … काय करू मी ते सांगा .. . .. काय सामना करू तुझ्याशी .. … . . काल मी रघुनंदन पाहिले .. … . काल रात सारी मजसी .. .. . .. काही तरी तू बोल . . किती दिसांनी आज भेटसी . .. . किती वयाचे धराल भय .. .. . कुणी तरी बोलवा दाजिबाला . .. … कुणी म्हणेल वेडा तुला . . . कुणीतरी सांगा श्रीहरीला . .. .. कुरवाळू का सखे मी .. . . केतकीच्या बनात .. .. कोठें सीता जनकनंदिनी . . . कोण तूं कुठला राजकुमार .. ..
कुंभारासारखा गुरू नाही ….. . कृष्ण तुझा बोले कैसा . . .. खराच कधी तू येशिल .. . खाई दैवाचे तडाखे . .. .. खेड्यामधले घर कौलारू (१) … . (1) गगनी अर्धा चंद्र उगवला .. .. .. गा बाळांनो श्रीरामायण . .. … गिरीधर वर वरिला . . .. गुरुविण कोण दाखविल .. गेला दर्यापार घरधनी . … .. गेलीस सोडुनी का . गोकुळ सोडुन गेला माधव . .. गोकुळिचा राजा माझा . .. .. गोपाला गोपाला देवकीनंदन .. .. . गोमू माहेरला जाते हो … . गोरी गोरीपान फुलासारखी . … गोरी बाहुली कुठुन आली . .. गंगा आली रे अंगणी .. .. .. गंध हा श्वास हा .. . . . घन घन माला नभी . . .. . घननीळा लडिवाळा . . … घनश्याम नयनीं आला … .. … घर हीच राजधानी . .. चल ग सये वारुळाला . . . … चल सोडून हा देश . .
चला राघवा चला .. … .. चला सख्यांनो हलक्या .. .. … चापबाण घ्या करीं . .. . . चाल बैला चाल . . . चाल राजा चाल सर्जा . .. . .. चंदाराणी चंदाराणी का ग … . . . चंद्र आणखी प्रीती .. … चंद्रावरती दोन गुलाब …. . चांद किरणांनो जा जा . .. .. .. चांद मोहरे चांदणे . . .. चांदणे झाले ग केशरी .. . . . चांदण्यात चालु दे … . चांदोबा चांदोबा भागलास .. .. चिंचा आल्यात पाडाला . … … चिंधी बांधिते द्रौपदी . .. जग हे बंदिशाला . … जन्मच हा तुजसाठी … . . जय जयकारा करा गर्जू . … .. . जय जवान जय किसान . .. . . जळते मी हा जळे दिवा .. . . . जा झणि जा रावणास सांग . . . …. . जा बाळे जा . . . जा मुलि शकुंतले सासरी . .. .. जाग रे यादवा . … जाण आहे आपणांसी मी .. .. ….
जाशिल कोठे मुली तू . जाहली जागी पंचवटी .. . … जाळीमंदी पिकली करवंद .. . …. जिण्याची झाली शोककथा . . .. जिवलगा कधि रे येशील तू … . जुळत आली कथा . .. .. जेथें राघव तेथें सीता .. . जो जो जो बाळा .. जोगिया . जिंकू किंवा मरू . . ज्येष्ठ तुझा पुत्र मला . . . .. झटकून टाक जिवा .. . . झडल्या भेरी झडतो … .. झरा प्रीतिचा का असा .. . . .. झाडावरती घडे लटकले …. . … झाला महार पंढरिनाथ .. .. … झाली ग बरसात फुलांची . . .. . झाली भली पहाट . . .. झाले ग बाई संसाराचे . . . … झुक झुक झुक झुक अगीनगाडी . . झांजीबार झांजीबार .. .. डोहाळे पुरवा रघुकुलतिलका . .. … डोळ्यापुढे दिसे गे मज . . डोळ्यांत वाच माझ्या . . .. ताईबाई अता होणार लगीन .. .. . .
तात गेले माय गेली .. .. तिन्हीसांज होते तुझी याद . .. तुझी रे उलटी सारी . . तुझे नि माझे इवले गोकुळ . . तुझे रूप चित्ती राहो . तुझ्या कांतिसम रक्तपताका . .. .. तुझ्या मनी तेच माझ्या . . .. तुम्ही माझे बाजीराव . .. तुला पाहते रे तुला . .. . तुला या फुलाची शपथ . . . .. ते माझे घर ते माझे . . . तोडितां फुलें मी सहज . .. तंबाखूची रसाळ पोथी .. .. तांबुस गोरा हात साजिरा . . .. .. त्या तिथे पलीकडे तिकडे . .. . थंडीची झोप मला . .. थांब सुमंता थांबवि . .. .. दशरथा घे हें पायसदान …. दहा वीस असती का रे .. .. . दाटला चोहिकडे अंधार … . .. दिलवरा दिल माझे ओळखा .. . .. दिवा लाविते दिवा . . . दूर कुठे राउळात दरवळतो .. … देव देव्हार्याअत नाही .. . देवा दया तुझी की . ..
देश हीच माता .. दैव जाणिले कुणी . . दो दिसांच्या संगतीची .. .. धक्का लागला ग .. … . धन्य मी शबरी .. .. धाव-पाव सावळे विठाई . .. .. . धुंद मधुमती रात रे .. .. धुंद येथ मी स्वैर . धौम्य ऋषी सांगतसे .. … नका गडे माझ्याकडे .. . … नको करूंस वल्गना रावणा . . … … नको बावरूनि जाऊ . .. . नको मारूस हाक . . .. नको रे जाउं रामराया . . . .. नको रे बोलूस माझ्याशी . .. नकोस नौके परत फिरूं . . .. नवल वर्तले गे माये .. .. . नवीन आज चंद्रमा . .. … नसे राउळी वा नसे मंदिरी . . . . . नाकात वाकडा नथीचा .. … .. नाच रे मोरा अंब्याच्या . . … नाच लाडके नाच . .. . नाचनाचुनी अति मी . . . नाविका चल तेथे .. . निघाले असतिल राजकुमार . .. ..
निजरूप दाखवा हो . … निळा समिंदर निळीच . .. नीज वो श्रीहरी चांद ये . . न्याहरी कृष्णाची घेउनी .. . पक पक पकाक . . .. पतित पावन नाम ऐकुनी . .. .. . पदरावरती जरतारीचा ….. … पराधीन आहे जगतीं .. .. .. पहिले भांडण केले कोणी . .. पळविली रावणें सीता .. .. . पाठ शिवा हो पाठ शिवा .. . .. . पाण्या तुझा रंग कसा .. . . .. पाण्यात पाहती का माझे .. .. . . पावसात नाहती लता … .. .. .. पार्वती वेची बिल्वदळें .. .. पाहिली काय वेलींनो . .. पात्रापरी नदीच्या रस्ता … .. .. पेटवी लंका हनुमंत . .. .. पोटापुरता पसा पाहिजे . .. … . पिंगा घाल ग गौळणी . . . .. प्रथम तुज पाहता .. … प्रभातसमयो पातला .. .. … प्रभो मज एकच वर . . . . प्रिया तुज काय दिसे . . प्रीतिच्या पूजेस जाता . ..
प्रीती प्रीती सारे म्हणती . .. प्रेमवेडी राधा साद घाली .. .. . प्रेमात तुझ्या मी पडले . . .. फड सांभाळ तुर्याीला ग . .. .. . फुला फुला रे फुला . . . फांद्यावरी बांधिले ग … . . बघुन बघुन वाट तुझी . . .. बदलती नभाचे रंग कसे … .. . बसा मुलांनो बसा सांगतो .. . .. .. बहरला पारिजात दारी …. .. . बाई माझी करंगळी मोडली . . … . बाई मी पतंग उडवीत होते . .. . बाळ तुझे नवसाचे- यशोदे .. … बाळा जो जो रे .. बिनभिंतीची उघडी शाळा . बियावाचुनि झाड वाढते .. . .. बुगडी माझी सांडली ग . . .. . बैल तुझे हरणावाणी . …. बोल ग मैने बोल . . बोलले इतुके मज श्रीराम . . . भावूक दोन डोळे . भूवरी रावणवध झाला . .. .. .. मज आवडले हे गाव . …. .. मज नकोत अश्रू घाम . . . . मज सुचले ग मंजुळ . . . .
मज सांग अवस्था दूता . . … . मज सांग लक्ष्मणा जाउं . . … . मथुरेत मी गोकुळी कान्हा . .. मधु इथे अन्‌ चंद्र . . .. मधुराणी तुला सांगू का .. . . . मधुरिके नाच चंद्रिके . . . मनोरथा चल त्या … . . मला आणा कोल्हापुरी साज .. … . .. महेशमूर्ती तुम्ही सभाजन . माझा होशिल का .. . माझे दुःख न जाणे कोणी . . . . माझं ठरल्यालं लगीन .. …. . माझ्या रे प्रीती फुला .. . माता न तूं वैरिणी .. . . मानसी राजहंस पोहतो .. .. . माय यशोदा हलवी .. .. .. मार ही ताटिका रामचंद्रा .. .. … मिटुन डोळे घेतले मी . मी आज पाहिला बाई .. .. . मी गुणगुणते अबोध काही .. . . मी तर प्रेम दिवाणी . . मी तुमची जाहले . .. मी पुन्हा वनांतरी फिरेन . … मी भीक मागणारी … मी वाजवीन मुरली .. .
मीच गेले जवळ त्याच्या .. … मीच माझ्या धामी रामा .. . .. मुक्कामाला र्हारवा पाव्हणं … .. … मुलुख त्यात मावळी . . .. मैना राणी चतुर-शहाणी .. . . .. मोठंमोठं डोळं तुझं . . . . मोडुं नका वचनास-नाथा .. … .. यश तेची विष झाले . . यशवंत हो जयवंत हो .. … या इथें लक्ष्मणा बांध . … . या कातरवेळी (१) . .. (1) या कोकणात आता . .. … या घरची मी झाले . . . या चिमण्यांनो परत फिरा . .. .. . या डोळ्यांची दोन पाखरें . . .. या सुखांनो या (१) . . . (1) याचका थांबु नको … . . याल कधी हो घरी .. . . ये निद्रादेवी . येणार नाथ आता . . … येणे-जाणे का हो सोडले . . . योग्य समयिं जागविलें . .. .. रघुवरा बोलत कां नाहीं … . . . रघुवीर आज घरी . .. . रचिल्या कुणि या प्रेमकथा .. . ..
रम्य ही स्वर्गाहून लंका .. .. रागारागाने गेलाय्‌ निघून .. .. . रानांत सांग कानांत .. . .. रानी लिंबास आला बहार . . … .. राम जन्मला ग सखी . … . . रामचंद्र स्वामी माझा … . .. रामा रघुनंदना .. …. रामाविण राज्यपदीं कोण .. … रंग फेका रंग रे . . . रंगवि रे चित्रकारा .. … रंगुबाई गंगुबाई हात .. .. .. रंगू बाजारला जाते हो . …. . लढा वीर हो लढा लढा .. .. .. लपविलास तू हिरवा चाफा … .. .. लळा-जिव्हाळा शब्दच .. .. .. लक्ष्मणा तिचींच ही पाउलें … . लाकडाच्या वखारीत …. .. लाज वाटे आज बाई .. . .. . लाडके कौसल्ये राणी .. .. . लावियले नंदादीपा .. … लीनते चारुते सीते . . लोकसाक्ष शुद्धी झाली .. . . लंगडा ग बाई लंगडा … . . … लिंबलोण उतरू कशी . . . वनवास हा सुखाचा … . ..
वळते वाट चढता घाट .. .. … . वाजवि मुरली श्यामसुंदरा .. . . वाजवी पावा गोविंद .. .. वारा सुटे सुखाचा .. .. वालीवध ना खलनिर्दालन . . . . .. विकत घेतला श्याम . .. . विझले रत्नजदीप नगरात . .. … विठ्ठला तू वेडा कुंभार .. . . विठ्ठलाच्या पायी थरारली … . … वेदमंत्राहून आम्हां .. … शपथ तुला प्रेमा .. . . शपथ या बोटांची .. . . शब्द शब्द जुळवुनि . . . शेपटीवाल्या प्राण्यांची … .. शोध शोधता तुला .. . सजणाच्या मर्जीखातर …. . .. सन्मित्र राघवांचा सुग्रीव .. …. सप्रेम नमस्कार विनंती . … . समचरण सुंदर …. . सरयू तीरावरी अयोध्या .. .. .. सहस्त्र रूपे तुम्ही सदाशीव … ‘सा’ सागर उसळे कैसा . .. . .. साडी दिली शंभर . .. सासरच्या घरी आले … . .. सासुर्यातस चालली लाडकी .. .. ..
सुखद या सौख्याहुनि . . .. सुग्रीवा हें साहस असलें . .. .. सुटले वादळ झाड . .. . सुरावटीवर तुझ्या उमटती … . .. सूड घे त्याचा लंकापति .. … सेतू बांधा रे सागरीं .. .. सैनिक माझे नाव . . .. सैनिक हो तुमच्यासाठी . … संथ वाहते कृष्णामाई .. .. .. सांग ना मला गडे . . .. . सांग सख्या तुज काय . .. .. सांगा या वेडीला .. . . सांवळा ग रामचंद्र … . …. सांवळाच रंग तुझा …. . . सौंदर्याची खाण पाहिली … . . स्ना न करिती लोचने . . . स्वप्नाखवरी स्वप्न पडे … .. . स्वयें श्रीरामप्रभु ऐकती . . . स्वयंवर झालें सीतेचे … . स्वर उमटावे शुभंकरोती . .. स्त्रीलजन्मा ही तुझी कहाणी .. .. हरवले माझे काही तरी … . . . हरि तुझी कळलि चतुराई . .. .. हले डुले हले डुले . . ही कुणी छेडिली तार ..
हीच ती रामांची स्वामिनी .. . हुकुमाची राणी माझी . . . हे कधी होईल का . . हे गीत जीवनाचे .. हे चिंचेचे झाड दिसे . हे राष्ट्र देवतांचे .. .. हे वदन तुझे की .. हेच ते ग तेच हे ते . हेच ते चरण अनंताचे .. … होणार स्वयंवर तुझे . … होशी काय निराश . . हृदयि प्रीत जागते . .. श्रावण आला ग वनी .. … . . श्रीहरी विदुराघरि पाहुणा . . . त्रिवार जयजयकार रामा . ..

Also Visit : https://www.postboxlive.com

माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!