Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

shivjayanti शिवजयंती व भीमजयंती ..!

1 Mins read

हिंदू धर्मातील मराठी नववर्षातील पहिला सण गुढीपाडवा कोणी भगवा ध्वज उभारून छत्रपती संभाजी राजांचा स्मृतिदिन साजरा केला तर कोणी पारंपरिक गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला.

यानिमित्ताने आपल्या व्हॅाटसअप विद्यापीठात आपण बरेच काही वाचले. पाहिले. पण त्यातून आपण नेमके काय घ्यायचे हे ठरवणे महत्वाचे..! ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमतां.. ‘ या संत तुकारामांच्या वचनाप्रमाणे आपण शांतपणे, सखोलपणे विचार करून वागण्याची व विचार ठाम करायची गरज मी यानिमित्ताने अधोरेखित करते.

एप्रिल महिना मराठी चैत्र महिना वसंत ऋतूचे आगमन होताच वेगळाच आनंद होतो. निसर्ग आनंदाने डोलू लागतो. तसेच हा महिना आपल्यासारख्या अनेकांना वैचारिक मेजवानी देणारा असतो असे मला वाटते.

३ एप्रिल शिवपुण्यतिथी, ७ एप्रिल आरोग्यदिन, १० एप्रिल डॅा. पंजाबराव देशमुख स्मृतीदिन, ११ एप्रिल महात्मा फुले जयंती, १४ एप्रिल डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २३ एप्रिल कर्मवीर वि.रा. शिंदे स्मृतीदिन, २९ एप्रिल वीर उत्तमराव मोहिते स्मृतीदिन, ३० एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती आता आपण साजरी करणार आहोत. shivjayanti शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॅा. बाबासाहेब आंबेडकर हे नाचून साजरे करायचे विषय नसून वाचून साजरे करायचे विषय आहेत असे गेले कित्येक वर्ष आपण सांगत आहोत.

वैचारिक shivjayanti शिवजयंती व भीमजयंती व्हावी अशी आज काळाची गरज असताना shivjayanti  ‘भीमजयंती ही डी.जे. लावूनच साजरी होणार’ असे काही नेतेच आज सांगत आहेत यामागे नेमके काय आहे हे पाहाणे जास्त गरजेचे आहे. आनंदोत्सव साजरा करणे किंवा होणे हे वाईट किंवा चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. पण तो कशा पध्दतीने करावा हे ही आता ठरवण्याची वेळ आली आहे. किती वर्ष आपण केवळ डी. जे. लावून फक्त नाचणार आहोत..? मग वाचणार केव्हा ? किंवा वाचत नसू तर ऐकणार केव्हा..?

अगदीच कोणी वाचत नाही असेही मी मांडत नाही. गेल्या काही वर्षात आता बहुजन पुस्तके खरेदी करू लागलेत, वाचू लागलेत, पुस्तके भेट देऊ लागलेत ही एक सकारात्मक बाब आहेच. पण चांगल्या गोष्टींचा वेग नेहमीच कमी असतो हे मात्र खरं..! परंतु आपण चांगल्या गोष्टी व विचार हे सतत बोलत रहायला हवे. मांडत रहायला हवे. तसेच सामाजिक अभिसरण हे निकोप चर्चेतून व्हायला हवे. ते मात्र फार कमी होते. संवाद व समजून घेणे. परस्परांच्या मतांचा आदर करणे हे दुरापास्त होत चालले आहे. राज्यकर्ते द्वेषमूलक राजकारणात गुंतले आहेत. यात सामान्य माणूस भरडला जात आहे.

       तरीही shivjayanti  शिवजयंती व भीमजयंती ही एकत्रित होणे हे सामाजिक अभिसरणाचे एक मोठे काम होत आहे ही एक जमेची बाजू आहे हे नाकारून चालणार नाही. पण आपण बहुजनांनी आता त्यात थोडा थोडा बदल करायला हवा. आणि तो फक्त जयंतीपुरताच नव्हे तर आपल्या बांधव व भगिनींचे वैचारिक प्रबोधन होईल यादृष्टीने वर्षभर काही विविध सामाजिक व वैचारिक प्रबोधन उपक्रम राबवले पाहिजेत.

तरच या जयंतीदिनी सारेचजण काही बदल नक्की करतील. ती shivjayanti जयंती केवळ फटाके, दारू, डी.जे. लावून नाचणे यापुरती सीमीत राहाणार नाही. डॅा. बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने समाजात पोहोचलेच नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागते. त्यांचे पुस्तक प्रेम सर्वांनाच ऐकून माहीत आहे पण आपण सारे पुस्तक प्रेमात बुडू असे कितीजणांना वाटते..? हा खरा प्रश्न आहे.

Also Read : https://www.postboxindia.com/gudi-padwa-2022-why-gudi-should-saffron-flag/

डॅा. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली हे सर्वांनाच माहीत आहे. ती आता सर्रास सत्काराला दिली जाते पण देणाऱ्याने व स्वीकारणाराने ती आयुष्यात एकदा तरी वाचून समजून घेऊ आपले हक्क, अधिकार व कर्तव्ये पाहू व त्यातील समता, समानता, बंधुता व न्यायाप्रमाणे वागू असे कधी वाटणार आपल्याला ? आज आपल्या भारतात हे हिंदूंचे राज्य किंवा हिंदूमय भारत व्हावा म्हणून प्रयत्नात तर काही जण बौध्दमय भारत व्हावा म्हणून प्रचार प्रसार करतात. सर्वधर्मसमभाव असे असलेल्या या आपल्या देशात घटनेने सर्वांना जे काही दिले त्याचा आदर करायचा सोडून घटनेला डावलण्याचे किंवा नाकारण्याचे षडयंत्र ही कित्येकदा होताना दिसत आहे.

डॅा. बाबासाहेबांनी हिंदू कोड बील पास व्हावे म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तरीही ते हिंदूचे का होऊ शकले नाहीत.? छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना जातीत वाटायचे काम काही नतद्रष्ट लोक करत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. आपण हे सारं समजून घ्यायला हवं.

डॅा. बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट प्रथा, परंपरांचा तसेच इतर सर्व धर्माचा अभ्यास करून बौध्द धर्म स्वीकारला.एक मोठे धर्मांतर तेव्हा झाले. बौध्द धम्माच्या प्रतिज्ञा आपणां सर्वांना माहीत आहेत मग त्याचे आचरण आपले बौध्द धर्मीय बांधव कधी करणार .? ते आचरण केले तरीही कुटुंब व समाजातील अनेक प्रश्न कमी होतील. 

गौतम बुद्धांची शांतता, बुध्दी, त्यांनी सांगितलेला मध्यम मार्ग याची चर्चा आपण करतो पण ते आत्मसात करून आचरणात केव्हा येणार ?
महाराष्ट्राला संतपरंपरा, इतिहास आहे. चळवळी या महाराष्ट्राचा जीवंतपणा आहे. पण आज अनेक चळवळी नामशेष होताना दिसतात. त्याचे कारण आपण कधीतरी शोधणार आहोत की नाही? किती वर्ष केवळ प्रस्थापित व सनातनी धर्माला शिव्या देण्याचे महान काम आपण करत राहाणार ?

Also Visit : https://www.postboxlive.com

इतिहास समजून घेऊन आपण पुढे जाणार आहोत की नाही ? आपण चळवळीत फूट का पडते ? ती डळमळीत का होते ? याची कारणे शोधून त्यावर काही उपाययोजना करणार आहोत की नाही ?
की हे असे होत राहाणार असे समजून आपणच आपले पाय ओढत राहाणार.

माणूस हा उत्सवप्रिय प्राणी. सण समारंभात रमणारा. पण संतांनी, चळवळीतील सुधारकांनी, पुढे विचारवंतांनी काही अभ्यास करून नवी मांडणी केली. विविध धर्मातील अनिष्ट चालीरिती, परंपरा, कर्मकांड, अंधश्रध्दा यावर प्रहार केले. त्यातील फोलपणा लक्षात घेऊन काहीजण बदलले.

पण सामान्य माणसाला पर्याय हवा. तेव्हा नवे पर्याय दिले. तेही स्वीकारले. आणि मग माणूस परत त्यातच गुंतू लागला. बौध्द धर्म स्वीकारलेली अनेक कुटुंब आज हिंदू व बौध्द दोन्ही धर्मातील सण समारंभ साजरे करतात. याचाही विचार यानिमित्ताने करायला हवा. आपण नेमके काय करायला हवे ?

जे करतोय ते का करतोय ? नाही केले तर काय होईल ? असे प्रश्न जेव्हा पडतील तेव्हाच माणूस उत्तरे शोधायचा प्रयत्न करेल.
यासाठी ‘वाचाल तर वाचाल ..!’ हा डॅा. बाबासाहेबांनी दिलेला मंत्रच आपल्याला तारल्याशिवाय नाही राहाणार.!!!

-ॲड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!