POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

शरद पवारांनी कृषिमंत्री म्हणून काय केलं ?

शरद पवार

शरद पवारांनी कृषिमंत्री म्हणून काय केलं ?

देशाचं राजकारण हे भयावह स्थितीतून प्रवास करीत आहे.द्वेषाचा,धर्माचा आधार घेत राजकारण कधीच समृद्धी घेऊन येत नाही,येणार नाही.आज मागील 9 वर्षात मोदी सरकार मधील कृषिमंत्री कोण-कोण होऊन गेले,त्यांचा कार्यकाळ व त्यांची कामगिरी आठवायला संशोधक ठेवावे लागतील.

मोदी सरकार मध्ये जर कुणाचे काम दिसत असेल तर ते फक्त आणि फक्त नामदार नितीन गडकरी ह्यांचे.त्यांच्या याच कामावर भाजप कार्यालय कशी बांधली गेली हा वेगळा भाग होऊ शकतो.मुघलांना लाज वाटेल एवढे तगारी काम मोदी सरकारने केले.कारण त्यात खूप काही दडलेले आहे.असो!

आजचा तो विषय नाही.मात्र,कृषिमंत्री म्हणून माननीय शरद पवारांनी काय केले हे नवतरुण मित्रांना सांगणे अनिवार्य ठरत.बरेच वेळा आम्ही सुद्धा अल्पबुद्धी ने पवार ह्यांच्यावर वेळप्रसंगी टीका केलीच आहे.माझ्या भाकर चित्रपटात सुद्धा आम्ही कृषिमंत्री म्हणून त्यांच्यावर विदर्भातील शेतकरी आत्महत्या प्रकरणात टीका केली आहेच.

मात्र त्यांचे कार्य एका भाषणातील एका वाक्यात संपुष्टात येईल, चहा बनविण्याचे एवढं सोपं काम नाही. UPA सरकार स्थापन होते वेळी काँग्रेस च्या नेत्यांना वाटलं होतं.पवार सौरक्षण,अर्थ, गृहमंत्री ही खाती मागतील.मात्र,धकातंत्र देण्यात माहीर असेलला हा पेहलवान जगात प्रसिद्ध आहे.त्यांनी चक्क साईड ला पडलेलं कृषी खात मागितलं.

तेव्हा सर्व सरकारमधील पक्ष थक्क झालेल्या अवस्थेत होते.23 मे 2004 ला कृषिमंत्री म्हणून विराजमान झालेले पवार साहेब 26 मे 2014 ला सरकार गेल्याने 10 वर्ष 3 दिवस या पदावर राहिले हा सर्व सरकारातील एवढी वर्ष एकच व्यक्ती कृषिमंत्री म्हणून राहण्याचा इतिहास साहेबांच्या नावावरच आहे,बरे.असो! पवारांनी सर्वप्रथम कृषी संलग्न सर्व खाती ही वेगवेगळ्या माणसाकडे असायची त्यांची एकसूत्रता बांधत,पशुपालन,अन्न प्रक्रिया,नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, जलसंधारण ही खाती एकहाती घेतली.

पदभार घेताच सर्वप्रथम सर्व कृषी वैद्न्यानिक, संशोधकांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेत.ज्या भारतातील कृषी संशोधन कार्यात ICAR या संशोधक संस्थेत 5 हजार संशोधक काम करतात,तेथील रिक्त 500 जागा ताबळतोब भरल्या.FAO या जागतिक पातळीवर काम करणाऱ्या फूड,ऍग्री संस्थेत सर्वांसोबत काम केले.ICAR या संस्थे अंतर्गत येणाऱ्या 80 संस्थांना प्रथम स्वय्यता दिली.त्यांचे वरवांवर मंत्रालयात कामासाठी येणे बंद करून भरपूर निधी दिला.त्यामुळे त्यांचे लक्ष कृषी संशोधन करण्यात लागले.

10 वर्ष 3 दिवसात पवारांनी तालुका पातळीवर कृषी विज्ञान केंद्र ची उभारणी केली.1974 ते 2004 पर्यंत भारतात फक्त 30 वर्षात 290 कृषी विज्ञान केंद्र होते.2004 ते 2014 या 10 वर्षात नवीन 340 केंद्र उभी झाली.तसेच मोठा विषय म्हणजे याच काळात नवीन 138 कृषी विद्यापीठ निर्माण करण्याचे कार्य सुद्धा पवारांच्या यादीत जात.पंजाब,हरियाण, मध्य प्रदेश येथे जे गव्हाचे उत्पादन वाढले,जागतिक स्तरावर गहू निर्यातदार देश झाला तो सर्व कामाचा झंझावात म्हणजे शरद पवारांचे दिवसात 18 तास काम करणे होय.

प्रत्येक तासाला कपडे बदलवून फिरण्या सारखे,मशरूम चे सूप पिणे व मोराला दाणे टाकत फोटो काढण्याचे काम नाही ते. वाचक मित्रांनो! 2004 पर्यन्त देश खाद्यतेल आयातीवर 60 हजार कोटी खर्च करीत होता.2004 ते 2014 या कालखंडात कृषिमंत्री म्हणून जे तेलबिया वाढीवर कार्य झाले,त्यामुळे खाद्यतेल आयत फक्त 15 हजार कोटीत आली.राष्ट्रीय फळबाग उत्पादन कार्यक्रम अनुसार 2003/4 फळ उत्पादन 48.8 दशलक्ष मेट्रिक टन होते,2011/12 ला ते 78.1दशलक्ष मेट्रिक टनावर गेले म्हणजे ग्रोसरेट किती वाढला?

भाजीपाला 2003 ला 143 दशलक्ष टन 2013 ला 235 दशलक्ष टन.हा विक्रम कृषिमंत्री शरद पवारांनी केला.नाल्यातून गॅस काढून त्यावर पकोडे ताळण्या सारखे काम नव्हे.मित्रांनो! तुम्हाला खास करून सांगतो. 2012 ला संयुक्त राष्ट्र संघाचे,अन्न व कृषी संशोधन महासंचालक जॉन कॉर्डिन ह्यांनी भारताला जागतिक अन्न धान्य पुरवठा करणारा मोठा देश बनविल्या बद्दल,धन्यवाद पत्र लिहिले व दिले ते नाव सुद्धा कृषिमंत्री शरद पवार हेच होय भारतातील लघू, मध्यम शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत जगात तांदूळ 100 दशलक्ष टन व धान्य 250 दशलक्ष टन निर्यात करणारा देश म्हणून 2004 ते 2014 हाच कालखंड होय.

2004ला 3.4दशलक्ष टन तांदूळ उत्पादित करणारा देश 2012/13 ला 10 दशलक्ष टन तांदूळ निर्यात करतो.हे फेकाफेकू करण्याचे काम नव्हते.2004 ला 6.2अब्ज टन शेतमाल निर्यात करणारा देश 2012/13 ला 39 अब्ज टन शेतमाल निर्यातदार झाला.कापूस 2003 ला 15.1 दशलक्ष टन गाठी निर्यात ते 2012/13 ला 34.6 दशलक्ष टन गाठी निर्यात करणारा कृषिमंत्री शरद पवार हेच होय.शेतकरी मित्रांनो! पवारांनी शेतीला पतपुरवठा सुरडीत व्हावा.या करिता पीककर्ज 12% वरून 4%वर आणले.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज माफी दिली.

देशातील सर्वात मोठी पीककर्ज माफी कोणतेही तत्वतः निकष न लावता केली.2004 ते 2014 या कालखंडात तंदुळचे हमीभाव 138% गहू 122%कापूस114% सोयाबीन198% तूर216% नि वाढ झाली.ही हमीभाव वाढ आजही मोदी सरकार देत नाही.शेवटची एक विशेष बाब भारतात 2003/4 ला 1लाख 71हजार 657 ट्रॅक्टर विकल्या गेले होते.

2013/14 ला 634151 एवढी ट्रॅक्टर विक्री झाली.हे काम आहे,सह्यांद्रीच्या वाघाचे.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ! 10वर्ष 3 दिवसाचा कार्यकाळ लिहायला घेतला तर हजरो पानांचा इतिहास लिहिला जाईल. शरद पवार हे एकमेव अडचन आहे.2024 च्या सत्तेआड येणारी.कितीही बदनाम करा.सूर्यावर थुंकल्या जात नसते. तूर्त थांबतो. 

विजय पोहनकर 

9579141618


Discover more from Postbox India

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Content is protected !!

Discover more from Postbox India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading