Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRAPostbox Marathi

Real story – सोन्याची नाणी

1 Mins read
  • Shihab ed-din Muhammad Shah Jahan badshah ghazi sahib qiran sani.
  • "बादशाह गाझी मोहम्मद शाहजहाँ शहाबुद्दीन के साहब फरमान" (गाझी म्हणजे युद्ध जिंकलेला) तसेच गिन्नीच्या दुसऱ्या भागावर 'कुरान ए शरीफ' मधील पहिला सुरा लिहिलेला आहे. जवळपास ११ ते १२ ग्रॅम वजनाच्या ह्या एका नाण्याची आजची बाजार किंमत ५५ ते ते ६० हजार रुपये आहे.

 

 

३१ मे १९७४ चा दिवस उजाडला तो नेहमीप्रमाणेच; पण काहीतरी वेगळं घेऊन! पहाटे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला नदीपात्रात जे दिसलं ते बघून त्याला हर्षवायू झाला नाही हेच नवल..!

सोन्याची नाणी

Real story – सोन्याची नाणी

काय नेऊ…? किती नेऊ…आणि कसं नेऊ…? या संभ्रमात असतानाच त्याने आपल्या हाती लागतील तितक्या ‘सोन्याच्या गिन्न्या’ (सोन्याची नाणी/शिक्के) घेतल्या आणि तो घराकडे निघाला. हळूहळू ही वार्ता शेजाऱ्यांमध्ये पसरली.

…मग काय? बघता बघता सारा पातूर गाव नदीपात्रात उलटला. ज्याला जे आणि जितकं नेता येईल तितकं, जो तो वाट्टेल तसा नेऊ लागला. विदर्भातील ‘मे’ महिन्याच्या प्रखर उन्हात गावकरी दसऱ्याच्या सोन्यासारखं खरंखुरं सोनं लुटत होते…जणू प्रत्येक घरात एक अलीबाबा तयार झाला होता..!

हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पोलीस स्टेशनपर्यंत गेली. त्यावेळी पातूरचे ठाणेदार श्री. राजे साहेब होते. त्यांनी लगेच पोलिस अधीक्षक श्री. पद्मनाभन यांना संदेश पाठवला. पद्मनाभन साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री श्री. रत्नाप्पा कुंभार यांना हा संदेश पाठवला. त्यांनंतर ही बातमी मुख्यमंत्री मा. श्री. वसंतराव नाईक यांच्यापर्यंत गेली. तेथून थेट दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात पोहोचली. नंतर ही बातमी ब्रेकिंग न्यूज होऊन भारतापुरती मर्यादीत न राहता BBC लंडनपर्यंत जाऊन पोहचली आणि या खजिन्याने पातूरला जागतिक पातळीवर नेऊन ठेवलं..!

‘कलम १४४ लागू करा’ हा आदेश येईपर्यंत जवळपास ९० टक्के खजिना लुटला गेला होता. पोलीस बंदोबस्तात केवळ ३६ किलो वजनाच्या ३२६२ सुवर्ण मुद्राच शासन दरबारी जमा होऊ शकल्या.

त्यादिवशीचा तो प्रसंग नुसता डोळ्यासमोर आणला तरीही थक्क झाल्यासारखं होतं. ज्यांनी तो अनुभवला असेल त्यांचं काय झालं असेल, याची आपण कल्पनाच केलेली बरी..!

होय..!

पहाटेच्या स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट स्वप्नातील नाही तर अगदी खरीखुरी आहे.

अकोला जिल्ह्यातील ‘पातुर’ या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ‘बोर्डी’ नदीच्या पात्रात ३१ मे १९७४ रोजी पहाटे बादशहा शहाजहानच्या काळातील सोन्याची शेकडो किलो नाणी (मुघलकालीन) अचानक सापडली. ही नाणी तिथे नेमकी कशी आली? याचा शोध घेतला असता इतिहास हाती लागला तो असा.

इ. स. १६२८ ते १६५८ या काळात मुघल बादशहा शहाजहान हा गादीवर होता. त्यावेळी देशात अनेक ठिकाणी मुघल साम्राज्य पसरलेले होते किंवा त्यांचे काही मांडलिक राजे राज्य करत होते. शहाजहानचा सरदार ख्वाँजा जहाँ हा ‘गोवळकोंडा’ येथून खंडणी वसूल करून ती सुरतच्या ठाण्यात जमा करण्यासाठी निघाला होता. मजल-दर-मजल करत त्याचे सैन्य हत्ती, घोडे, बैल आणि उंटांवर लादलेली खंडणी घेऊन प्रवास करत करत विदर्भातील पातुर या गावात पोहोचले.

पातूर गावा नजीकचा हिरवागार परिसर बघून त्यांनी तेथील ‘बोर्डी’ नदीच्या काठावर आपल्या सैन्याचा पाडाव टाकला. त्याकाळात साधारणत: पाण्याची मुबलकता जिथे असेल तिथे मुक्कामाचे ठिकाण निवडले जाई. परंतु हा खजिना इथे जमिनीत कसा गाडला गेला? याबद्दल मात्र काही कयास लावले जातात.

हा भला मोठा खजिना घेऊन सैन्य या मार्गाने जात आहे ही वार्ता शत्रू सैन्याला कळली असावी. साहजिकच शत्रूच्या हाती खजिना लागू नये म्हणून तो जमिनीत लपवला गेला असेल. कदाचित घनघोर लढाई होऊन त्यात खाँजा जहाँचे सैन्य मारले गेले असावे किंवा खजिना नंतर काढून नेऊ, या विचाराने सैन्य तेथून पळून गेले असावे.

हा खजिना सापडला त्या ठिकाणाहून काही अंतरावर सोन्याच्या गिन्नीवर (नाण्यांवर) असलेली नाममुद्रा कोरलेले काही शिलालेख होते व त्यावर ज्याठिकाणी ह्या गिन्न्या सापडल्या त्या ठिकाणाकडे अंगुली निर्देश करणारे काही दगड रोवलेले होते, असे जुने लोक सांगतात.

इ.स. १६२८ ते १६५८ या काळात ‘बोर्डी’ नदीकाठावर गाडला गेलेला हा सोन्याच्या नाण्यांचा खजिना जवळपास ३२८ वर्ष जमिनीच्या पोटातच राहिला. १९७१ साली तब्बल ३६ तास पडलेल्या संततधार पावसाने नदीला भला मोठा पूर आला होता. नदीचे दोन्ही काठ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले, पण खजिना उघडा पडायला मात्र १९७४ सालचा मे महिना उजाडावा लागला..!

पुढील दोन-तीन वर्षात पुराच्या पाण्यामुळे नदीचे काठ खचत-खचत खजिन्यापर्यंत गेले. शेवटी मे महिन्यात जमिनीच्या होणाऱ्या धुपेमुळे अचानक काठाची माती खचली आणि जमिनीच्या पोटातील घबाड उघडे पडले..!

भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, असे म्हणतात. परंतु चक्क मे महिन्याच्या कडक उन्हात पातुरच्या ‘बोर्डी’ नदीपात्रात सोन्याच्या गिन्न्यांचा पिवळा पूर वाहत होता.

या सोन्याच्या नाण्यांवर फारसी भाषेत लिहिलेले फरमान असे आहे-

सोन्याची नाणी real story

Shihab ed-din Muhammad Shah Jahan badshah ghazi sahib qiran sani.
“बादशाह गाझी मोहम्मद शाहजहाँ शहाबुद्दीन के साहब फरमान” (गाझी म्हणजे युद्ध जिंकलेला) तसेच गिन्नीच्या दुसऱ्या भागावर ‘कुरान ए शरीफ’ मधील पहिला सुरा लिहिलेला आहे. जवळपास ११ ते १२ ग्रॅम वजनाच्या ह्या एका नाण्याची आजची बाजार किंमत ५५ ते ते ६० हजार रुपये आहे.

घटना घडली त्यावेळी नागपूरहून केंद्रीय राखीव पोलीस दलाला खास बंदोबस्तासाठी पाचारण केले होते. यानंतर पोलीसांनी गावात छापे सुध्दा मारले. श्री. चौबे साहेब यांच्या नेतृत्वात पातूर येथून काही लोकांना बयान/जबाब नोंदवण्यासाठी दिल्ली येथे नेले गेले. पोलीसांच्या भीतीने काही लोकांनी केवळ २०० ते ३०० रुपयांमध्ये ह्या गिन्न्या चोरून-लपून विकल्या. ज्यांच्याकडे त्यावेळी पैसे होते, त्यांनी त्या कवडीमोलाने विकत घेतल्या. ज्यांनी विकलं ते कंगाल झाले…ज्यांनी घेतलं ते मालामाल झाले..!

हे अस्सल सोनं विकत घ्यायला, त्यावेळी सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव खान्देश येथील व्यापारी पातूरला ठाण मांडून बसत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांमुळे तेव्हापासूनच या नदीला ‘बोर्डी’ नदी ऐवजी ‘सुवर्णा’ नदी असेही संबोधल्या जाते.

आजही पातुरातील ‘ती’ जागा ‘गिन्नी खदान’ म्हणून ओळखली जाते. बोर्डी नदीपात्रात त्या जागेच्या आसपास आणखी बराच खजिना लपवलेला असेल, असा लोकांचा गैरसमज आहे. त्यामुळे तो मिळवण्यासाठी व आपले नशीब आजमावण्यासाठी काही लोक आजही चोरून, लपून तिथे जमीन खोदायला जातात. रात्र-रात्रभर खोदतात. काही जण मंत्रा-तंत्राचा वापर करतात. कुणाच्या नशिबात काहीच लागत नाही, तर कुणाला एखाद दुसरी गिन्नी सापडल्याची अफवा गावभर पसरते.

खरं काय? खोटं काय? हे बादशहा शहाजहान, त्याचा सरदार खाँजा जहाँ, खजिना वाहून नेणारे ते शेकडो उंट, हत्ती, घोडे, बैल, खजिन्याची सुरक्षा करणारे सैन्य आणि खजिना जमिनीत गाडणारे सैनिक ह्यांनाच माहित..!

 

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: