My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

Postbox MarathiScienceWorld News

suspense story – रहस्य

1 Mins read

एखादा माणूस हवेत विरून जावा तसा एखाद्या जागेवरून अचानक गायब झालेला कधी ऐकलं आहे का ?

३१ मार्च २००६ ह्या दिवशी ब्रायन शेफर नावाचा तरुण अगली टुना सलूना नावाच्या बार मध्ये शिरला आणि त्यानंतर पुन्हा कधी दिसलाच नाही. बारच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ब्रायन आतमध्ये प्रवेश करताना दिसला पण बारमधून बाहेर निघताना दिसलाच नाही.

आता तुम्ही म्हणाल कि ह्या बारला एखादा गुप्त दरवाजा वैगेरे असेल जिथून हा बाहेर निसटला असेल तर तसे पण नाही कारण बारचे सर्व बाहेर जाण्याचे मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत होते आणि पोलिसांनी तपासादरम्यान त्या रात्री बार मधून बाहेर निघणाऱ्या सर्व व्यक्तींची पडताळणी केली होती. इतकेच नव्हे तर ह्या बारच्या आजूबाजूच्या अनेक सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज पण तपासण्यात आली. पण एका पण कॅमेऱ्यात ब्रायन बाहेर निघताना दिसला नाही.

ब्रायन शेफर हा २७ वर्षीय तरुण ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीच्या मेडिकल शाखेत द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. संगीताच्या क्षेत्रात नाव कमविण्याची त्याची इच्छा होती. तरी पण मेडिकल क्षेत्रामध्ये त्याचे भविष्य उज्ज्वल आहे अशी त्याच्या निकटवर्तीयांना खात्री होती.

कॉलेजमध्ये असतानाच त्याची ओळख अलेक्सिस वॅगनर नावाच्या तरुणीशी झाली होती आणि ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. आता काही दिवसांत कॉलेजला सुट्टी पडणार होती आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी म्हणून त्याने आपल्या प्रेयसीसोबत (अलेक्सिस) मियामीला ट्रिप प्लॅन केली होती. ह्या ट्रिप दरम्यान तो तिला लग्नासाठी प्रपोज करणार होता.

थोडक्यात ब्रायनच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरु होत.

suspense story - ब्रायन

suspense story – ब्रायन

३१ मार्च २००६ च्या संध्याकाळी ब्रायन व त्याचा रूममेट विल्यम क्लिंट फ्लॉरेन्स परीक्षेचा थकवा घालवण्यासाठी म्हणून जवळच्या अगली टुना सलूना नावाच्या बार मध्ये गेले. रात्री १० वा. च्या दरम्यान ब्रायनने त्याच्या प्रेयसीला कॉल करून मियामी ट्रिपचा प्लॅन फायनल केला आणि लव्ह यु बोलून फोन ठेवला.

काही वेळानंतर ब्रायन आणि विल्यम बारमधून बाहेर पडले आणि आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारत होते. एक दोन तास झाले असतील नसतील. त्यांना विल्यमचा मित्र मेरेडिथ रीड भेटला. त्याने बारमध्ये पुन्हा जाण्याचा आग्रह केला.

रात्री १.१५ मिनिटांनी हे तिघेही बारमध्ये शिरताना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. २ वा. च्या सुमारास ब्रायन काही कारण काढून बारच्या बाहेर आला. खाली उतरून तो दोन विशीतील तरुणींशी गप्पा मारताना दिसून आला.

खूप वेळ झाला तरी ब्रायन वर येत नव्हता म्हणून बारमध्ये बसलेल्या मित्रांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण अनेकदा प्रयत्न करूनही तो उत्तर देत नव्हता. बार बंद होण्याची वेळ झाली होती आणि ब्रायन तर उत्तर देत नव्हता. शेवटी कंटाळून ब्रायनला मागे टाकून ते दोघे मित्र आपापल्या घरी गेले.

पुढील ८ दिवस ब्रायनच्या कुटुंबाने, मित्रांनी व प्रेयसीने त्याला अनेकदा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण कॉल जोडला जात नव्हता. एव्हाना अलेक्सिस सोबत मियामीला जाण्याची फ्लाईट पण त्याने मिस केली होती.

पोलीस तपास सुरु झाला. पोलिसांनी अनेक लोकांची चौकशी केली. ब्रायनचे मित्र, प्रेयसी, कुटुंब, बारमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच बारच्या खाली ज्या मुलींशी तो बोलत होता त्यांची चौकशी करण्यात आली. तसेच आजूबाजूचे सिसिटीव्ही पण तपासण्यात आले. पण काहीच निष्पन्न होत नव्हते.

ब्रायन ज्या दिवशी गायब झाला होता त्या रात्री उशिरा तो बार मध्ये शिरताना सिसिटीव्ही मध्ये टिपला गेला पण बाहेर पडताना मात्र दिसून नाही आला.

अलेक्सिसने ब्रायनशी संपर्क करण्याचा पुढे अनेकदा प्रयत्न केला पण त्याचा फोन लागत नव्हता. काही महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये एकदा ब्रायनचा फोन लागून तीन रिंग झाल्या होत्या. पण हे संगणक प्रणालीतील एखाद्या चुकीमुळे झाले असण्याची शक्यता वर्तविली जाते.

ब्रायनच्या फोनवर जिपीस प्रणाली उपलब्ध नव्हती त्यामुळे अचूक स्थान शोधून काढणे पण पोलिसांना शक्य होत नव्हते. ब्रायन गायब झाल्यानंतर काही दिवसांनी त्याचा फोन १४ मैल दूरवरील एका टॉवरच्या संपर्कात आला होता पण हि पण एक एरर (चूक) असू शकते.

ब्रायन गायब होऊन आता १६ वर्षांचा कालावधी लोटला आहे पण ब्रायन जिवंत आहे कि मेला, जर जिवंत असेल तर नक्की कुठे आहे आणि जर मेला असेल तर त्या रात्री नक्की त्याच्यासोबत काय घडले ह्याचा उलगडा आजतागायत झाला नाही आहे.

suspense story - ब्रायन बारमध्ये पुन्हा येत असतानाच फोटो

suspense story – ब्रायन

ब्रायन शेफर गायब होण्याच्या केसबद्दल काही शक्यता आपण आता तापासूया.

  1. अगली टुना सलूना बारला मागून एक आपतकालीन दरवाजा होता. त्या दरवाजा बाहेर एक मोठं बांधकाम सुरु होते. दारूच्या नशेत असताना ब्रायनने त्या दरवाजाने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असेल आणि चुकून तो बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या एका मोठ्या खड्ड्यात पडला असेल आणि बाहेर पडत न आल्यामुळे किंवा आपटून त्याचा मृत्यू झाला असावा. पण हि थेरी खरी मानावी तर ह्यात एक मोठी अडचण आहे ती म्हणजे जर ब्रायनचा मृत्यू बारच्या मागील बांधकाम क्षेत्रात झाला असता तर पोलीस तपासादरम्यान त्याचा मृतदेह नक्कीच आढळून आला असता पण असे झाले नाही.

  2. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाले होते. त्याचे आपल्या आईशी खूप जवळचे नाते होते. तसेच ब्रायनला संगीतामध्ये करियर करायचे होते. त्यामुळे त्याने कदाचित आपली जुनी ओळख मागे ठेऊन कुठे तरी दुसऱ्या शहरात जाऊन नवीन आयुष्य सुरु करण्याचा निर्णय घेतला असावा. पण ह्या थेरीत पण एक मोठी अडचण आहे. सिसिटीव्ही कॅमेऱ्यांना चकवून बाहेर निसटण्यासाठी ब्रायनला नवीन कपडे व इतर काही सामान ह्यांची गरज पडली असती. बार मध्ये येताना त्याच्या हातात कोणतीही बॅग दिसून येत नाही आहे. तसेच ब्रायन आपल्या आयुष्यात खुश होता. त्याचे आपल्या प्रेयसी सोबतचे संबंध पण चांगले होते. असं मानून चालूया कि तो बार मधून निसटला तरी पण पुढे जाऊन त्याचा फोन, क्रेडिट कार्ड, आयडी, इ. एकदा तरी वापरला गेला असता. पण असे झालेले दिसून येत नाही.

  3. ब्रायनचा जो मित्र (विल्यम) त्याच्यासोबत बार मध्ये आला होता त्याचा ह्या पूर्ण प्रकरणात हात असावा असे काही लोकांचे म्हणणे आहे. कारण ह्या प्रकाराबद्दल लाय डिटेक्टर टेस्ट (सत्यता पडताळणी) देण्यास त्याने नकार दिला. तसेच पोलिसांनी अनेकदा चौकशी दरम्यान केलेल्या प्रश्नांना वकिलाचा सहारा घेऊन त्याने उत्तर देण्याचे टाळले.

  4. ब्रायन गायब झाला त्या दरम्याने त्या भागामध्ये ‘स्मायली फेस किलर’ने गोऱ्या वर्णाच्या विद्यार्थ्यांचे खून केल्याचे काही प्रकार घडले होते. कदाचित रात्रीच्या काळोखात ब्रायन दारूच्या नशेत रस्त्यावर चालत असताना स्मायली फेस किलर’शी त्याचा सामना झाला असेल आणि त्याने ब्रायनला मारून बाजूच्या नदीत त्याचा मृतदेह फेकला असेल. ब्रायनचा मृतदेह न सापडल्याने ह्या शक्यतेला दुजोरा देता येत नाही. तसेच अगली टुना सलूना बार ज्या भागामध्ये होता तिथे गुन्हे जास्त घडायचे. ब्रायनचा एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाशी सामना झाला असावा.

  5. २०२० साली मेक्सिकोच्या तिजुआना शहरात एक अमेरिकन बेघर व्यक्ती सापडला त्याचा चेहरा ब्रायनशी मिळताजुळता होता त्यामुळे तो ब्रायन असण्याशी शक्यता बळावली होती. पुढे जाऊन पोलिसांनी चेहऱ्याची ओळख पटवणारी प्रणाली वापरून ह्याची सत्यता पडताळली असता तो ब्रायन नसल्याचे निष्पन्न झाले.

  6. कदाचित दारूच्या अति सेवनामुळे किंवा अन्य कारणामुळे बार मध्ये त्या रात्री मृत्यू झाला असावा. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी बारच्या कर्मचाऱ्यांनी पाठीमागील बांधकाम क्षेत्रात ब्रायनचा मृतदेह फेकून त्यावर सिमेंट टाकून पुरावे मिटवले असावेत. किंवा ब्रायन मागच्या दराने चालत जाऊन बांधकाम क्षेत्रात पडला असावा आणि दुसऱ्या दिवशी बांधकाम कर्मचाऱ्यांनी त्यावर सिमेंट ओतून पुरावे मिटवले असतील. 

ब्रायन शेफर सोबत त्या रात्री नक्की काय घडलं हे एक रहस्यच आहे. आपण फक्त तर्कवितर्क लावू शकतो.

suspense story

suspense story

Pros

  • +suspense story

Cons

  • -

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: