Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Pune city पुणे तिथं माणूस ऊणे – समीर मणियार

1 Mins read

पुणे तिथं माणूस ऊणे – समीर मणियार

Pune city पुणे तिथे काय ऊणे असा एक समज रुढ आहे. तो समज खोटा ठरण्याची शक्यता आहे.

पुण्याची लोकसंख्या ३५ लाखांच्या घरात आहे.

पण Pune city पुणे शहरातील वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० च्या घरात पोहोचली आहे.

पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी काल बुधवारी पुण्यातील वाहनांची आकडेवारी जाहीर केली आहे.

त्यात ही माहिती उघडकीस आली आहे. याचाच अर्थ पुण्यात माणसांपेक्षा वाहनांची गर्दी बेफाट वाढली आहे.

२०१७ २०१८ या एकाच आर्थिक वर्षात Pune city पुणे शहरात २ लाख ८९ हजार ९१० नवीन वाहने दाखल झाली आहेत.

त्यात मोटारसायकल, बाईकची संख्या ८० टक्यांहून अधिक म्हणजेच २ लाख ५ हजार इतकी आहे.

 

Also Read : https://www.postboxindia.com/gudi-padwa-2022-why-gudi-should-saffron-flag/

 

एकेकाळी सायकलींसाठी प्रसिद्ध असलेल्या Pune city पुणे शहरात मोटारसायकल व बाईकची संख्या वायुवेगाने वाढत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांस्कृतिक व शिक्षणाचे माहेरघर, आयुष्याच्या संध्याकाळी निसर्गरम्य आल्हाददायक वातावरणात पेन्शनरांना राहण्याची जागा म्हणजे Pune city पुणे, समाजजीवनाशी संबंधित सर्व विषयांचे अभ्यासक व आणि तज्ञ मंडळीचा सर्वात जास्त धांडोळा म्हणजे पुण्यातच.

कोणत्याही एका विषयाचा वाद सूक्ष्म ते अतिसूक्ष्म स्तरात करण्याची खासियत पुणेकरांमध्येच असते.

शास्त्रीय संगीत महोत्सव, व्याख्यानमाला, सार्वजनिक गणपती उत्सव आणि हरतऱ्हेचे शिक्षण मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजेच Pune city पुणे.

अनेक गुणांनी आणि चांगल्या हवामानामुळे पुण्याची नवलाई सातासमुद्रापार गेलेल्या मराठी माणसांला अधिक असते.

याच पुण्यात कन्नड भाषिकांचा वावर मोठा असून, अलिकडच्या काळात उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ अशा हिंदी भाषकांचा वावर वाढला आहे. राजस्थानी मंडळी तर पुण्यातच जन्मल्याच्या थाटात वावरत असतात.

मुठा नदीच्या तीरावर वसलेले पुण्याला ऐतहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्या जोतीराव फुले, पेशवाई असा राजाश्रय लाभलेल्या Pune city पुण्याची लोकसंख्या नव्वदच्या दशकात आवाक्यात होती.

महात्मा गांधी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते पु. ल. देशपांडे, पं. भीमसेन जोशी यांच्यापर्यंत त्यांच्या Pune city पुण्यात वास्तव्याचा दाखला आहे. वेगाने होत असलेल्या नागरीकरणाचा बळी पुणे शहर ठरला आहे.

समाजसुधारक, नित्तीमत्ता जोपासणारे राजकारणी आणि लोकशाही मूल्यांचा बूज राखणारा पुणेकर आता विरळ होत चालला आहे.

गुंठा मंत्री नावाची नवसंस्कृती उदयास येत आहे. मुंबईतील संघटीत गुन्हेगारीचा पुण्यातही शिरकाव होऊ लागला आहे. पुण्याच्या शांत स्वभावाच्या वैचारिक वारश्याला आता दृष्ट प्रवृत्तीची नजर लागत आहे.

गेल्या चार दशकात पुण्याची लोकसंख्या ४० टक्यांनी वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठे शहर म्हणून Pune city पुण्याचा दुसरा क्रमांक आहे.

अंदाजे ४० लाख लोकसंख्येच्या Pune city पुणे शहरात ३० वर्षाखालील वयोगटातील लोकसंख्या ६२ टक्यांच्या घरात आहे. नवतरुण पुण्यात अनेक प्रश्न उभे राहत आहेत.

साक्षरतेत पुण्याची टक्केवारी ८६ टक्के असून, त्यात पुरुषांचे प्रमाण ९० टक्के तर महिला साक्षरतेचे प्रमाण ८१ टक्यांच्या आसपास आहे.

२०१३ पर्यंत पुण्याची लोकसंख्या ५६ लाखांच्या घरात जाईल असा अंदाज आहे. लोकसंख्येशी वाहन संख्येचा संघर्ष सुरु झाला आहे.

वाहनांचा वेग असाच वाढत राहिला तर सर्वात अधिक प्रदूषणाचे शहर म्हणून पुण्याची ओळख होण्यास उशिर लागणार नाही.

पुण्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुमार दर्जाची आहे. Pune city पुणेकर रिक्षावाला लोकांना लुटण्याचे उद्योग करीत असल्याच्या बहुसंख्य तक्रारी आहेत.

विकासाच्या नावाखाली पुणे शहराच्या आसपास नियोजन शून्य विकास होत आहे. वाहतुकीची प्रचंड कोंडी ही नित्याची बाब ठरली आहे.

वाहनांची उत्तरोत्तर वाढत असलेल्या संख्येमुळे आता पुण्यात पार्किंग ही मोठी समस्या बनत आहे. पुण्यातील खाद्यपदार्थ अन्य शहरांच्या तुलनेत महाग आहे.

सामान्य पुणेकरांसाठी ससूनची व्यवस्था तोकडी पडत आहे. Pune city पुणे रेल्वे स्टेशनचा परिसर बकालीकरणाच्या खाईत लोटला जात आहे.

पुण्यात नाईट लाईफची चलती मोठी आहे. अशा सर्व बाबी लक्षात घेतल्या तर पुढच्या दशकात पुण्यात पर्यावरण, वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि कायदा व सुव्यवस्था असे प्रश्न तीव्र होऊ शकतात.

Also Visit : https://www.postboxlive.com

आशिया खंडात वेगाने वाढणारे आणि माहिती व तंत्रज्ञान तसेच मोटार वाहने व ऑटोमोबाईल क्षेत्रात नावाजलेले तसेच शैक्षणिक संस्थांचे आगर असलेले

पुण्याचे जीवनमान बिघडण्याच्या दिशेने निघालेले आहे. लोकसंख्येपेक्षा वाहन संख्या अधिक वाढणे हे श्रीमंतीचे लक्षण असल्याचा काहींचा समज असेल.

पण पुण्याचा प्रवास अधोगतीने होण्याचे टाळायचे असेल तर पुण्यातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था वेगाने कमी वेळेत सक्षम करणे हा पर्याय आहे.

आता वेगाने वाढत जाणाऱ्या वाहनातून निघणाऱ्या धुरांपासून पुणेकरांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देवांवर टाकून चालणार नाही.

ते सुजाण नेतृत्वाच्या इच्छाशक्ती व प्रयत्नांवर अवलंबून राहील.

निसर्ग पुणेकरांवर वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्याची बुद्धी देवो. आमीन…..

 

समीर मणियार

Leave a Reply

error: Content is protected !!