Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Muslim सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई

1 Mins read

सय्यदभाई यांची बुद्धीप्रामाण्यवादी भूमिका

Muslim मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी सारी हयात वेचणारे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,

पद्मश्री महेबुब शाह कादरी जिलानी उर्फ सय्यदभाई यांचा आज वाढदिवस आहे.

वयाच्या ८५व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील हा अवलिया आजही आपल्या विचारांशी प्रामाणिक असून, त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा वाखाणण्याजोगा आहे.

सय्यदभाई आज वयाच्या ८५व्या वर्षात पदार्पण करीत असले तरी त्यांच्या सामाजिक कामाची तळमळ तरुणांना लाजविण्यासारखी आहे.

आपल्या बहिणीवर एकतर्फी तिहेरी तलाकच्या झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी हा माणूस आयुष्यभर एका निष्ठेने काम करीत राहिला.

Muslim मुस्लिम समाजातील तलाकपिडीत महिलांना अन्य भारतीय महिलांच्या बरोबरीने हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचा जीवनभरातील संघर्ष अखेर यशस्वी होताना दिसत आहे.

एकतर्फी तिहेरी तलाकला मोदी सरकारने कायद्याने बंदी घातली आहे. हा लगाम महत्वाचा असला तरी तलाकपिडीत महिलेचा पोटगीचा अधिकार

आणि तिच्या उदरनिर्वाहासाठी कायदेशीर तरतूद तिच्या नवऱ्याकडून होण्याबाबत अजूनही कायद्यात संदिग्धता आहे. त्यामुळे तिहेरी तलाक देणे

हा कायद्याने गुन्हा असून बायकोला वाऱ्यावर सोडणाऱ्या नवऱ्याला शिक्षेची जरब बसणार आहे. पण त्या तलाकपिडीत महिलेला

अद्याप पूर्ण समाधान होईल असा कायद्याच्या चौकटीतील न्याय अद्याप मिळालेला नाही. समान नागरी कायदा झाला तर

Muslim मुस्लिम महिलांना न्याय मिळू शकतो अशी धारणा आहे. अर्थातच विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, आणि दत्तक याबाबत Muslim मुस्लिम महिला आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

सध्या देशात करोनाच्या विषाणुविरोधात सरकारी यंत्रणेची लोकसहभागातून लढाई सुरु आहे.

देशात सुरु असलेला २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे श्रमिक कष्टकरी मजूर, असंघटीत कामगार, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि

उपेक्षित समाजगटातील रोजीरोटीचे प्रश्न भविष्यात आणखी गंभीर रुप धारण करण्याची शक्यता आहे.

महामंदीच्या फेऱ्यात करोना साथीच्या उपद्रवामुळे भारतातील समाज स्वास्थ्य अधिक बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत सापडली असून, करोना इफेक्टमुळे ती व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारत हा अठरापगड जातीचा देश असून, आपल्या देशात बहुविध धर्म संस्कृती एकोप्याने नांदत असतात. ही अभिमानाची गोष्ट आहे.

जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या या देशात लोकशाही व्यवस्था आहे. करोनाच्या विरोधात भारतीय समाज एकसंघ होऊन लढत आहे

यात वाद असण्याचे कारण नाही. पण दिल्लीच्या निझामुद्दिन परिसरातील तबलीग मरकजमध्ये करोना पॉझिटिव्ह आणि

काही संशयित रुग्ण सापडल्यानंतर देशात एकच चर्चा सुरु झाली आहे.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

निझामुद्दिनचा प्रकार टाळता आला असता. यात दिल्लीतील प्रशासकीय यंत्रणा गाफील राहिली यात वाद नाही.

तथापि, इस्लाममधील सुन्नी पंथियांमध्ये धर्मप्रसाराचे काम शतकभरापासून करणाऱ्या तबलिग जमातविषयी काही मुद्दे उपस्थित केले जात आहे.

त्यात जातधर्माच्या राजकारणाचा अंश लपलेला आहे. आर्थिक दिवाळखोरीत देश सापडण्यास कोणाची आर्थिक धोरणे जबाबदार होती हे जगाला ज्ञात आहे.

पण जातीधर्माचे भांडवल खासकरुन हिंदु मुस्लिम यांच्यातील वाद लावण्याचा काही राजकीय शक्तींचा प्रताप देशाला परवडणारा नाही.

निझामुद्दिनच्या झाल्या प्रकाराबाबत तबलिग जमातने देशाची माफी मागावी अशी मागणी Muslim मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केली आहे.

ही मागणी अजब आहे. मुळात तबलिग जमातच्या निमित्ताने देशातील भारतीय Muslim मुस्लिमांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे षडयंत्र या देशात काही गटाकडून सुरु आहे.

त्यास तथाकथित मिडियाचाही हातभार आहे. तबलिगच्या निमित्ताने विशिष्ट टिपिकल पेहेरावातील Muslim मुस्लिम व्यक्तीचे चित्रण

रंगवून हे करोना बाँब देशात फिरत असल्याचे नालायकपणाचे चित्र रंगविले जात आहे. तबलिग जमातच्या कार्यपद्धतीबाबत मतभेद असू शकतात.

पण साऱ्या देशभरातील करोना विषाणुच्या प्रसाराला एका धर्मियांना जबाबदार धरणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.

कुठलाही रोग अथवा संसर्गजन्य साथीचे रोग अमुक एका जातीच्या अथवा धर्माच्या व्यक्तीला होतात असे नव्हे.

यामुळे यात जातीपातीचे राजकारण कोणी करता कामा नये. हा भयानक विकार परतावून लावण्यासाठी

सर्व भारतीय नागरिकांची एकजूट आणि सोशल डिस्टन्सिंगचा मंत्र पाळणे गरजेचे आहे.

गर्दी टाळणे आणि घरात बसणे हाच या विकाराची साखळी तोडण्याचा प्रभावी मार्ग आहे.

 

Also Read : https://www.postboxindia.com/sharad-pawar-पवारांच्या-जातीयवादाव/

 

करोना विषाणु साथरोग व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी आरोग्य सेवा याबाबत देशभरात विचारमंथन सुरु आहे.

प्रशासन आरोग्य सेवा आणि लोकसहभाग यात महत्वाचा आहे.

या पार्श्वभूमीवर भारतातील करोनासाठी एकमात्र तबलिग जमात जबाबदार आहे हे अर्धसत्य आहे.

आता परस्परांवर आरोप करुन सामाजिक व सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी परस्परांवर ढकलण्याची ही वेळ नाही.

यामुळे हिंदु मुस्लिम असे स्वरुप देण्याचे काहींचे मनसुबे हाणून पाडायला हवेत.

ते भारतातील सर्वधर्मीय सुजाण नागरिक, विवेकवादी विज्ञाननिष्ठ विचारांचे नागरिक करतील यात शंका नाही.

Muslim मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई यांनीसुद्धा यासंदर्भातील या वयात स्पष्ट विचार मांडले आहेत.

हिंदु धर्मात जसे वारकरी संप्रदाय वैश्विक शांततेसाठी संत ज्ञानेश्वरांचा मार्ग म्हणजे पसायदान करीत असतात.

त्याच धर्तीवर इस्लामच्या प्रसारासाठी शांततेच्या मार्गाने तबलिग जमातची मंडळी निव्वळ धर्मप्रसार करतात.

यात त्यांचे कसलेच राजकारण नसते. यामुळे अशा संकट समयी विवेकनिष्ठ बुद्धिप्रामाण्यवादाची भूमिका

सर्वच भारतीय नागरिकांना घ्यायला हवी असे बुजुर्ग सय्यदभाई यांना वाटते. त्यांच्या विचारांना त्यांच्या वाढदिवशी अभिवादन.

Leave a Reply

error: Content is protected !!