Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAINTERNATIONALWorld News

Picasso – पाब्ल पिकासो ”(मॉडर्न आर्ट प्रणेता)

1 Mins read
  • Picasso - पाब्ल पिकासो

Picasso – पाब्ल पिकासो ”(मॉडर्न आर्ट प्रणेता)

कलाकार म्हणजे काय ? 

कलेचे ज्ञान असणाऱ्या व कला प्रस्तुत करणाऱ्या व्यक्तीस कलाकार किंवा कलावंत म्हणतात.

कलाकार आणि कला यांच्यातलं नातं फार सुंदर आहे. प्रकृती जेव्हा कलाकाराला कलेनी तिचा प्राकृतिक शृंगार करायला सांगते ना तेव्हा कलाकार आणि कला त्यांच्यात खरं मनोमिलन होत असत. तो एक संवाद असतो, मूक संवाद, त्या दोघांमध्ये. लेखनकला , चित्रकला,संगीत, नृत्य, वादन आणि अश्या कितीतरी कलांद्वारे जेव्हा प्रकृतीला व्यक्त करायचं असतं तेव्हा कलाकार आणि कला त्याच्यातलं संमिश्रण, कुंजन म्हणजे ती प्रतिभा बहराला येणं. हा सर्व संवाद बाहेरच्या जगासाठी अव्यक्त असतो.

कलाकार वास्तविक जीवनात काय करतात? टेलिव्हिजन सहसा कॉफी दुकानात गहन आणि अर्थपूर्ण संभाषणे असणारे, किंवा आर्ट गॅलरीत स्वारस्यपूर्ण कपड्यांबद्दल, किंवा नाट्यमय मज्जासंस्थेच्या बिघडण्यांत असणारे कलाकार असतात, जे सहसा औषधे आणि अल्कोहोलशी संबंधित असतात.
कला बनवणे ही कला सर्वात महत्वाची आहे त्यांचे प्राथमिक कार्य म्हणजे त्यांच्या आवडीची कला तयार करणे.

यात स्थापनेत, शिल्पे, चित्रे, रेखांकने, मातीची भांडी, कार्यप्रदर्शन, छायाचित्रे , व्हिडिओ किंवा इतर कोणतीही माध्यम समाविष्ट आहे. काही कलाकार आपल्या कामात बर्याच प्रमाणात विविध माध्यमाचा समावेश करतात.

Picasso - पाब्ल पिकासो

Picasso – पाब्ल पिकासो

कला अनेक रूपे घेऊ शकते, पण काही संकल्पनात्मक कला अपवाद वगळता, कला म्हणजे एखाद्या प्रकारचे भौतिक स्वरूपातील कल्पना. कलावंतांना सातत्याने काम करावे लागते आणि दर्जेदार कामाचे एक भाग तयार करावे लागतात.

सगळ्यात मोठा कलाकार म्हणजे निसर्ग. निसर्गानंतर मानवाचा क्रमांक लागतो, मानवाचा निसर्गातील कलेला पाहून त्याच्या हातून घडणाऱ्या रंगछटा कृती अथवा साहित्य, किंवा स्थायी वस्तू याला सुद्धा कला म्हणतात.
कला कुठलीही असो जेव्हा कलाकार त्या कलेपुढे नतमस्तक होऊन समर्पित होतो तेव्हा त्या कलेची पूजा घडते. मग कधी ती शब्दांची फुलं वाहून ती पूजा केली जाते, कधी रंगांची उधळण करून ,कधी घुंघरांच्या आवाजात आणि कधीकधी वाद्यांच्या तालात. या पूजेतून साकार झालेली अभिव्यक्ती विलक्षण असते, अलौकिक असते.

आधुनिक कलेचा (मॉडर्न आर्ट) चा विषय निघाला की रसिकाला एकदम Picasso –  पिकासोचे नाव आठवते. Picasso –  “पाब्लो पिकासो” विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ स्पॅनिश कलावंत. चित्रकार, शिल्पकार,अशा विविध प्रकारांनी त्यांची कारकीर्द आधुनिक कलाक्षेत्रात संस्मरणीय ठरली आहे. वैयक्तिक जीवनातील बऱ्यावाईट असंख्य घडामोडींसह इतके समृध्द जीवन क्वचितच एखाद्या कलाकाराच्या वाट्याला येते.

स्पेनमधील मॅलागा या गावात२५ ऑक्टोबर १८८१ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल रूईथ ब्लास्को कलाशिक्षक होते.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणी प्रमाणे त्यांच्यातील कलेची ओळख दहाव्या वर्षीच कुटूंबियांना झाली होती.बार्सेलोना येथे वडील शिक्षकी करीत असलेल्या कलासंस्थेत ते दाखल झाले तेथे सर्वप्रथम गुण मिळवून उत्तीर्ण झाला.श्रीमंत चुलत्याच्या मदतीने माद्रिद येथिल ‘रॉयल अकॅडमी’मध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

पण शिक्षक आणि मित्र यांच्याशी बिनसल्याने त्यांना तेथून निघावे लागले. त्यामुळे चुलत्याचा आश्रयही तुटला,तसेच आजार, प्रेम, मैत्री जुळणे व तुटणे असे अनुभव घेत, कठीण परिस्थितीशी झगडत ते पॅरिस, बार्सेलोना, मॅलागा या गावातून भटकत होते.१९०४ साली अमेरिकन लेखिका ,नाटककार गर्टूड स्टाइन आणि तिचा भाऊ यांनी त्यांच्या कलेला पहिला प्रतिसाद दिला. येथपर्यत त्याचे जिवन हलाखीचे होते.

Picasso – पिकासोच्या कार्याचे अनेक कालखंडात वर्गीकरण केले जाते. त्यांच्या कामातील सर्वात सामान्यपणे स्वीकारले जाणारे कालखंड म्हणजे ब्लू पीरियड (१९०१-०४), द रोझ पीरियड १९०४-१९०७), आफ्रिकन-प्रभावित कालावधी (१९०७ -१९०९) विश्लेषणात्मक क्यूबिझम (१९०९- १९१९१२), आणि सिंथेटिक क्यूबिझम (१९१२- १९१९), सुरवातीच्या काळातील त्याच्या ‘नीलकालखंड ’या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चित्रांतून मिळते. यामधे निळ्या आणि निळ्या-हिरव्या रंगाच्या छटा दाखवून केवळ इतर रंगांद्वारे उबवलेल्या उदासीन चित्रांचा समावेश आहे. या मधे मुलांसह आईची अनेक चित्रे तर काहीवेळा वेश्या आणि भिकारी असे सुद्धा विचित्र विषय आहेत. त्यांच्या मित्र कार्ल्स कॅसेजमासच्या आत्महत्येमुळे त्यांचेवर खूप परिणाम झाला होता .त्यांनी कॅसेजमासची अनेक मरणोत्तर पोट्रेट रेखाटली. त्यानंतर कालानुरूप त्यांच्या चित्रकलेतून नानाविध विषय हाताळले गेले.

स्पेनमधील यादवीमध्ये नाझींनी विमान हल्ला करून उद्ध्वस्त केलेल्या शहराचा विषय घेऊन त्यांनी गेर्नीका हे भव्य चित्र रंगविले. युद्धावर प्रखर भाष्य करणारे हे चित्र स्पॅनिश सरकारने १९३७ सालच्या पॅरिसमधील जागतिक महोत्सवात प्रदर्शित केले. तेथून Picasso –  त्यांची कीर्ती जगभर सामान्य रसिकांपर्यंत पसरली. गेर्नीकाच्या निर्मीतीने त्यांनी जगाला धक्का दिला,

आयुष्याच्या अखेरीस मात्र या आधुनिक जगातील प्रेरणांपेक्षाही त्यांना आदिमानवी वृत्तीची ओढ लागली.त्यांचा कलाविष्कार आदिमानवी गुणवत्तेने बहरून आला. पशू, पक्षी, घुबडे, विदूषक या विषयांत तो बुडून गेला. मिनोटॉर (नृवृषभ), सेंटॉर (हयग्रीव) या ग्रीक अलौकिक पौराणिक प्राण्यांमधील पाशवी शक्तीचा ठाव त्याने आपल्या रेखनांतून आणि शिल्पांतून घेतला.सर्कशीतील कसरती आणि बैलझोंबी या जीवनमरणाशी मुकाबला करणाऱ्या स्पॅनिश लोकांच्या आवडत्या खेळांचे त्यासा बालपणापासून आकर्षण होते, हे त्यांच्या चित्रांवरून दिसते.

आयुष्याच्या अखेरीस मृत्स्नाशिल्पावर त्याने रंगविलेली या विषयावरील चित्रे रेषात्मक चैतन्याने अजोड ठरणारी आहेत. वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी Picasso –  पिकासोचे फ्रान्समधील मॉगीन्स या गावी ८ एप्रिल १९७३ रोजी हृदयविकाराने निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूने विसाव्या शतकातील खळबळजनक पिकासोपर्व संपले.

 

 

माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!