- Bollywood बॉलिवूडचा दर्जा दिवसें न दिवस ढासळत आहे का ?
Bollywood बॉलिवूडचा दर्जा
सध्या Bollywood ओटीटी फ्लॅटफॉर्म वर बाजार भरला आहे, मार्केटिंग आणि बिझिनेस च्या नावाखाली जी मंडळी व्यवस्थापनात बसवली जातात
त्यांना धड कन्टेन्ट चे सोडा पण वास्तव, विचार, व्यक्तिविशेष,भाषा आणि साहित्य सोडा पण साधे व्यक्तिओळख सुद्धा नसते असे काहीसे चित्र सध्या दिसत आहे.
क्रिएटिव्हिटी च्या नावाखाली दोन चार यो – या आणि अंगभर टॅटू काढलेले, भिकबाळ्या घालून तोंडातली सिगारेट शिलगावत अनेक प्रकरणांवर आपल्या मताच्या आणि टीकेच्या पिंका मारत बसायचे हेच सध्या पीक जोमात आहे.
आपल्या मुलाचे करियर प्रवाही व्हावे म्हणून जगातील उमेदीच्या तरुणांचे करियर स्वप्न दाखवत उद्धवस्त करणारे निर्माते / दिग्दर्शक आज आपल्या मुलाला नॅशनल अवॉर्ड मिळावे म्हणून दिल्लीच्या मार्केट मध्ये सेटिंग लावणारे सुद्धा याच इंडस्ट्री मध्ये खोट्या आडनावाने फिरत असतात.
अशा या ओटीटी च्या भाऊ गर्दीत अनेक वेबसिरीज महिन्याला पाडण्याचे काम होते, शेवटी चॅनेल या निर्माता / दिग्दर्शकांना वेश्या / गुलाम म्हणूनच वागवत असतो हे सत्य ते स्वतः नाकारत नाहीत.
पण अशाच Bollywood बाजारात अनेकदा राष्ट्रीय मान सन्मान व्यक्तींचे प्रतिमा खराब करण्याचे काम सुद्धा जाणते / अजानतेपणी यांच्याकडून होते.
Bollywood ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर रिलीज झालेल्या अभय सीझन – 2 वेब सिरीजमधील पोलिस स्टेशनमधील एक दृश्य चित्रित नुकतेच करण्यात आले होते.
पोलिस ठाण्याच्या भिंतीवर गुन्हेगारांची रेखाचित्रे चिकटवलेली गेलेली होती. यातली रेखांकित केलेली प्रतिमा नीट पहा.

Bollywood बॉलिवूडचा दर्जा दिवसें न दिवस ढासळत आहे का
पोलिस ठाण्यातील गुन्हेगारांच्या रेखाचित्रांमध्ये हे चित्र पाहून संतापाने तुमचे रक्त उकळले असते.

Bollywood बॉलिवूडचा दर्जा
जर तुम्ही अजूनही त्याला ओळखले नाही, तर तुमची चूक नाही, ही आपली शिक्षण प्रणाली आहे जी आक्रमक, समाजद्वेष्टी, वसाहतवादी, बकाल भांडवलवादी आणि असामाजिक बनत आहे.
लाल वर्तुळाकार चित्रातील माणूस दुसरा कोणी नसून खुदीराम बोस आहे.
खुदीराम बोस हे भारतातील ब्रिटिश राजवटीला विरोध करणारे सर्वात तरुण क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक होते. ते मुझफ्फरपूर कटात सामील होते आणि 11 ऑगस्ट 1908 रोजी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्याला फाशी देण्यात आली. आणि याच वेबसीरीज च्या सिन मध्ये कलादिग्दर्शक आणि दिग्दर्शकाला हे समजू नये. त्यांनी आरोपी म्हणून काढलेल्या चित्रांच्या प्रतीत खुदिराम बोस यांचे चित्र हे आरोपी म्हणून बोर्डावर चिकटविण्यात आले होते.

khudiram bose
अशा प्रकारची चूक अजिबात मान्य नाही. आणि या Bollywood वेबसिरीजचा दिग्दर्शक स्वतः बंगाली असल्यावर ते अक्षम्य होते. त्यातही लेखक आणि स्टारकास्ट बंगाली आहेत आणि त्यापैकी कोणीही दिग्गज खुदीराम बोस यांना ओळखू शकले नाहीत.
याच संतापजनक गोष्टीनंतर तरुण वर्गातून दबक्या आवाजात चर्चा झाल्या पण स्थानिक राजकीय पक्ष एकमेकांची उणी धुनी काढण्यात व्यस्त.
Bollywood चित्रपट सृष्टीत काम करणारा स्वप्नील हिरवे हा उघड पणे म्हणाला कि, संपूर्ण इंडस्ट्री मध्ये बंगाली भाषिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक मराठी मुलांना व्यवस्थापन कामे देण्यास नकार देते कारण राजकीय हस्तक्षेप कंपन्यांच्या कामात होतो अशी करणे असतात, त्यामुळे बंगाली भाषिक तंत्रज्ञ स्वता: सोबत पूर्ण मोहल्ला कामाला लावायला मुंबईत आणतो, आणि फक्त कलेच्या नावाखाली हे प्रकार घडत असतात, इतर समाजातील वर्गाला कला समजत नाही असे यांचे तर्क असतात, त्यात काम करतानाचे अनुभव सांगत तो म्हणाला पुष्कळ बंगाली लोकांना महाराष्ट्रातील संस्कृतीचे वावडे असते अशा लोकांना अशा चुका घडतात त्यावेळी मौन पाळले जाते आणि याना स्वतःच्या संस्कृतीबद्दल माहिती नसावी का ?
Bollywood संपूर्ण चित्रपट सृष्टीत बंगाली सांस्कृतिक दहशतवाद इतरांना कामे न मिळता आपल्या लोकांना कामे मिळविण्यासाठी अनेक प्रकारच्या तडजोडी याच लोकांकडून होतात. बाकी सर्व स्थानिक लोकांना यांच्या अट्टहासामुळे आणि छुप्या धोरणांमुळे इंडस्ट्री मध्ये कामे मिळत नाहीत आणि यावर स्थानिक आवाज सुद्धा निघत नाही याचे सुद्धा आश्चर्य वाटते. अनेकदा अनेकांचे अनुभव वेगळे सुद्धा असू शकतात.
अशा प्रकारच्या अक्षम्य चुका होत असताना मराठी कलाकार आणि तंत्रज्ञानानी हितसंबंध संभाळण्या पेक्षा भविष्यात कामे मिळतील कि नाही याची चिंता करू नये, या पेक्षा वेळीच शहाणे व्हावे आणि योग्य मेहनती कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या मागे उभे राहावे. स्थानिक राजकीय पक्षांनी सुद्धा सेटलमेंट करून विषय संपविण्यापेक्षा भूमिपुत्रांना आणि स्थानिक मराठी कलाकारांना न्याय मिळेल याच भावनेतुन पुढे यावे.