- r k laxman
Rk Laxman मालगुडी डेज
malgudi days मालगुडी डेज , ऐंशी – नव्वदीच्या दशकात नुक्कड,फौजी, सर्कस, रामायण, पंचतंत्र, विक्रम वेताळ,
मराठीतील गोट्या आणि अशा कथानक परिपूर्ण लहानग्यांच्या तसेच रहस्यमयी कौटुंबिक मालिकांसोबत दूरदर्शन आणि
डीडी २ च्या काळात दोनच टीव्ही चॅनेल त्यावेळी भरपूर सकस मनोरंजन पुरेसे असायचे. आता हातात मोबाईल,
लॅपटॉप, आयपॅड , कॉम्पुटर , टीव्ही आणि केबल वरून २०० -३०० चॅनेल , वेबसिरीज साठी पॅकेजेस असणारे
सब्स्क्रिप्शन्स लोकांना उपलब्ध झाले पण यातून लक्षात राहील असे मनोरंजन जर विचारले तरी कोणी काहीच सांगू शकणार नाही
असा काळ सध्या आहे. त्यावेळी malgudi days मालगुडी डेज नावाची मालिका नव्वदीच्या उंबरठ्यावर मानवी मूल्यांची
नातेसंबंधांची गुंफनूक करत समस्त भारतीयांच्या मनावर अधिराज्य करत होती.