Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Mumbai City मुंबईच्या रस्त्यावर दिवस काढले, पोलीस उपनिरीक्षक होऊनच स्वप्न पूर्ण केले.

1 Mins read

Mumbai City मुंबईच्या रस्त्यावर दिवस काढले, पोलीस उपनिरीक्षक होऊनच स्वप्न पूर्ण केले.

Mumbai City मुंबई नगरी हि स्वप्न नगरी आहे, असे अनेक सिनेमा पासून ते आज्या पणजोबांपर्यंत आपल्या कानावर पडलेले असते. या मुंबईत आल्यानंतर अनेकांनी जीवाची मुंबई केली , तर कित्येकांनी आपल्या नशिबाला दोष देत माघार पत्करली. कोणी हरले, कित्येक जिंकले.

लाखो मैलांवरून आलेला उत्तर भारतीय चणेवाला इथे करोडपती झाला आणि पुढे त्याच्या सात पिढ्यांना आशीर्वाद देऊन गेला. फक्त चणेवालाच नाही तर आज वेदांता कंपनीच्या नावाने भारतच न्हवे तर अमेरिकेत करोडोंची उलाढाल करणारे मल्टिनॅशनल कंपनी उभी करणारे अनिल अग्रवाल हे Mumbai City मुंबईतल्या भोईवाडा परिसरात दहा बाय दहाच्या चाळीतील खोलीत शेअरिंग ने राहत भंगार विकण्याचे आणि गोळा करण्याचे काम करायचे.

अनेकांची उदाहरणे देता येतील. ऐंशी – नव्वदीच्या काळात संपामुळे कापड उद्योग मुंबईतून संपला आणि लाखो कामगार देशोघडीला लागला. अनेकांनी पुन्हा गावाकडे शेतीचा मार्ग
निवडला तर अनेकांनी इथेच छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. पण उद्योग धंदा लहान का असेना पण मोठ्या प्रमाणावर मराठी माणूस लाजला, भावकी काय म्हणेल, गावाकडे लोकं हसतील, धंद्यात बरकत नसते, आपला जन्म नोकरी करण्यासाठीच झालाय हीच मानसिकता मराठी माणसाच्या अधोगतीला कारणीभूत ठरली.

Mumbai City मुंबई

Mumbai City मुंबई

तर अशी हि Mumbai City मुंबई, आज अनेक धडे आणि बाप जाद्यांच्या यश अपयशाच्या कहाण्या गावागाकडे असतील, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे आजचा तरुण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुंबई, पुणे , नाशिक , नागपूर या लहान मोठ्या शहरांमध्ये आपला परंपरागत शेतीचा व्यवसाय सोडून शिक्षणासोबत उद्योग धंदा सुद्धा यशस्वी पणे उभारत आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशातील तरुणांप्रमाणे केंद्रीय स्पर्धा परीक्षांना तो यशस्वीपणे सामोरा जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देताना आपल्या अंगावर खाकीची स्वप्ने सुद्धा यशस्वीपणे साकार करत आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल अनेकांना सुखद धक्का देऊन गेला. तर अनेकांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला.

२००६ ला याच Mumbai City मुंबईत नशीब आजमावायला आलेल्या गोविंद फड याला जीवाची मुंबई काही करता आली न्हवती, सतत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

खिशात इतके पैसे न्हवते कि दोन वेळचे जेवण पोटभर जेवता येऊ शकेल पण आपल्याला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जीवाची बाजी लावायची आहे हे मनोमनी सतत चालू असायचे.

मुंबईतल्या महागड्या अथवा मध्यम दर्जाच्या लॉज अथवा हॉटेल मध्ये राहण्यासाठी रूम विचारायला जायची हिम्मत सुद्धा होत नसायची. राहायला कोणतीही व्यवस्था न्हवती किंवा कोणी नातेवाईक आपल्याला हात पाय पसरायला थोडी जागा देईल याची सुद्धा खात्री न्हवती.

Mumbai City मुंबईत राहायची व्यवस्था नसल्यामुळे गोविंदने अगदी गुण्या गोविंदाने मरिन लाईन्स ला आपला सोबती बनवला.

मस्त हवेशीर मरिन लाईन्स वर निवांत रात्र काढायची आणि मग दिवस भर अभ्यास केंद्रात अभ्यास.

कधी कधी रात्रपाळीचे पोलीस गस्त घालताना रात्री उठवायचे, आणि ते गेले कि पुन्हा झोपायचो.

मग दिवसभर जिथे पोलीस भरती असायची तिथे जायला लागायचे.

Mumbai City मुंबईत इतका काळ गेल्यानंतर सुद्धा पोलीस भरती होत न्हवती म्हणून निराश होतो पण याच मुंबईने मला आधार दिला माझे स्वप्न पूर्ण केले.

गोविंद सांगत होता, त्याच्या या सांगण्यात प्रचंड आत्मविश्वास होता. त्याच्या मित्राने हे सत्य सांगितले. 

आज जेव्हा खाकी घालून इथे फोटो काढला तर काय भारी वाटायला लागले गोविंद ला आठवणी जाग्या झाल्या होत्या.

याच Mumbai City मुंबई च्या किनाऱ्यावर मला पोलीस रात्री उठवायचे तिथेच आज पोलीस अधिकारी बनून स्वतःला उभा पाहताना गलबलून आले.

आपल्या या सर्व यशाचे श्रेय गोविंद आपल्या आई वडिलांना देत होता. मध्येच समुद्राची लाट खळखळून मोठ्याने आपटत होती.

अनेकांच्या स्वप्नांची बेरीज वजाबाकी हा समुद्र करतो कि काय ? असा प्रश्न उभा राहिला. काहीही असो मुंबई वर मनापासून प्रेम करणाऱ्याला या Mumbai City मुंबई ने भरभरून दिले आहे. गोविंद च्या मेहनतीला आणि जिद्दीला खरोखर सलाम , सलाम , सलाम

 

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!