Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

Marathi भटीपाशात, मराठी भाषा भवन

1 Mins read

    माझ्या मराठी भाषेत
शब्द सुवर्णाची खाण
माझ्या भाषेचा अभिमान
माझ्या अस्मितेची शान
या सार्थ अट्टहासाने Marathi मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालीय. त्याच विचाराने आता मुंबईत चर्नीरोड येथे ‘मराठी भाषा भवन’ची उभारणी होत आहे. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गुढीपाडव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘भाषा विभाग’ मंत्री सुभाष देसाई व अन्य मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, Marathi ”मराठी भाषा ही कुणावर आक्रमण करीत नाही. तरीही मुंबईवरील Marathi मराठीचा ठसा पुसण्याचा प्रयत्न केल्यास अद्दल घडवण्याची ताकद मराठी भाषेत आहे!”
मात्र, ही ताकद वेळीच दाखवली नाही, म्हणूनच ज्यांच्या आवाजातल्या ‘महाराष्ट्र गीता’ने प्रत्येक ‘महाराष्ट्र दिन’ साजरा होतो; त्या शाहीर साबळे यांच्यावर वयाच्या ८० व्या वर्षी (२००० मध्ये)

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

मराठीचा मळवट भरला, राहिली टिकली
आम्ही आमच्या हातानं, मुंबई सारी विकली
– असा टाहो फोडण्याची वेळ आली होती. त्यावेळीच सावध होऊन योग्य ती दुरुस्ती केली असती, तर आज ”मुंबईमध्ये कुणीही येऊन Marathi मराठी भाषिकांच्या उरावर नाचावे, हे मराठी माणूस सहन करणार नाही. अत्याचाराशी मुकाबला करणारी Marathi मराठी भाषा तलवारीसारखी तळपत राहिली पाहिजे. त्या दिशेने टाकलेले ’मराठी भाषा भवन’ हे महत्त्वाचे पाऊल आहे,” असा इशारा देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली नसती.
Marathi ”मराठी भाषेपुढे अनेक आव्हानं असल्यामुळे मराठी भाषा टिकून राहण्यासाठी भाषा भवन महत्त्वाचे ठरेल,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अशा बाता आणि चर्चा यापूर्वीही अनेकदा झाल्या आहेत. त्याचा समाचार ‘शिवसेनाप्रमुख’ बाळासाहेब ठाकरे एका वाक्यात घेताना म्हणत, ”मराठी माणूस टिकला, तर आणि तरच Marathi मराठी भाषा टिकेल!” हेच सांगताना शाहीर साबळे यांनी आर्जव केलंय –
संपूर्ण महाराष्ट्रासाठी जो झटतो-
मातेच्या गळसरी तो नटतो !
बुझदिल षंढ जो,
असेल मागे हटतो-
आता पुन्हा करा घोषणा,
‘ही मुंबई सारी अपुली!’
हे मराठी राजा,
काळजापरिस तू जपली!
– ह्या २८ शब्दांत Marathi मराठी भाषेचं अवघं तेज आहे. ह्या तेजाचं दर्शन घडवीत, Marathi ‘मराठी भाषा भवन’चं भूमिपूजन व्हायला पाहिजे होतं. त्यासाठी कर्मकांड टाळून ‘राज्य साहित्य-संस्कृती मंडळ’ प्रकाशित ग्रंथ एकावर एक रचून भाषा भवनामागच्या विचारांची गुढी उभारता आली असती. या मंडळाने अलीकडेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ नियतकालिकातील लेखांच्या बाराशे पानांचे तीन खंड प्रकाशित केलेत. ह्या खंडांचं प्रकाशन ‘मंडळा’चे मंत्री म्हणून सुभाष देसाई यांनी केलंय; आणि प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालंय. त्यातील ‘विजयादशमीचा संदेश’ या लेखात ‘प्रबोधन’कार लिहितात –
देव धर्म हे, भटी सापळे-
घातक झाले देशा ।
मोडा तोडा, उलथुनि पाडा-
उखडा त्यांच्या पाशा ॥
हे छापायचं, पण त्यानुसार आचरण करायचं नाही. ही वैचारिक हरामखोरी झाली. ‘मंडळा’ने ‘प्रबोधन’कारांच्या साहित्याचे पाच खंड यापूर्वीच प्रकाशित केले आहेत. त्यात त्यांनी लिहिलेल्या ५ नाटकांचा एक खंड आहे. ‘विधी-निषेध’ हे नाटक त्यात आहे. या नाटकात कर्मकांडांची शास्त्रशुद्ध चिरफाड केलीय. हा जमालगोटा आजोबांनी तयार केलेला असताना; मुख्यमत्र्यांनी Marathi ‘मराठी भाषा भवन’च्याच नव्हे; तर कुठल्याही सरकारी उपक्रमाच्या भूमिपूजन – उद्घाटन कार्यक्रमात भटपाशी-बुद्धीनाशी कर्मकांडं का खपवून घ्यायची?

Also Read : https://www.postboxindia.com/marathi-नवी-मुंबई-चे-संग्राम-पाट/

हा प्रश्न ‘महाविकास आघाडी’तल्या ‘काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस’च्या नेत्या- मंत्र्यांनाही लागू होतो. ‘फुले-शाहू- आंबेडकर’ यांच्या नावाचा जप अविरत करायचा; पण त्यांच्या विचाराच्या विपरीत व्यवहार करायचा, असा पायंडाच त्यांनी पाडला आहे. यामुळेच आज ‘ईडी’चे बॉम्ब त्यांच्या बुडाखाली फुटत आहेत. विशेष म्हणजे, Marathi ’मराठी भाषा भवना’च्या भूमिपूजन विधीसाठी यजमानी म्हणून ‘मराठी भाषा विभागा’चे सहसचिव मिलिंद गवांदे पत्नीसह बसले होते. ते IAS म्हणजे ’भारतीय प्रशासन सेवा’चे अधिकारी आहेत. त्यांनी पूजा-पाठ-विधी श्रद्धायुक्त भावाने जरूर करावेत; पण आपल्या घरात! सरकारी उपक्रमात ‘लग्नात मुंज उरकून घ्यावी’ अशा चलाखीत आपल्या श्रद्धाभावाचे प्रदर्शन करू नये.
कुणी IAS/ IPS अधिकारी मुस्लीम असेल तर त्याने नमाज पठण करून; बौद्ध असेल तर त्रिशरण म्हणून आणि ख्रिस्ती असेल तर ‘मास’ आयोजित करून आपल्या खात्याच्या इमारतींचे भूमिपूजन-उद्घाटन करायचे का? ‘सनदी अधिकारीं’ना असले प्रशिक्षण देऊन तयार केले जाते नाही. कायदेशीर कर्तव्य चोखपणे पार पाडणे, एवढेच त्यांच्याकडून अपेक्षित असते. त्यावरच Marathi ’मराठी भाषा भवना’ची इमारत टिकून राहणार आहे. असे अधिकारी सरकारी कार्यालयातले खोट्या सत्यनारायणाच्या पूजा आणि बुवा-बापूंचे स्तोम कसे रोखणार? मशिदीवरचे अवेळी शांतताभंग करणारे भोंगे कसे उतरवणार? ही थोतांडं शासनकर्त्यांनी आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी रोखली पाहिजेत. अन्यथा, एखाद्या सरकारी उपक्रमात शास्त्रातल्या तोडग्यानुसार, मिलिंद गवांदे यांच्यासारखा तत्पर IAS अधिकारी ‘नरबळी’साठीही तयार व्हायचा!
Marathi मराठी भाषा ही भूमिपूजनाची माती खाणारी नाही. ती मतीची मशागत करणारी आहे. ’जप-तप-कर्म क्रियावीण धर्म’ हा संतोपदेश देणारी आहे.
अभिमान डिवचण्या याल,
बदलावया भूगोल-
तर शिवबाचा हा लाल,
शत्रूचा होईल कर्दनकाळ !-
गर्जेल, पुन्हा धावेल!
होऊनी सह्याद्रीची सेना-
देशरक्षणा अर्पिन प्राणा,

हाच Marathi मराठी बाणा !
असा आवाज देत अपमान-अन्यायाला भिडणारी आहे. म्हणूनच ’मराठी भाषा भवन’चा पाया कर्मकांडी नसावा; तो कर्तव्यनिष्ठ असावा, हा आग्रह आहे.

ज्ञानेश महाराव

Leave a Reply

error: Content is protected !!