Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

Maharana Pratap – महाराणा प्रताप

1 Mins read

महाराणा प्रताप यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन (९ मे १५४० )

           आयुष्यभर मोगलांशी दोन हात करून हळदी घाटाच्या युद्धात अकबराच्या विरोधात लढताना आपल्या धाारोष्ण रक्ताने भारतभूमीला पावन करणारे हिंदूकुलभूषण ,छत्रिय कुलावंतस ,वीरशिरोमनी, Maharana Pratap महाराणा प्रताप महाराज यांची आज जयंती.

  Maharana Pratap महाराणा प्रताप यांचा जन्म सिसोदिया वंशात झाला त्यांचे वडील उदयसिंह आहे अतिशय शूर योद्धे होते .भारतीय इतिहासात रजपुतांचा सर्वांना अभिमान आहे. इथल्या रणशूरांनी देश, जाती, धर्म आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले प्राण त्याग करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही.

त्यांच्या बलिदानाचा संपूर्ण भारताला अभिमान आहे. या भूमीत, रजपूतांची बरीच छोटी-छोटी राज्ये होती जी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढली.

या राज्यांत मेवाडला स्वतःचे एक विशेष स्थान आहे ज्यामध्ये इतिहासाचा अभिमान बाप्पा रावल, खुमान प्रथम महाराणा हम्मीर, महाराणा कुंभा, महाराणा सांगा, उदयसिंग आणि वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला.

मेवाडचा महान रजपूत राजा Maharana Pratap महाराणा प्रताप आपल्या पराक्रमाची आणि पराक्रमासाठी जगभरात ओळखला जातो. राजपूत सम्राटाने जंगलात राहणे पसंत केले पण परदेशी मोगलांची गुलामी कधीही स्वीकारली नाही. त्यांनी देश, धर्म आणि स्वातंत्र्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग केला.

       इतिहासातील महान राजा पैकी मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी उदयपूरचे संस्थापक उदयसिंह (द्वितीय )आणि महाराणी जयवंता बाई यांच्या पोटी झाला .Maharana Pratap महाराणा प्रताप म्हणजे असे योध्दे होते की त्यांनी कधीही मोगलांच्या समोर गुडघे टेकले नाहीत.

त्यांची संघर्षमय गाथा इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली .एका प्रदेशाचा राजा असून देखील संघर्षाच्या काळात त्यांनी मायारा गुहे मध्ये केवळ रोटी खाऊन दिवस काढले होते. या गोष्टीचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये ,लोककथांमध्ये पाहायला मिळतो.

हल्दी घाटाच्या युद्धाच्यावेळी Maharana Pratap महाराणा प्रताप यांनी बहलोलखानावर असा काही वार केला होता की, त्याच्या शरीराचे आणि घोड्याचे बरोबर दोन तुकडे झाले होते.

           स्वतःजवळ नेहमी दोन तलवारी बाळगण्याचा सल्ला महाराणा प्रताप यांना त्यांच्या मातोश्री राणी जयवंताबाई यांनी दिला होता. Maharana Pratap महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक म्हणजे अजब रसायन होते .

तो इतक्या प्रचंड वेगाने दौडत की त्याचे पाय जमिनीवर दिसत नसत. त्यामुळे हवेत उडणारा घोडा अशी देखील त्याची ख्याती होती.

या चेतक घोड्याचे आपल्या राजावर इतके प्रेम होते की ,हळदी घाटाच्या युद्धाच्या वेळी चेतकने मानसिंगाच्या हत्तीवर उडी घेऊन त्याला पायदळी तुडवले होते.

जेव्हा महाराणा प्रताप जखमी झाले तेव्हा २६ फुट लांब नाला पार करत Maharana Pratap महाराणा प्रताप यांचे चेतक घोड्याने प्राण वाचवले होते.मुक्या जनावराला असणारी एवढी समज इतिहासात दुसरीकडे कोठेही आढळत नाही.

        युद्ध प्रसंगी अकबराने Maharana Pratap महाराणा प्रताप यांच्या समोर प्रस्ताव ठेवला होता की, जर त्यांनी मुघल सत्ते समोर मान झुकवली तर अर्धा हिंदुस्थान त्यांच्या आधिपत्याखाली देण्यात येईल.

परंतु जीव गेला तरी बेहत्तर पण स्वाभिमान विकणार नाही या बाण्याच्या Maharana Pratap महाराणा प्रताप यांनी अकबराचा हा प्रस्ताव थेट धुडकावून लावला व आपल्या संस्कृतीचा मान राखला.

         महाराणा प्रताप यांनी मुघल सत्तेला तब्बल तीस वर्ष झुंजवत ठेवले. अकबराने जंग जंग पछाडले परंतु तीस वर्ष महाराणा प्रताप काही मोगलांच्या हाती आले नाहीत .अगदी महाराणा प्रतापचा शेवटचा सैनिकही हल्दीघाटीच्या शेतात युद्धात बळी गेला. त्यानंतर, मोगल सैन्याला बळ मिळू लागले.

महाराणा प्रतापला मेवाडचा सिंह म्हणत. हल्दीघाटीच्या लढाईत त्यांचा मोगल सैन्याने पराभव केला आणि जंगलात आपल्या कुटुंबासमवेत आश्रय घ्यावा लागला.तेथे त्यांनी बरेच दिवस भुकेले आणि तहानलेले आणि तणांच्या भाकरी खाल्ल्या.

            ते कधीही मोगलांसमोर हरले नाहीत. युद्ध टाळण्यासाठी जवळपासच्या अनेक राजपूत राजांनी आपल्या मुलींची अकबराशी लग्न लावून दिली.परंतु महाराणा प्रताप यांनी आपल्या वडिलांचे धोरण पाळले.अगदी महाराणा प्रतापचा शेवटचा सैनिकही हल्दीघाटीच्या शेतातील युद्धात बळी गेला.

शेवटी त्याने अकबरला शरण जाण्याचे पत्र लिहिण्याचे ठरविले.संघर्ष पुढे सुरूच होता. शौर्य, पराक्रम, निर्भयता, राष्ट्र-प्रेम आणि त्यागाची मूर्ती असलेले महाराणा प्रताप हे भारताचे शूर योद्धा होते.

       अकबर देखील महाराणा प्रताप यांच्या शौर्यामुळे प्रभावित झाला होता. राजस्थानच्या अनेक लोकगीतांमध्ये असा उल्लेख पाहायला मिळतो की जेव्हा महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला तेव्हा खुद्द अकबराला ही अश्रू अनावर झाले होते.

अकबर हे Maharana Pratap महाराणा प्रताप यांचा महान शत्रू होता, परंतु त्यांचा लढा हा कोणत्याही वैयक्तिक वैर भावनेसाठी नव्हता तर त्याच्या तत्त्वांचा आणि मूल्यांचा लढा होता.

ज्यांना आपले क्रूर साम्राज्य वाढवायचे होते, तर एकीकडे महाराणा प्रताप जी आपल्या भारत मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते.

Maharana Pratap महाराणा प्रताप यांच्या मृत्यूमुळे अकबर फारच दु: खी झाले होते. कारण त्याने मनापासून Maharana Pratap महाराणा प्रताप यांच्या गुणांची प्रशंसा केली होती आणि अकबरला माहित होते की या पृथ्वीवर महाराणा प्रतापांसारखा नायक नाही. अकबर बातमी ऐकून गूढपणे शांत झाला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले.

           ” शत्रू असावा तर असा “
    असे उद्गार अकबराने काढले होते.
       अशा या महान योद्याला जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.  

          लेखन 
       डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर 
             इतिहास अभ्यासक

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!