Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox MarathiSANSKRITISANSKRITI DHARA

लक्ष्मीकांत बेर्डे

1 Mins read
  • लक्ष्मीकांत बेर्डे

मराठी तसेच हिंदी चित्रपटातील विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे .

 

 

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबई येथे झाला.त्यांचे लहानपण खडतर होते.कौटुंबिक उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी लहानपणी लॉटरीची तिकिटे विकली.लहानपणीच गिरगावातील गणेशोत्सवाच्या रंगमंचावरील नाटकात त्यांचा सहभाग असायाचा,त्यामुळे त्यांना अभिनयाची गोडी निर्माण झाली होती. त्यांनी आंतरशालेय आणि आंतर-महाविद्यालयीन नाटक स्पर्धांमध्ये भाग घेउन पुरस्कार मिळविले होते.पाचवीच्या वर्गात असतानाच देशपा‘वयम् मोठ्ठ्म खोटम्’ या नाटकात भूमिका केली.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चरितार्थासाठी वर्ष १९७२ मध्ये बेर्डे यांनी मुंबई मराठी साहित्य संघाचे नाट्यग्रहात काम करण्यास सुरुवात केली.पडद्यामागच्या या कलाकाराने नुसते पडदा ओढण्याचे कामाबरोबर मंचावरील नटांचे अभिनयाचेही निरीक्षण करीत केले.वर्ष १९७९ मध्ये साहित्य संघाच्या ‘अमृत नाट्यनारती’द्वारे ते पडद्यामागून मंचावर आले तेथे काम करत असताना त्यांनी मराठी नाटकांतून छोट्या छोट्या भूमिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली.

पुरुषोत्तम बेर्डे व लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांनी मिळून “भाऊ बेर्डे” नावाची नाट्य संस्थाही उभारली होती.वर्ष १९८३ मधे त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टूरटूर’ या नाटकात प्रथम काम केले येथेच त्यांच्या विनोदी अभिनयाची चुणूक दिसून आली.‘शांतेचं कार्टं चालू आहे’ आणि ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाटकात त्यांनी लोकप्रियता मिळवली.

८० च्या दशकात रंगमंचावरील ते ‘सुपरस्टार’ होते.अभिनयाबरोबरच लक्ष्मीकांत बेर्डे एक उत्तम गिटारवादक तर होते.विनोद निर्मितीसाठी डोळ्यांचे प्रसंगनुरूप मिचकावणे,तसेच बोलक्या बाहुल्यांसाठी ओठांची हालचाल न करता शब्दोच्चार करण्याची कलाही ते जाणत होते. या कलेतुनच त्यांनी विशिष्ट आवाज काढण्याची कला आत्मसात केली होती.यातूनच स्वगत आणि मिमिक्रीचा यांचा प्रभावीपणे वापर केला.चित्रपटामधे कामा करत असताना १७ वर्षांनंतर त्यांनी ‘सर आली धावून’ या नाटकात गंभीर भूमिका साकारली होती.

प्रेक्षकांप्रमाणे त्यांना स्वतःलाही हि भूमिका आवडली होती. त्यांनी आपल्या विनोदी साचापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला आणि एक होता विदूषक ‘एक होता विद्या’ या चित्रपटात गंभीर भूमिकेत काम केले.अपेक्षित यश मिळाले नाही व बेर्डे आपल्या कॉमेडीकडे परत आले.

वर्ष १९८४ मध्ये त्यांनी ‘लेक चालली सासारला’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.त्यानंतर महेश कोठारे यांच्या “धूम धडाका” आणि दे दणादण चित्रपटात एकत्र काम केले.हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध झाले आणि लक्ष्मीकांत बर्डे यांनी विनोदी अभिनेता म्हणून तसेच आपली विनोदी शैली प्रस्थापित केली.‘धूमधडाका’ , ‘थरथराट’ , ‘दे दणादण’ , ‘अशी ही बनवाबनवी’ , ‘हमाल दे धमाल’ , ‘गोडीगुलाबी’ , ‘जनता जनार्दन’ , ‘आपला लक्षा’ , ‘खतरनाक’ , ‘आधारस्तंभ’ , ‘देखणी बायको नाम्याची’ , ‘पछाडलेला’ या गाजलेल्या चित्रपटांबरोबर असे एकुण,एकशे दोन मराठी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.तसेच बेर्डे यांनी मराठी टीव्ही सीरियल “नस्ती आफत” आणि “गजरा” मध्ये काम केले होते.८०चे दशक मराठी चित्रपटसृष्टीत ‘अशोक-लक्ष’ युगाच्या रूपात सर्वांना चांगलेच आठवणीत राहील.

लक्ष्मीकांत बेर्डे अखेरपर्यंत दोन्ही अभिनेते सर्वोत्कृष्ट मित्र राहिले.१९८९ मध्ये “मैने प्यार किया” या हिंदी चित्रपटात बेर्डे यांनी सलमान खान यांचेबरोबर प्रभावी भूमिका केली.हा बेर्डेचा पहिला हिंदी चित्रपट होता.तसेच “हम आपके हैं कौन” या गाजलेल्या चित्रपटासह ६७ हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.१६ डिसेंबर २००४ रोजी वयाच्या पन्नासाव्या वर्षी आजारपणात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले.

Leave a Reply

error: Content is protected !!