Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

Kolhapur city – करवीर छत्रपती शिवाजीराजे ( दुसरे ) 

1 Mins read

 

Kolhapur city शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे दुसरे पुत्र छत्रपतीं संभाजी राजे यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजीराजे दुसरे (खानवटकर भोसले )या घराण्यातून सन १७६२ मधे दत्तक आले.

कोल्हापूरचे छत्रपती घराणे सुरक्षित ठेवण्याची सर्व जबाबदारी छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी महाराणी जिजाबाई यांच्यावरच पडली होती.

आणि त्यांनी ती सुमारे बारा वर्ष मोठ्या जिद्दीने पार पाडली, वस्तुतः जिजाबाईंना राज्यकारभारात
त्यापूर्वीपासूनच लक्ष घालावे लागले होते.

छत्रपतीं संभाजीराजे यांच्या मातोश्री राजसबाई यांनी संभाजीराजे गादीवर बसल्यानंतर काही दिवस कारभार केला होता. जिजाबाई या १७५१ साली निधन पावल्या.

जिजाबाईं या संभाजीराजे यांना केवळ सल्लाच देत असत असे नव्हे तर सरदारांना आणि कारभाऱ्यांना प्रत्यक्ष आज्ञा ही देत असत.

संभाजीराजे यांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी जिजाबाईं यांच्यावर येऊन होती. त्यातच त्यांचे व पेशवे यांचे संबंध बिघडले.

जिजाबाई यांना पेशव्यांच्या धोरणासंबंधी वारंवार जी शंका येत असे तिचे प्रत्यंतर त्यांना त्यावेळी आले.

पेशव्यांनी Kolhapur city कोल्हापूरच्या गादीवर आपल्या प्रभावाखालील व्यक्ती दत्तक बसविण्याचा घाट घातला ;परंतु तो जिजाबाईंना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी पेशव्यांना विरोध दर्शवला.

विरोध मोडून काढण्यासाठी पेशव्यांनी पाच-सहा हजार फौजेसह विसाजी नारायण, सदाशिव अवधूत यांना पाठवले .

हे दोघे इचलकरंजीकर यांचे सरदार होते, आणि त्यांच्याबरोबर महादजी भोसले मुंगीकर यांचा भाऊ उमाजी भोसले हेही होते.

याच उमाजींना Kolhapur city कोल्हापूर राज्याच्या गादीवर बसवावे असा पेशव्यांचा आग्रह होता. त्यासंबंधी पेशव्यांनी आपल्या मनाप्रमाणे घडवून आणण्यासाठी सर्व उपाय योजिले आणि शेवटी लष्कर पाठवून Kolhapur city कोल्हापूरचे राज्य जप्त करण्याचे ठरवले.

विसाजी नारायण व सदाशिव अवधूत यांना पेशव्यांनी जिजाबाई यांच्या कडे पाठवले. जिजाबाईने पेशव्यांना आपले खरे रूप दाखवल्या बरोबर पेशव्यांपुढे मोठाच पेच प्रसंग उत्पन्न झाला.

जिजाबाई या अत्यंत शूर व हुशार होत्या.त्यांनी अप्रत्यक्ष युद्धात भाग घेत असल्याचेही उल्लेख आढळतात. छत्रपतीं संभाजीराजे यांच्या हयातीतच जिजाबाई यांनी काही लढायात भाग घेतला होता.

जिजाबाई या तोरगलकर शिंदे घराण्यातील असून नरसोजीराव शिंदे यांच्या कन्या होत्या.
हे राज्य महाराणी ताराबाई यांनी स्थापन केले ,तर महाराणी जिजाबाई यांनी त्याचे रक्षण केले.

यांच्यासारख्या दोन स्त्रियांच्या कर्तबगारीला विशेष महत्त्व होते.

पुण्यात चाललेल्या राजकीय उलथापालथीचा Kolhapur city कोल्हापूरचे छत्रपती शिवाजीराजे यांनी चांगलाच फायदा करून घेतला सवाई माधवरावांच्या काळात कोल्हापूरच्या राज्याची सर्व बाजूने कोंडी करण्यात आली होती.

त्याच्यातून बाहेर पडण्याची संधी छत्रपती शोधतच होते. या संधीतच कोल्हापूरचा भुदरगड किल्ला ताब्यात घेण्याचे ठरवले.हा किल्ला सुमारे दहा वर्ष पटवर्धनांच्या ताब्यात होता .

तो परत मिळावा अशी मागणी Kolhapur city कोल्हापूरच्या दरबाराकडून करण्यात येत होती .

परंतु या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही.शेवटी १७९६ मधे हा किल्ला काबीज करण्याची योजना शिवाजीराजेंनी निश्चित केली.हैबतराव गायकवाड यांना फौज देऊन किल्ला काबीज करण्यासाठी रवाना केले.

त्यांच्याबरोबर मानाजी घोरपडे, उदाजीराव घाटगे,अप्पाजी नलगे या सरदारांना पाठवले. या सर्वांनी मिळून भुदरगड किल्ला हस्तगत केला. भुदरगड किल्ला सर करण्यासाठी हैबतराव गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले होते .

म्हणून त्यांना “विश्वासराव “हा किताब देण्यात आला. भुदरगड हस्तगत केल्यानंतर Kolhapur city कोल्हापूरच्या फौजा चिकोडीच्या दिशेने निघाल्या .

या स्वारी बरोबर स्वतः छ.शिवाजीराजे होते. चिकोडीचे ठाणे पटवर्धनांच्या ताब्यात असल्यामुळे ते परत घेणे आवश्यक होते. चिकोडी नंतर दुसरे महत्त्वाचे ठाणे मनोळी हेही हस्तगत केले.

त्यानंतर हुबळी आधीकरून जवळपास अशी काही शहरे काबीज केली. तेथून फौजा वल्लभगडच्या किल्ल्यावर गेल्या. तो किल्ला ताब्यात घेतल्यानंतर कोल्हापूरच्या फौजा तासगाव कडे रवाना झाल्या . तासगाव हे परशुराम भाऊं पटवर्धन यांच्या ताब्यात होते.

तेथे त्यांचे मोठे वाडे व इतर मालमत्ता होती. ही सर्व मंडळी पुण्याला गेली असता छत्रपती यांनी त्यावर हल्ला करून ते शहर काबीज केले .

तासगावावर हल्ला करून तेही शहर काबीज केले म्हणजे आपोआपच पटवर्धन यांची शक्ती खच्ची होईल असे वाटल्यावरून छत्रपती शिवाजीराजे यांनी तासगाव आणि भोवतालचा प्रांत ताब्यात घेतला.

तासगावातील परशुराम पटवर्धन यांचे वाडे जाळून टाकले आणि कृष्णेपर्यंत ठाणी बसवली. या मोठ्या मोहिमेनंतर कोल्हापूरच्या फौजांनी जमखंडीला मोर्चे लावुन ते शहर काबीज करण्याचे ठरवले. जमखंडी छत्रपतींनी ताब्यात घेतले.

Kolhapur city कोल्हापूर जवळचे शिरोळ, चिकोडी आणि मनोळी हे दोन तालुके ही पेशव्यांच्या मार्फत परशुराम भाऊंकडे वहिवाटी साठी होते. तेही पुढे छत्रपतीनी ताब्यात घेतले.

कित्तूर ,हुबळी, वल्लभगड इत्यादी शहरे त्यांनी काबीज केली. इचलकरंजीच्या महत्त्वाच्या ठाण्यांनाही कोल्हापूरच्या फौजांचा उपसर्ग पोहोचला होता.

Kolhapur city कोल्हापूरच्या फौजा १७९७ मध्ये बाहेर पडल्या आणि त्यांनी मनोळी घेतल्यानंतर लगेच रामदुर्ग आणि नरगुंद या संस्थानिकांना जरब देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल केली.

Kolhapur city कोल्हापूरच्या फौजेची दुसरी तुकडी प्रितीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या दिशेने निघाली. त्यांनी शहापूर आणि अनगोळ व इतर लहानमोठी ठाणी ताब्यात घेतली.

यावेळी प्रीतीराव चव्हाण यांच्या बरोबर त्यांचे ज्येष्ठ पुत्र उदाजीराव चव्हाण हे बरोबर होते. उदाजीराव चव्हाण यांनी दोन-तीन हजार फौज घेऊन बेळगाव प्रांतात स्वारी केली.

कडलूर, उचगाव,कदनूर,कटनबावी ही गावे लुटून ताब्यात घेतली.

वरील घटनानंतर सहा महिन्यांनी खुद्द छत्रपती स्वतः फौजेनिशी गोकाकपर्यंत आले.

गोकाक हे गाव सदन आणि व्यापारविषयी प्रसिद्ध होते. हे गाव मूळचे कित्तूरकर देसायांचे असले तरी ते परशुराम पटवर्धनांच्या ताब्यात होते
.गोकाकवर स्वारी करून प्रीतीराव चव्हाणांनी सर्व दुकाने जाळून टाकली.

नंतर रविवार पेठेवर मोर्चे लावले. शेवटी १७ जानेवारी १७९८ रोजी गोकाकचे मजबुत आणि संपन्न ठाणे छत्रपतींच्या ताब्यात आले.

नंतर खुद्द छत्रपती आणि हिम्मत बहाद्दर यांनी आपल्या फौजा हुबळीकडे वळवल्या.

हुबळीचे ठाणे मूळचे कित्तूरकर देसाईंचे होते. छत्रपतींनी वेढा देऊन हुबळीचे ठाणे जिंकले.

Kolhapur city कोल्हापूरच्या इतिहासात ही मोहीम अनेक दृष्टीने महत्त्वाची ठरली.
करवीर छत्रपती शिवाजी महाराज यांनी जवळजवळ पन्नास वर्ष राज्य केले .

करवीर छत्रपती शिवाजी महाराजांचे एकंदर १४ विवाह झाले होते. त्यातील चौदावा विवाह कमळजाबाई यांच्याशी झाला होता.या कमळजाबाई निंबाजी नाईक निंबाळकर व दर्याबाई नाईक निंबाळकर (वैराग )सरलष्कर सातारा यांच्या कन्या होय.

दर्याबाई या महाराणी ताराराणी यांच्या नात होत्या.

५० वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करवीर छत्रपती यांनी राज्य केले.२४ एप्रिल १८१३ रोजी छत्रपती शिवाजी यांचे निधन झाले.

त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे पुत्र छ.संभाजी व छ.शहाजी यांनी Kolhapur city करवीर संस्थानचा कारभार पाहिला
अशा या थोर व शोर्यशाली करवीर दुसरे छत्रपती शिवाजी यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा 

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर 

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products. 

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox 

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!