Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BUSINESSINDIAMAHARASHTRAReal Estate

navi mumbai पुष्पक नगर होणार नवी मुंबईतील स्मार्ट रीच हब, तर उलवे येथे प्रती तिरुपती देवस्थानम

1 Mins read

आघाडी सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आणि शिवसेना यांनी navi mumbai  नवी मुंबई वर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे, त्याची कारणे अनेक आहेत.

navi mumbai नवी मुंबईतील स्थानिक अनेक बड्या नेत्यांनी कोणत्या ना कोणत्या भीतीने केंद्रातल्या भाजपा प्रणित सरकारला मिठी मारली आहे.

जागतिकीकरण, भांडवल शाही , खाजगीकरण यामुळे इथल्या भागाचा विकास होत आहे.

तर पक्षीय विचारधारेला स्थानिक राजकारणी आणि मतदार फारसे महत्व देत नसल्याचा इथे इतिहास आहे.

कदाचित याच कारणांमुळे इथल्या पक्षविचारधारा विरहित राजकारण या राजकीय संस्कृतीची पाळे – मुळे स्थानिक राजकारणात खोलवर रुजलेली आहेत असे दिसून येते.

राजकारण म्हटले कि आरोप प्रत्यारोप होतच असतात.

पण आपल्या नेत्या मागे सत्ता असो वा नसो इथला निष्ठावंत कार्यकर्ता आणि मतदार आतून बाहेरून पाठीशी उभा असल्याचेच दिसते.

शेकाप च्या शेतकरी, कष्टकरी, मजूर ,वंचित, मागास यांच्या न्याय हक्काच्या आणि लढ्याच्या विचारांनी प्रेरणा घेत वाढलेला हा गड आहे.

आजही इथला भाग शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय धोरणांनी, विचारांनी बांधील असल्याचेच पाहायला मिळतो.

याच शेकाप सोबत नवी मुंबई / रायगड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या काळात आपले हातपाय पसरायला सुरुवात करत आहे. 

येत्या काळात नवी मुंबई चे वाढते शहरीकरण आणि देशाच्या पर्यटन, अर्थ , राजकीय आणि सामाजिक पटलावर तिचे बदलते वाढते महत्व नक्कीच अधोरेखित करता येण्यासारखे आहे. 

Also Visit : https://www.postboxlive.com

केंद्रीय रस्ते/ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील अलीकडच्या काळात navi mumbai  नवी मुंबईतील मोठे रस्ते प्रकल्पांचे उदघाटन करून मार्ग मोकळे करून दिले. 

तर स्थानिक खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे फार मोठे सहकार्य आणि योगदान आहे.

यांच्यामुळे अनेक विकास प्रकल्पाचे मार्ग काम आणि अडथळे विनाविलंब मार्गस्थ झाले आहेत.

गणेश नाईक यांच्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाने नवी मुंबईचा विकास टप्प्या टप्प्याने घडत गेला. नवी मुंबई गणेश नाईक यांच्या शिवाय अपूर्ण आहे. सध्या साहेब कधी स्वगृही परत येतील याच्यावर कार्यकर्ते आस लावून आहेत. 

तिरुपती देवस्थानाच्या विश्वस्तपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती navi mumbai  नवी मुंबईतील पर्यटन उद्योगाला चालना देणारे ठरत आहे.

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे स्वतः जातीने navi mumbai नवी मुंबईतील विकासकामे आणि नवीन प्रकल्पांवर जातीने लक्ष ठेवून आहेत.

navi mumbai  नवी मुंबईतील पर्यटन आणि शहरी विकास कामाला आता वेग आला आहे.

देशातील अनेक महत्वाच्या प्रकल्पांपैकी शिवडी- न्हावा ट्रान्स हार्बर लिंक अर्थात एमटीएचएल हा देशातील सर्वात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

मुंबई – नवी मुंबई / रायगड / गोवा / अलिबाग कॉरिडॉर ला कमी वेळेत जोडणारा प्रकल्प इथल्या जेएनपीटी सारख्या व्यावसायिक पोर्टलाच फायद्याचा नसून तर संपूर्ण व्यावसायिक / आर्थिक समीकरणे बदलणारी हि योजना आहे.

त्यामुळे या हार्बर लिंक चे महत्व लक्षात घेता दक्षिण मुंबई ते नवी मुंबई याला जलद जोडणारा प्रकल्प आहे.

त्यामुळे पर्यटनाला खूपच मदतगार साबित होणार आहे.
 
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून तिरुमाला तिरुपती प्रती देवस्थानची इथे योजना तयार झाली आहे.

शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांची जगविख्यात तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त पदावर नियुक्ती आहे.

अवघ्या सात आठ महिन्यात शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी navi mumbai  नवी मुंबईतील उलवे येथे १० एकर जागा देवस्थानच्या मंदिरासाठी मिळविली.

हि जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना विश्वासात घेऊन मिलिंद नार्वेकरांनी या जागेच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाची मान्यता मिळवून घेतली.

ज्या बालाजी भक्तांना आंध्रप्रदेशात जाऊन साक्षात तिरुपती बालाजीचे दर्शन घेणे काही कारणांनी अवघड जाते आहे.

अथवा अडथळा येत असतो त्यांना नवी मुंबईत प्रति बालाजी येथे दर्शन घेणे सोयीचे आणि सुलभ होणार आहे.

उलवे मध्ये व्यंकटेश्वराचे भव्य मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे गरिबातील गरीब महाराष्ट्रातील भाविकांना दक्षिणेत अधिक खर्च करून जाण्या ऐवजी navi mumbai नवी मुंबईतच दर्शन घेता येणे शक्य होणार आहे.

मिलिंद नार्वेकरांनी समितीचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई उलवे येथे मंदिराच्या प्रायोजित जागेची पाहणी सुद्धा केली आहे.

आणि त्या संदर्भातील सूचना आणि योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळविल्या. पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने मंदिराच्या जागेचा ताबा देवस्थान समितीला मिळणार आहे.

Also Read : https://www.postboxindia.com/शरद-पवार-सामना-आता-निकराच/

नवी मुंबई विमानतळ क्षेत्र,ट्रान्सहार्बर लिंक आणि इतर पायाभूत सोयी सुविधांसह स्मार्ट सिटी बनत आहे.

 navi mumbai नवी मुंबईतील उलवे भागाला आता प्रती बालाजी मुळे पर्यटनातून सुद्धा राज्यातच नव्हे तर देशात अनन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे.

उलवे भागाला शहरीकरणातून या भागाचा विकास होत असताना येथील रियल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक अनेकांना लाभदायकच ठरली आहे.

याच उलवे भागा पाठोपाठ त्याच्या जवळच नवी मुंबई विमानतळानजीक वसत असणारे स्मार्ट सिटी पुष्पक नगर, दापोली हे सुद्धा आज रियल इस्टेट मध्ये गुंतवणुकीसाठी सोन्याची संधी घेऊन आले आहे.

नियोजित सिडकोच्या पायाभूत सुविधांसह व्यावसायिक क्षेत्र, नवी मुंबईतील पहिले मोठे पंचतारांकित हॉटेल, स्टेडियम, यासह आंतरराष्ट्रीय अत्याधुनिक सोयी सुविधा देखील इथे असणार आहेत.

या भागाला पुढे लवकरच सोन्याचे दिवस येतील असे मत कामोठे येथील भाजपचे नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक रमेश तुपे यांनी व्यक्त केले.

असेच काहीसे मत navi mumbai  नवी मुंबईतील अनेक प्रॉपर्टी एक्स्पर्ट आणि सिडको च्या अधिकाऱ्यांनी सुद्धा व्यक्त केले आहे.

त्यामुळे नवी मुंबईतील भविष्यातील सुवर्ण संधी ओळखून ज्यांच्या उलवेतील गुंतवणुकीच्या संधी निसटल्या आहेत त्यांनी पुष्पक नगर ला हक्काचे घर अथवा प्रॉपर्टी गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही.

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!