Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIANewsPostbox Marathi

फिल्ड मार्शल माणेकशा – महागडा सौदा

1 Mins read
  • फिल्ड मार्शल माणेकशा - महागडा सौदा

फिल्ड मार्शल माणेकशा – महागडा सौदा

 

 

27 जून  फिल्ड मार्शल माणेकशा यांचा स्मृतिदिन 

 

महागडा सौदा

ब्रिटिश राजवटीमध्ये भारतीय सैन्यदलात एक गोरा, ऊंच पारशी अधिकारी होता.त्याला मोटार सायकल चालविण्याचे जबरदस्त वेड होते. त्यासाठी सन 1947 मध्ये त्याने त्या काळात सुप्रसिद्ध असलेली जेम्स कंपनीची मोटार सायकल रु.1600/- ला खरेदी केली. मात्र त्या अधिकार्या हाताखालील एक मुस्लिम कनिष्ठ अधिकार्याचा या मोटार सायकलवर डोळा होता.तोच जास्तीत जास्त वेळा ही मोटार सायकल चालवीत असे.
15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला.

पुढे हिंदुस्थानची फाळणी झाली.त्यामध्ये मध्य भारत व त्याच्या पश्चिमेला पश्चिम पाकिस्तान व पूर्वेला पूर्व पाकिस्तान असे भाग झाले. पश्चिम व पर्व पाकिस्तान पाकिस्तानी राजवटीत राहिले तर मध्ये असलेला भारत भारतीय राजवटीत आला.

सहाजिकच सैन्यदलातील अधिकारी व जवान यांचेही वेगवेगळे वाटप झाले. तो गोरा ऊंच पारशी अधिकारी भारतीय सैन्यदलात राहिला व मुस्लिम कनिष्ठ अधिकारी पाकिस्तानात गेला.
प्रत्यक्ष देश सोडून जाताना तो मुस्लिम अधिकारी पारशी अधिकार्याला म्हणाला ,

“सर भारतात तुम्हाला सर्व काही मिळेल पण मला मात्र पाकिस्तानात काहीही मिळणार नाही. तरी तुमची इच्छा असेल तर तुमची ही मोटार सायकल मी विकत घेऊ इच्छितो. पारशी अधिकार्याने त्या मुस्लिम कनिष्ठ अधिकार्याच्या भावना लक्षात घेऊन ती मोटार सायकल विकण्याची तयारी दर्शवली. रु.1000/- त सौदा झाला.

पण सध्या माझ्याजवळ तेवढे पैसे नाहीत असे सांगून पाकिस्तानात पोहचल्यावर ताबडतोब पैसे पाठवतो असे वचन दिले.दिलदार पारशी अधिकार्याने देखील जास्त ताणून न धरता या विनंतीला होकार दिला. त्याप्रमाणे तो मुस्लिम अधिकारी मोटार सायकल घेऊन पाकिस्तानात गेला आणि नेहमीच्या सवयीनुसार आपला शब्द पाळण्याचे विसरला.पारशी अधिकार्यानेही त्याला कधी आठवण करुन दिली नाही.
त्यानंतर डिसेंबर 1971 मध्ये भारत – पाकिस्तान युध्द झाले.त्यात पाकिस्तानचा सपशेल पराभव झाला. पूर्वेकडील पूर्व पाकिस्तान नामशेष होऊन नवीन बांगलादेश हे राष्ट्र उदयास आले.

त्यावेळी भारतीय सैन्यदलात लष्कर प्रमुखाची भुमिका बजावणारा तो पारशी अधिकारी म्हणाला पाकिस्तानी लष्कराला त्यांचा भूतकाळातील सौदा महागात पडला.मी माझ्या मोटार सायकलचे फक्त रुपये 1000/- मागितले होते. पण तेही त्यांनी दिले नाहीत. शेवटी ते वसूल करण्यासाठी मला अर्धा पाकिस्तान घ्यावा लागला”

पैसे बुडविणारा तो पाकिस्तानी अधिकारी होता  लष्कर प्रमुख याह्याखान आणि ही किंमत वसूल करण्यासाठी अर्धा पाकिस्तान ताब्यात घेणारा तो लष्करी अधिकारी होता
फिल्ड मार्शल सॅम माणेकशा उर्फ आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सॅम बहादूर.

दिनांक 27 जून 2008 रोजी या वाघाने जगाचा निरोप घेतला.

स्मृतीदिनानिमित्त त्यांना मानाचा मुजरा, एक कडक सॅल्यूट.

 

 

लेखक
रवींद्र पाटकर
सहाय्यक पोलीस आयुक्त
बृहन्मुंबई

Leave a Reply

error: Content is protected !!