Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & Order

EPF – कामगारांचा पीएफ

1 Mins read
  • EPF

EPF – कामगारांचा पीएफ

 

EPF – खाजगी ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगारांचा सुद्धा पीएफ कापला जातो.

 

महानगरपालिका आणि इतर ठिकाणी ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पीएफचे खाते उघडलेलं असते. त्यामुळे ही पोस्ट आणि व्हिडीओ अत्यंत महत्वाचा आणि अगदी सामन्यातील सामान्य माणसाच्या उपयोगाचा आहे.

● कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या खातेधारकांना कर्मचारी भविष्य निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजनेशिवाय (EPS) जीवन विमा अर्थात लाईफ इन्शुरन्सचा (Life Insurance) आणखी एक मोठा फायदा देते. ज्यांच पीएफ अकाऊंट आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांना एम्प्लॉईज डिपॉजिट लिंक्ड इंश्योरेंस स्कीम, 1976 अर्थात (EDLI) नुसार विमा कव्हर मिळतं.

● EDLI नुसार प्रत्येक EPF खातेधारकाला 7 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा सुरक्षा अर्थात इन्शुरन्स कव्हर मिळतो. महत्वाचं म्हणजे या योजनेत कर्मचाऱ्यांना कोणताही हप्ता किंवा पैसे भरावे लागत नाही. ज्यांचा पीएफ कट होतो किंवा पीएफ अकाऊंट आहे, त्यांना हा लाभ आपोआपच मिळतो.
(EDLI scheme for EPFO employee EPF account holder can claim 7 lakh after employee death due to corona)

● जर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला, तर त्यांचे वारस या विमा रकमेवर दावा करु शकतात. पूर्वी या योजनेची मर्यादा 6 लाख होती ती गेल्यावर्षी सप्टेंबर 2020 मध्ये वाढवून 7 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली.

● जर EPF पीएफ खातेधारकाचा नैसर्गिक किंवा अपघाती किंवा आजाराने मृत्यू झाला तर नातेवाईक विमा रकमेवर दावा करु शकतात. यामध्ये एकरकमी पैसे मिळतात. हे विमाकवच पीएफ खातेधारकाला मोफत मिळतं. त्यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही. पीएफ अकाऊंटसोबतच हे आपोआप लिंक होतं.

● यासाठी विमा कंपनीला मृत्यू दाखला (Death certificate), वारस प्रमाणपत्र (succession certificate) आणि बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता असेल. कोरोनामुळे (COVID-19) होणाऱ्या मृत्यूप्रकरणातही या रकमेवर नातेवाईक दावा करु शकतात. जर कोणी वारस नसेल तर कायदेशीर नातेवाईक या रकमेवर दावा करु शकतात.

EPF - कामगारांचा पीएफ

EPF – कामगारांचा पीएफ

● EPF खात्यातून पैसे काढण्यासाठी एम्प्लॉयर अर्थात तुमच्या कंपनीकडे जमा होणाऱ्या फॉर्मसह, विमा सुरक्षेचा फॉर्म (Insurance cover) 5 IF सुद्धा जमा करावा. हा फॉर्म कंपनीने व्हेरिफाय केल्यानंतर विमा सुरक्षेचं पैसे दिले जातात.

● सध्या कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम त्याच्या पीएफ खात्यात जमा होते. कर्मचारी 12 टक्के आणि कंपनीही तेव्हढीच म्हणजे 12 टक्के रक्कम पीएफमध्ये जमा करते. कंपनी जी 12 टक्के रक्कम भरते त्यामध्ये 3.67 टक्के रक्कम EPF आणि 8.33 टक्के रक्कम EPS मध्ये जमा केली जाते.

● कंपनीकडून EDLI मध्ये जमा केलेल्या रकमेच्या 0.5 टक्के रक्कमेनुसार पीपीएफ खातेधारकाच्या वारसाला 7 लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा रक्कम मिळू शकते.

EPF पीएफ खातेधारकांना हा लाभ केवळ नोकरीत असताना मिळतो, निवृत्तीनंतर विम्याच्या रकमेवर दावा करता येऊ शकता नाही.

 

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!