Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSEntertainmentINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

पद्मश्री अभिनेते बलराज साहनी

1 Mins read
  • पद्मश्री अभिनेते बलराज साहनी

पद्मश्री अभिनेते बलराज साहनी

बलराज साहनी यांचा जन्म १ मे १९१३ रोजी सध्याचे पाकिस्तानातील रावळपिंडी येथे झाला. त्यांचे जन्म नाव “युधिष्ठिर साहनी” असे होते. त्यांनी शासकीय महाविद्यालय लाहोर येथे शिक्षण घेतले.इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, ते रावळपिंडीला परत आले.या दरम्यान त्यांनी दमयंती साहनी यांचेशी विवाह केला.या दोघांना परीक्षित हा पुत्र व शबनम अशी दोन अपत्ये झाली.परीक्षित साहनी हे अभिनेते म्हणून प्रसिद्ध झाले,मात्र कन्या शबनम हिचा लवकर मेंदुविकाराने मृत्यू झाला.वर्ष १९३० नंतर,साहनी आणि त्यांच्या पत्नीने रावळपिंडी सोडले आणि शांतिनिकेतन येथे टागोरांच्या विश्व-भारती विद्यापीठात इंग्रजी आणि हिंदी शिक्षक म्हणून रुजू झाले.येथेच त्यांचा मुलगा परीक्षित साहनी यांचा जन्म झाला.तेथे त्यांची पत्नी दमयंती पदवीचे शिक्षण घेत होती.वर्ष १९३८ मध्ये त्यांनी महात्मा गांधींसोबत एक वर्ष काम केले.त्यानंतर गांधींच्या आशीर्वादाने, रेडिओ उद्घोषक म्हणून बीबीसी-लंडनच्या हिंदी सेवेत लंडन येथे सामील झाले.ते साम्यवादी विचारसरणीचे क्रियाशील कार्यकर्ते होते.

वर्ष १९४३ मध्ये भारतात ते परत आले.साहनी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्यांनी “IPTA” च्या नाटकांमधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.वर्ष १९४६ मध्ये “धरतीके लाल “या चित्रपटाद्वारे बलराज यांनी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले.

साहनी यांनी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवण्याच्या खूप आधी, त्यांची पत्नी दमयंती एक इप्टाची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या.या दोघांनीही वर्ष १९४६ मधे “दूर चलें” या चित्रपटात काम केले होते.त्यांच्या पत्नी दमयंती यांचे १९४७ मध्ये निधन झाले. वर्ष १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या आलेल्या बिमल रॉयच्या ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटामुळे अभिनेता म्हणून त्यांची खरी ओळख झाली.या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला होता.

‘ दो बिघा जमीन’ या चित्रपटाशी बलराजची जोडलेली कथाही रंजक आहे.बिमल रॉय यांनी या चित्रपटासाठी बलराजच्या आधी अशोक कुमार, त्रिलोक कपूर यांच्या नावाचाही विचार केला होता.रॉय यांनी बलराज साहनी यांचा ‘हम लोग’ हा चित्रपट पाहिला आणि या चित्रपटात बलराजला मुख्य भूमिका देण्याचे ठरवले.त्यांनी बलराजला फोन केल्यावर ते सूट आणि बूट घालून बिमलच्या ऑफिसमध्ये पोहोचले.बिमल त्याला पाहून ते एका तरुण रिक्षाचालकाची भूमिका साकारू शकेल असे वाटत नव्हते.तेव्हा बिमल बलराजला म्हणाले, ‘साहनी साहेब, तुम्ही भूमिकेस अजिबात शोभत नाही. चित्रपटातील व्यक्तिरेखा एका गरीब रिक्षाचालकाची आहे.’ यावर साहनी यांनी बिमलला ‘धरती के लाल’ हा चित्रपट एकदा पाहण्याची विनंती केली.बिमलने चित्रपट पाहिला आणि मग समाधानी होऊन बलराजला भूमिका दिली. यानंतर बलराज आपल्या भूमिकेच्या तयारीसाठी दररोज तासनतास मुंबईच्या रस्त्यावर रिक्षा चालवत असत.

दुसरा किस्साही मजेशीर आहे.एकदा बलराज एका मिरवणुकीत सामील झाले होते., जिथे हिंसाचार सुरू झाला तेव्हा साहनी यांना इतरांसह अटक झाली. त्यानंतर एके दिवशी के. आसिफ त्यांना भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचले आणि साहनी यांना ओळखल्यानंतर जेलरने त्यांना तुरुंगात राहून शूट करण्याची परवानगी दिली.यानंतर साहनी रोज सकाळी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जायचे आणि संध्याकाळी तुरुंगात परतायचे. सुमारे तीन महिने तुरुंगात राहून त्यांनी ‘हुलचल’ चित्रपटाचे शूटिंग केले.सुमारे १०० चे वर भावपूर्ण भूमिका करणारे म्हणून त्यांची ओळख कायम राहील.

(निधन १३ एप्रिल १९७३).

लेखन

माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!