Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Baburao pendharkar – नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर 

1 Mins read
  • Baburao pendharkar

Baburao pendharkar – नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर 

मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, पटकथा लेखक निर्माते Baburao pendharkar – बाबुराव पेंढारकर यांची आज जयंती.  त्यांचा जन्म २२ जून,१८९६ रोजी कोल्हापूर येथे झाला.मास्टर विनायक हे त्यांचे सावत्र भाऊ ,व भालजी पेंढारकर हे धाकटे भाऊ . इ.स. १९२० साली त्यांनी सैरंध्री या मराठी चित्रपट लेखन व दिग्दर्शन केले आणी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.

वर्ष १९२० ते १९६६ या ४६ वर्षांच्या कालखंडामधे ६८ चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून तर ५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले तसेच दोन चित्रपटाची निर्मिती केली. ‘ ते प्रभातचे व्यवस्थापक असताना झालेल्या साहित्य संमेलनास आलेल्या कवि व लेखक मंडळींच्या काव्यवाचनाचे चित्रीकरण करताना आचार्य अत्रे यांची ओळख झाली व त्याचे मैत्रीत रूपांतर झाले.

अत्रे याना त्यांनी चित्रपटासाठी एखादी कथा द्या असे सुचविल्यावर अत्रे त्यांना म्हणाले अत्रे म्हणाले, ‘मला चित्रपट तंत्र फारसं अवगत नाही. सध्या मी नाटक लिहितोय, तेव्हा खांडेकरांकडून प्रथम गोष्ट घ्या नंतर मी एखादी चांगली कथा देईन. वि.स.खांडेकरांना पटकथा लिहिण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले .आणि खांडेकर लिखित ‘छाया’चित्रपट प्रथम निघाला.

स्वत:ला संधी आपल्या साहित्यिक मित्राला देताना अत्रेंच्या माणुसकीचे दर्शन Baburao pendharkar – बाबूरावांना झाले. चित्रपट व्यवसाय मध्ये सुरवातीपासून चढ उतार होतेच .वर्ष १९३३ मधे “प्रभात फिल्म कंपनीने कारभार पुणे येथे हलविण्याचे ठरविले.पण Baburao pendharkar – बाबुराव पेंढारकर पुण्यात राहणे परवडणारे नव्हते म्हणून गेलं नाहीत.ते प्रभातचे मॅनेजर होते,”प्रभात” हे नावही त्यांनीच सुचविले होते.

मेजर निंबाळकर आणि भालजी यांनी ‘कोल्हापूर सिनेटोन कंपनी ‘काढली व त्याचे मॅनेजर म्हणून Baburao pendharkar – बाबुरावांची नियुक्ती झाली.कंपनीचा पहिला चित्रपट ‘विलासी ईश्वर’प्रदर्शित झाला व त्यातही Baburao pendharkar – बाबुरानी भूमिका केली होती.पण सिनेटोन मध्ये त्यांची घुसमट होऊ लागली व कंपनी सोडायचे ठरविले.त्यांनी पांडुरंग नाईक यांच्या मदतीने ‘ हंस पिक्चर्स हि नवी कंपनी काढली.

‘हंस पिक्चर्स’चा त्यानंतर आलेला ‘ज्वाला’चित्रपट न चालल्यामुळे संस्था डबघाईला आली.नैराश्याने बाबूराव अत्रे यांचबरोबर कोल्हापूरला गेले.‘आठवडय़ाभरात नव्या चित्रपटाचा मुहूर्त न केल्यास संस्थेची पत राहणार नाही.’असे ते अत्रे यांच्यापाशी बोलताच,अत्रे म्हणाले’आठ दिवसाऐवजी तीन दिवसातच पटकथा लिहून देतो.’

आचार्य अत्र्यांच्या विनोदी शैलीतील “ब्रह्मचारी” या चित्रपटाची कथा बाबुरावांचे पुढे आली.’ हंस पिक्चर्स ‘ मार्फत याचे प्रदर्शन झाले व या चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळाला व कंपनीला जीवदान मिळाले .सर्वसाधारणपणे ठराविक साच्याच्या भूमिका करण्याचा अभिनेत्यांचा कल असतो. मात्र बाबुरावांनी अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या.

अत्रेंच्या यांच्या ‘महात्मा फुले’मधील जोतिबांची त्यांनी केलेली भूमिका इतकी सुंदर रीतीने त्यांनी वठविली की खुद्द अत्रेंना आपल्यासमोर साक्षात ‘जोतिबा’असल्याचा भास झाला. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमातूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.त्यांच्यात असलेल्या लेखकाने बालगंधर्वाच्या मृत्यूनंतर ‘एकमेवाद्वितीय कलानिधी’हा श्रद्धांजली लेख लिहिला.

आपल्या चित्रपट व्यवसायाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे “चित्र आणि चरित्र” हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले.आचार्य अत्रे यांनी या आत्मचरित्रावर अग्रलेखही लिहिला.वयाच्या पन्नाशीनंतर बाबूराव रंगभूमीकडे वळले.अत्रेंच्या सूचनेवरून त्यांनी ‘झुंझारराव’साकारला. व नाट्य अभिनेते म्हणूनही आपला ठसा उमटविला.

चित्रपट व्यवसायाचे धकाधकीचे जीवन जगात असताना त्यांची दैनंदिनी मात्र शिस्तबद्ध होती. रोजचा तासभर व्यायाम,देवावर श्रद्धा,जेवताना फळे नि दुध,साथीला आनंदी स्वभाव अश्या पद्धतीने त्यांनी जीवन व्यतीत केले. ९ नोव्हेंबर १९६७ रोजी Baburao pendharkar – बाबूरावांचे निधन झाले.

 

 

 

माधव विद्वंस

Leave a Reply

error: Content is protected !!