Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

दिवंगत खासदार शंकरराव मोरे 

1 Mins read
  • दिवंगत खासदार शंकरराव मोरे 

दिवंगत खासदार शंकरराव मोरे 

“ मान ताठ अन तिरपी टोपी” अश्या तडफदार व्यक्तिमत्वाचे, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक दिवंगत खासदार शंकरराव मोरे यांचा आज स्मृतिदिन.त्यांचा जन्म पुणे येथे १४ ऑगस्ट १८९९ रोजी एका सामान्य गरीब कुटूंबात झाला.लहानपणीच त्यांचे मातृपितृ छत्र हरपले.अश्या अडचणीतही त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पार पडले.त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून बीएची ,तसेच त्यानंतर मुंबई आणि पुण्यातील लॉ कॉलेजमधून कायद्याचा अभ्यास पूर्ण केला.काही काळ त्यांनी वकिलीही केली.

सत्यशोधक समाज तसेच साम्यवादी विचारसरणीचे मुशीतच त्यांना वैचारिक प्रगल्भता आली होती.स्वतः गरिबीत वाढल्यामुळे सहाजिकच ते समाजसेवेकडे वळले.त्यांची रहाणी अत्यंत साधी होती. त्यांचा स्वतःचा मोठा ग्रंथ संग्रह होता.त्यांचे घर कार्यकर्त्यांनी गजबजलेले असायचे.त्यांच्या पत्नी शांताबाईं स्वतः जातीने सगळ्यांची उठबस करायच्या. परिवर्तनवादी चळवळींमधे स्वतःचे असे खास स्थान निर्माण केले होते. सुरवातीस गांधी आणि काँग्रेसपासून ते चार हात दूरच राहिले, मात्र स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला.वर्ष १९४६-१९४८ या कालावधीत अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य सदस्यही होते.

मात्र त्यांचे मन काँग्रेसमध्ये रमत नव्हते. महाराष्ट्रात पांढरपेशा पुढाऱ्यांचेमधे अडकलेली काँग्रेस त्यांना भावणे अवघडच होते.त्यामुळे शंकरराव मोरे व त्यांचे सहकारी काँग्रेसचा त्याग करून शेतकरी कामगार पक्षाच्या निर्मितीकडे वळले. स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला वर्ष १९४६च्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यां सहकाऱ्यांना शंकरराव मोरे यांनी आपल मनोगत व्यक्त केले व शेतकरी कामगार पक्षाची आवश्यकता असल्याचे सांगितले.काँग्रेस सरकार हे भांडवलदारांचे हित पाहणारे आणि शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करण्याच्या घोषणेच्या विरोधात काम करत आहे.यामुळे आपणास वेगळा मार्ग निवडावा लागेल असे सूचित केले. यानंतर दिनांक ११-१-१९४७ रोजी मुंबईतील शंकरराव मोरे यांच्या घरी काँग्रेस शेतकरी-कामकरी संघाची बैठक बोलावण्यास आली.

सदर बैठकीत महाराष्ट्राचे उदगाते यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम “शेतकरी-कामकरी पक्ष स्थापनेस प्रखर विरोध केला होता, या विरोधाने खचून न जाता पुण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी केशवराव जेधे, औटे, मोहिते, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख, भापकर, भाऊसाहेब शिरोळे यांना एकत्रित करून शंकररावजी मोरे यांनी ‘शेतकरी-कामकरी’ ऐवजी नवा ‘शेतकरी-कामगार पक्ष ’स्थापन करण्याचा मुहूर्त नारळ फोडला,व १३ जून १९४८ रोजी पक्षाची स्थापन करणेत आली.पहिल्याच लोकसभा निवडणुकीत ते सोलापूर मधून निवडून आले व केंद्रीय अर्थ समितीचे सदस्यही झाले. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा घडवण्यासाठी सतत पुढाकार घेतला. उपेक्षितांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती होण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. या कार्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक संस्थांमधून पुढील प्रमाणे विविध पदांवर काम केले.

पुणे जिल्हा शालेय शिक्षण मंडळ सदस्य (१९३१-१९३५),मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र (सिनियर फेलो)(१९३३-१९३८), पुणे जिल्हा स्थानिक समिती अध्यक्ष (जिल्हा लोकल बोर्ड) (१९३५-४०),
पुणे जिल्हा ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष (१९३८-१९४०), अखिल भारतीय कॉंग्रेस समिती सदस्य (१९४६-१९४८), महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस समिती सदस्य (१९४६-१९४८),प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण समिती, मुंबईचे अध्यक्ष (१९३७),मुंबई स्थानिक चौकशी समिती सदस्य (१९३९), न्यायांगाचे शासनांगापासून विलगीकरण समिती सदस्य, मुंबई (१९४७),इंडियन रिफायनरी लि. चे संचालक, पहिल्या लोकसभेचे सदस्य (१९५२-५७),पहिल्या लोकसभेतील अंदाज समितीचे सदस्य.

५ मार्च १९६६ रोजी त्यांचे निधन झाले.

 

 

माधव विध्वंस

Leave a Reply

error: Content is protected !!