Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSEntertainmentINDIANewsPostbox Marathi

जलाल आगा 

1 Mins read
  • जलाल आगा 

बहुचर्चित अभिनेते जलाल आगा 

ते नेपोटीजम अर्थात परीवारवादाचे विरोधात होते.आज चित्रपटसृष्टीत अनेक असे अभिनेते आहेत ज्यांची आई किंवा वडील अभिनेते किंवा निर्माते आहेत, म्हणून सिनेमात कामं मिळाली आहेत.
त्यांचा जन्म ११जुलै १९४५ रोजी मुंबई येथे झाला.ते प्रसिद्ध अभिनेते,गायक, अभिनेते आणि दिग्दर्शक आगा बेग यांचे पुत्र होते.जलाल आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होते.जलाल याला आणखी तीन बहिणी होत्या.वडील आगासाहेब यांना त्यांच्या अनेक मित्रांनी आपल्या मुलाला अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला होता,पण ते असे म्हणत की आधी तो अभ्यास करेल, मग त्याला वाटेल ते करेल.

आपला मुलगा जलाल याच्या शिक्षणाबाबत आगा अत्यंत गंभीर आणि कठोर होते.जलालने चांगला अभ्यास करून ज्ञान मिळवावे अशी त्यांची इच्छा होती.त्यामुळे त्यांनी बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केले.जलाल यांचे शालेय शिक्षण सिंधिया स्कूलमधून झाले.त्यानंतर त्यांनी एफटीआयआय पुणे येथून अभिनयाचा कोर्स केला.

त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती शोलेमधील हेलनसोबत ‘मेहबूबा ओ मेहबूबा’ या गाण्यातील नृत्यामुळे. त्यांनी बालपणातच बॉलिवूडच्या जगात प्रवेश केला होता.जलाल आगा यांना मात्र आपल्या वडिलांच्या नाव व शिफारशीवर काम नको होते.त्यांना त्यांची स्वतंत्र ओळख हवी होती. वर्ष१९९० च्या दशकापर्यंत त्यांनी मुख्यत्वे विनोदी व चरित्र अभिनेता म्हणून हिंदी, तसेच काही इंग्लिश चित्रपटांतून अभिनय केला.
लहानपणी अभिनेते दिलीप कुमार त्यांच्या घरी आले आणि त्यांनी वडिलांना आगा यांना सांगितले “के आसिफ साहब” ‘मुगल-ए-आझम’ चित्रपट बनवत आहेत.मी यात राजपुत्र सलीमची भूमिका साकारत आहे, पण माझ्या बालपणीच्या भूमिकेसाठी तुझा मुलगा हवा आहे.मात्र आगा यांनी नकार दिला.

पण दिलीप कुमारनी जलालला त्याच्या वडिलाना न सांगता चित्रपटाच्या सेटवर नेले.इकडे आगा आपल्या मुलाला ठिकठिकाणी शोधत होते.नंतर त्यांना कळलं की दिलीप कुमार मुलाला घेऊन गेला आहे.आगा सिनेमाच्या सेटवर गेले.तीन दिवस चित्रपटाचे शूटिंग सुरू होते.सेटवर जलालचे वडील आल्याने जलालला काम करताना दडपण येऊ लागले.त्यानंतर जलालने दिग्दर्शकाला वडिलांना सेटवरून जाणेस सांगावे असे सांगितले.या प्रकारे जलाल यांनी मुगल-ए-आझम या वर्ष १९६० मधे प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटातल्या बालजहांगीराचे भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.जलाल यांनी सुमारे १०० चित्रपटांमध्ये काम केले.

जितेंद्रचा सुपरहिट चित्रपट ‘फर्ज’ पहिल्यांदा जलाल यांना देणेत आला होता.जलाल आगा यांनीही हा चित्रपट साईन केला होता,पण वडील आगा साहेबांच्या शिफारशीमुळे हा चित्रपट मिळाल्याचे कळल्यावर त्यांनी त्यात काम करण्यास साफ नकार दिला.

आगा चित्रपटा अभिनेता मध्ये यशस्वी झाले, पण त्यांचे आयुष्य खडतर झाले होते.त्यांनी मॉडेल व्हॅलेरी परेराशी विवाह केला होता.त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली.पण व्हॅलेरीशी त्याचे लग्न केवळ आठ वर्षे टिकू शकले.दोघांनी घटस्फोट घेतला.घटस्फोटानंतर त्यांची पत्नी पुन्हा लग्न करून जर्मनीला गेली.एकदा मित्रांसोबत गप्पा मारत ते बसले होते.त्यावेळी कोणीतरी म्हणालं,”जलाल आपण तुझ्या ५० व्या वाढदिवसाचं मोठं सेलिब्रेशन करू.” यावर हसून जलाल आगा इतकंच म्हणाले,”उद्याचे कोणी पाहिले आहे”,आणि खरोखरच दुसरे दिवशी त्यांचे ह्र्दयविकाराने वयाच्या पन्नासाव्या वर्षी निधन झाले.

 

 

 

 

माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!