Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

virar police – गुन्हे शाखा कक्ष -३ विरार

1 Mins read

virar police – गुन्हे शाखा कक्ष -३ विरार

 

virar police – घरामध्ये प्रवेश करुन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीच्या

चार सदस्यांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष -३ विरार यांना यश

 

 

 

1/10/2021,

मुकबधिर असल्याचा बनाव करुन मदत मागण्याचे उद्देश्याने घरामध्ये प्रवेश करुन चोरी
करणारी आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष -३ विरार
यांना यश

मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिण्यांपासुन सकाळी
उघडया घरातून मोबाईल फोन, लॅपटॉप, मौल्यवान वस्तु चोरी करणारी टोळी सक्रीय झाली होती. सदर
घटनांची मा. वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीत यांचा शोध घेवुन सदर प्रकारच्या गुन्हयांना पायबंद
घालणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष-३ चे पोलीस पथकाने गुप्त
बातमीदार यांचेकडून मिळालेल्या खात्रीशीर माहीतीच्या आधारावर आरोपीत नामे- १)

virar police criminal 4

virar police criminal 4

सत्यनाथन व्यंकटेश
बोयार वय- ३३ वर्षे, रा. ८२४, मुरुगर कोविल स्ट्रीट, उदयराजापलयम, आंबुर, ता. थोट्टालम, जि. वेल्लोर,
राज्य- तामिळनाडु

virar police criminal 1

virar police criminal 1

२) मंजुनाथन गणेश गोविंदस्वामी, वय- २५ वर्षे, रा. ५८७, उदयराजापलयम, आंबुर, ता.
थोट्टालम, जि. वेल्लोर, राज्य- तामिळनाडु ३)

virar police criminal 2

virar police criminal 2

सुरेश कुप्पन बोयार वय- २६ वर्षे, रा. ४६, मरियम्मन कोविल
स्ट्रीट, आंबुर, ता. थोट्टालम, जि. वेल्लोर, राज्य- तामिळनाडु ४)

virar police criminal 3

virar police criminal 3

रोहीत रामु तमिलन वय- १८ वर्षे, रा.
उदयराजापलयम, आंबुर, ता. थोट्टालम, जि. वेल्लोर, राज्य- तामिळनाडु या ४ आरोपीतांना दिनांक
३०/०९/२०२१ रोजी अटक केली आहे. तपासा दरम्यान अटक आरोपीत यांनी सदरचे गुन्हे हे त्यांचे अन्य दोन
साथीदार यांचे मदतीने केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक आरोपीत यांचेकडून ६ लॅपटॉप व ३८
मोबाईल फोन असा एकुण ५,२३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद अटक
आरोपीत यांचेकडून खालील १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

नमुद अटक आरोपीत हे मुळचे जिल्हा- वैल्लोर, राज्य- तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. मुक
बधिर असण्याचा बनाव करुन मदत मागण्याच्या हेतुने ईमारतीमध्ये अथवा घरामध्ये प्रवेश करुन घरातील
व्यक्तीचे लक्ष चुकवून सकाळचे वेळी घरामध्ये प्रवेश करुन घरातील मोबाईल फोन, लॅपटॉप, सोन्याचे दागिने,
मौल्यवान वस्तू चोरी करतात. अटक आरोपी व त्यांचे ईतर साथीदार यांचेविरुध्द राज्यातील विवीध पोलीस
स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपीत यांना पुढील कारवाई करीता अर्नाळा पोलीस ठाणे
गुन्हा रजि. नंबर-३००/२०२१ भा.द.वि.सं. कलम ३८० या गुन्हयात अर्नाळा पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात
आले आहे.
वरील कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख,
सहा.पोलीस आयुक्त, (गुन्हे), मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि/ प्रमोद बडाख,
पोउपनिरी/ शिवाजी खाडे, पोउपनिरी/ उमेश भागवत, सफौ/ अनिल वेळे, पो.हवा/ अशोक पाटील, पो.ना/
प्रदीप टक्के, पो.ना/ मुकेश तटकरे, पो.ना./सागर बारवकर, पो.ना/ मनोज सकपाळ, पोना/ शंकर शिंदे,
पोना/ सचिन घेरे, पोशि/ राकेश पवार, सर्व नेम- गुन्हे शाखा, यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

 

अंजनी मिश्रा

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!