POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

Tata sustainability group – जमशेदजी टाटा

Tata sustainability group

Tata sustainability group – जमशेदजी टाटा

 

 

Tata sustainability group – स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 

 

जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला.त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती.

जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत.

त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना Tata sustainability group “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून ओळखले जाते.

आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता

त्या वेळी त्यांनी टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही,

कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते हे जमशेदजी टाटा यांनी दाखवून दिले.

त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते.

 

कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आले.

आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते.

त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली.

जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू यांच्याशी विवाह केला.

१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला.

१८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता.

मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा

स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.१८६८ पर्यंत टाटा

आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी Tata sustainability group एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक

दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले.

 

या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये

नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली. १८६८मध्ये त्यांनी

एक व्यापारी कंपनी सुरु केली. कॉटन मिल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लंडनमधील गिरण्या पाहून त्यांनी फक्त कापसाचा

व्यापार न करता उत्पादनक्षेत्रात शिरावे, असा विचार केला होता.

 

त्यांनी १८७४ मधे नागपूरला मिल स्थापन केली. त्यात त्यांना मोठा नफा मिळाला. व्हिक्टोरिया राणीच्या नावावरून त्यांनी आपल्या मिलचे

नाव महारानी मिल ठेवले. नागपुरची ही मिल त्यांनी मोठ्या किमतीला विकली. जमशेदजींनी ‘अलेक्झांड्रा’ आणि १८७७ मध्ये

नागपूरला ‘एम्प्रेस मिल’ सुरू केली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच मुंबईत ‘स्वदेशी मिल’, तर अहमदाबादला ‘अॅडव्हान्स मिल’

सुरू केली आणि उत्तम चालवली. पोलाद उद्योगात उतरण्याचे त्यांचे स्वप्न होते. १८८२ मध्ये त्यांनी कारखाना काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

मयूरगंज संस्थानात लोखंड व कोळशाचे साठे मिळाले, म्हणून त्यांनी तिथेच कारखाना काढण्याचं ठरवलं.

 

त्या काळी त्यांनी २ कोटी ३२ लाख रुपयांचं भांडवल ‘शेअर्स’ विकून मिळवलं. पण दुर्दैवानं ते लोखंडाची निर्मिती पाहण्यासाठी हयात राहिले नाहीत.

त्यांच्या योगदानाने आणि प्रेरणेने मोटारी, रसायने, दैनंदिन गरजेच्या वस्तू, कापड, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण

अशा अनेक क्षेत्रांत टाटा समूहाचे कारखाने उभे राहिले. भारतीय उद्योगजगताचे पितामह म्हणून ते जगभर विख्यात झाले होते.

टाटा त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि

एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले.

त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते. Tata sustainability group टाटा स्टील ही आशियातील पहिली

आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे.

 

तिच्या ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,बेंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन

आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था ठरल्या आहेत. टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी ८००० मेगावॅटपेक्षा

जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी. टाटा यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा

यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले.

त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते.

नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.

१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशा या थोर व हुशार Tata sustainability group जमशेदजी टाटा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर


Discover more from Postbox India

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Content is protected !!

Discover more from Postbox India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading