Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Sharad Pawar : तोच म्हातारा

1 Mins read
  • Sharad Pawar : तोच म्हातारा

ज्याने बिनबापाच्या पोराला पोरा सारखे सभांळले तोच Sharad Pawar म्हातारा नकोसा झालाय !

जेव्हा मुलंच वडिलांचा पाणी उतारा करतात तेव्हा बापाचं मन किती विदिर्ण होत असेल? घराणं मोठं व्हावं, मुलं मोठी व्हावीत, त्यांचं भविष्य उत्तम घडावं यासाठी बाप खपत असतो. घर मोठं झालं, मुलं मोठी झाली आणि आज त्याच मुलांना बाप नकोसा झाला आहे! नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात हेच घडत आहे. आज Sharad Pawar  शरद पवार या मुलांना नकोसं झालेत! मुलांच्या पंखात बळ आल्यानंतर त्यांनी आकाशाला गवसणी घालावी पण आपल्या राजकीय जन्मदात्याशी बेइमानी करु नये!

मी Sharad Pawar शरद पवार यांनी चुका केल्या नाहीत असं कधीही म्हणणार नाही! त्या चुकांची फळं तुम्हीच चाखलीत ना? घर चालवण्यासाठी बाप चुका करत असतो, त्याच्याही मनाची ओढाताण होत असते हे आपल्याला कधीच कळणार नाही का? माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर जेवढा महाराष्ट्र हळवा झाला तेवढाच महाराष्ट्र शरद पवार यांच्यावर आलेल्या संकटाने झाला. त्यांच्या चुका आज मोजल्या जात आहेत पण त्यांच्या चुकांमुळे मिळालेली सत्ता का नाकारली नाही? तुम्ही कोणीच नव्हता त्यावेळची संपत्ती आणि आजची संपत्ती जरा तपासून बघा! पटेल, तटकरे, भुजबळ, वळसे पाटील, मुश्रीफ यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे!

एका बाजूला Sharad Pawar शरद पवार आमचं दैवत आहे म्हणायचं आणि दुसर्या बाजूला आरोपांच्या फैरी झाडायच्या! हे कसलं राजकारण? छत्रपती शिवरायांना ज्यांनी सोडलं नाही ते शरद पवार यांना काय सोडणार? आज तर हद्दच झाली छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पदोपदी अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला कांहीच कसं वाटतं नाही? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तर प्रचंड अडचण झाली आहे.ज्या अजित पवार यांच्यावर नाराज होऊन शिवसेना सोडली तेच अजित पवार तुमच्या बरोबर आले आहेत.

मला राज ठाकरे यांची भूमिका आवडली.त्यांनी शिवसेना सोडली पण मुळ शिवसेनेवर हक्क न सांगता आपलं घर निर्माण केलं! खरंच स्वाभिमान असता तर पक्षांतर करणार्यांनी राजीनामा द्यायला हवा होता आणि निर्णय योग्य की अयोग्य जनतेला ठरवू द्यायला हवं होतं!

राजकारण होत रहाणार परंतु जेव्हा अजित पवार यांनी Sharad Pawar  शरद पवार यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला तेव्हा मात्र महाराष्ट्र आतून हलला! म्हातारपणी बापाला असा सल्ला देणारे जनतेशी प्रामाणिक रहातील का? हा प्रश्न आख्खा महाराष्ट्राला पडला आहे! हे म्हणजे एक हजार कोटी रुपयांची संपत्ती मोठ्या विश्वासाने मुलांच्या नावावर करुन रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांच्या सारखी झाली आणि आज ज्या मुलांच्या नावावर संपत्ती केली त्याच मुलांनी सिंघानिया यांना घराबाहेर काढले!आज कोट्यवधींचा मालक गौतम सिंघानिया हे दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहत आहेत! त्या मुलांमध्ये आणि अजित पवार आणि त्यांच्या बरोबर असणारे यामध्ये फरक जाणवत नाही!

महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना आज आनंदाच्या उकळ्या फुटत असतील पण त्यांनी त्यांचीच कबर खणून ठेवली आहे! शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली पण यातून काय मिळवलं? उत्तर बदनामी आणि शून्य असंच आहे. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुळ भाजपाचे फक्त सहा मंत्री आहेत बाकी सगळे आयाराम आहेत! हे आयाराम स्वतः च्या बापाशी प्रामाणिक राहू शकत नाहीत ते भाजपाशी प्रामाणिक असे राहू शकतात? मला वाटते हेही फार काळ तिथं रहाणार नाहीत कारण अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केली आहे, त्यामुळे अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत! राजकारणात डाव खेळला की पेच निर्माण होतो!

तटकरे यांच्या घरात दोन आमदार, मंत्री, एक खासदार असूनही ते अतृप्त आहेत, दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे स्विय सहाय्यक होते त्यांना आमदार केले, मंत्री केले, विधानसभा अध्यक्ष केले,ते अतृप्त आहेत,हसन मुश्रीफ यांना काय कमी केले म्हणून त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली,छगन भुजबळ यांना तर बरोबरीने वागवलं, त्यांनी सुध्दा साथ सोडली, पटेल यांना राज्यसभेवर खासदार आणि केंद्रीय मंत्रीमंडळात संधी दिली, ते काल जोरजोरात भाषण करत होते! प्रश्न हा आहे की कुणावर विश्वास ठेवायचा? शरद पवार चुकीचे केले असं या सगळ्यांचं म्हणणं आहे तर मग फडणवीस बरोबर आहेत का? याचं उत्तर द्यावंच लागेल!

म्हणून तर रामायण घडलं!आज महाराष्ट्रामध्ये नव्याने रामायण घडत आहे! संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला आणि दुष्ट प्रवृत्तीचा बिमोड करण्याची वेळ आली आहे. म्हातारा हा म्हातारा नसतो तर तो Sharad Pawar महातारा असतो आणि तो नव्या पिढीला दिशादर्शक असतो! ज्या घरात म्हातारा मजबूत असतो त्या घराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीच हिंमत होत नाही! आणि ज्या घरात म्हातार्याला सन्मानित केले जाते तेच घर सुसंस्कृत मानले जाते, या संस्कृतीला जो अपमानित करेल तो फार काळ टिकणार नाही! आजपर्यंतचा हा इतिहास आहे!

महादेव माळी

Leave a Reply

error: Content is protected !!