Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

shanta shelke poems – शांता शैळके

1 Mins read
  • shanta shelke poems

shanta shelke poems – कै. शांता शैळके जन्मशताब्दि

 

 

 

१७५ चे वर सुंदर कविता,भावगीते,बालगीते,भक्तिगीते,लोकगीते व लावण्या लिहिणाऱ्या सुंदर कविता ,गीते करणाऱ्या शांता शेळके यांची आज जयंती (१२ ऑक्टोबर १९२२ निधन ६ जून २००२) त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथिल . पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. तेथे श्री. म. माटे, के. ना. वाटवे हे प्राध्यापक म्हणून त्यांना लाभले. याच सुमाराला प्रा. रा. श्री. जोग फर्ग्युसन महाविद्यालयात शांता शेळके आले. काव्यलेखनाबाबत त्यांचे त्यांना मार्गदर्शन व उत्तेजन मिळाले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले (१९४४). त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. shanta shelke poems कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य, चित्रपटगीते, समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले; तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून त्या विशेष प्रसिद्घ आहेत.
त्यांनी एक गोष्ट मात्र नमूद केली होती कि संस्कृत मुळे माझे लेखन ,भाषण सुधारले खरंच आज लोकांनी या भाषेकडे पाठ फिरविली आहे त्यामुळे दर्जेदार साहित्य निर्मिती होत नाही.
shanta shelke poems वर्षा (१९४७) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्या नंतर रुपसी (१९५६), तोच चंद्रमा (१९७३), गोंदण (१९७५), अनोळख (१९८६), जन्मजान्हवी (१९९०), पूर्वसंध्या (१९९६), इत्यर्थ (१९९९) इ. काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रसिद्घ झाले. त्यांनी विपुल बालकथा, बालगीतेही लिहिली (थुई थुई नाच मोरा, १९६१; टिप् टिप् चांदणी, १९६६; झोपेचा गाव, १९९०). गीतांचे इतरही अनेक प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. उदा., लावण्या, कोळीगीते. मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठीही त्यांनी गीतलेखन केले आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुभग, प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्यलेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात.

shanta shelke poems शांताबाईची गीत काव्य संपदा

अजब सोहळा—-अपर्णा तप करिते काननी—–अशीच अवचित भेटून जा —– असता समीप दोघे हे — असेन मी नसेन मी —— अहो जाईजुईच्या फुला —आई बघ ना कसा हा—-आज चांदणे उन्हात हसले — आज मी आळविते केदार—-आज मी निराधार एकला — आज सुगंध आला लहरत — आधार जिवा — आला पाऊस मातीच्या वासात– आली सखी आली प्रियामीलना —आले वयात मी बाळपणाची —एक एक विरते तारा —- कर आता गाई गाई — कशि गौळण राधा — कशी कसरत दावतुया न्यारी —कळले तुला काही — कळ्यांचे दिवस फुलांच्या — का धरिला परदेश — काटा रुते कुणाला— कान्हू घेउन जाय — काय आणितोसी वेड्या–काय बाई सांगू — किलबिल किलबिल पक्षि— कुणीतरी सांगा हो सजणा — खोडी माझी काढाल तर — गगना गंध आला — गजानना श्री गणराया —गणराज रंगी नाचतो — गाव असा नि माणसं अशी — गीत होऊन आले सुख माझे– गोंडा फुटला दिसाचा —घन रानी साजणा — घर परतीच्या वाटेवरती–चित्र तुझे हे सजीव होऊन — चंद्र दोन उगवले — चांदणं टिपूर हलतो वारा — चांदण्या रात्रीतले ते— छेडियल्या तारा —जय शारदे वागीश्वरी — जा जा रानीच्या पाखरा —जा जा जा रे नको बोलु –जाईन विचारित रानफुला —जायचे इथून दूर –जिवलगा राहिले रे दूर — जीवनगाणे गातच रहावे— जे वेड मजला लागले
जो जो गाई कर अंगाई —झाला साखरपुडा ग बाई — झुलतो झुला जाई आभाळा –टप टप टप टाकित टापा — डोळ्यांत वाकुन बघतोस– तळमळतो मी इथे तुझ्याविण—तुझा गे नितनूतन सहवास —तुझा सहवास —तुझी सूरत मनात राया —तुला न कळले मला न —तू नसता मजसंगे वाट—तू येता सखि माझ्या—तोच चंद्रमा नभात — दशदिशांस पुसतो —दाटतो हृदयी उमाळा दाटून कंठ येतो– दिवस आजचा असाच गेला —दिसते मजला सुखचित्र–दु:ख हे माझे मला — दूर कुठे चंदनाचे बन —दैव किती अविचारी— नको रे नंदलाला —ना ना ना नाही नाही — ना मानो गो तो दूँगी — नाही येथे कुणी कुणाचा
निळ्या अभाळी कातरवेळी—पप्पा सांगा कुणाचे —पहा टाकले पुसुनी डोळे —- पाऊस आला वारा आला —पाखरा गीत नको गाऊ—– पायावरी प्रियाच्या सर्वस्व —पालखी हाले डुले —-पावनेर ग मायेला करू —-पुनवेचा चंद्रम आला– प्राणविसावा लहरि सजण –प्रीतफुले माझी सोनेरी —प्रीति जडली तुझ्यावरी — बहरुन ये अणुअणू —बाळ गुणी तू कर अंगाई —बाळा माझ्या नीज ना —बोल बोलना साजणा — मध्यरात्रिला पडे तिच्या — मनाच्या धुंदीत लहरीत — मराठी पाउल पडते पुढे —मला आणा एक हिर्‍याची — मागते मन एक काही —मागे उभा मंगेश — माजे रानी माजे मोगा —–माजो लवताय डावा डोळा —माज्या मुखार गर्भच्छाया
माज्या सारंगा राजा –माझी न मी राहिले –माझ्या मना रे ऐक जरा —-माझ्या मायेच्या माहेरा —माणुसकीचे पाईक आम्ही — मानत नाही श्याम —मारू बेडूक उडी गड्यांनो —मी आळविते जयजयवंती —मी डोलकर डोलकर —मी नवनवलाचे स्वप्‍न — मी ही अशी भोळी कशी ग –राघुमैना रानपाखरं —राम भजन कर लेना —- रूपसुंदर सखी साजिरी —-रूपास भाळलो मी— रेशमाच्या रेघांनी —वहिनी माझी हसली ग –वादलवारं सुटलं गो—- विकल मन आज झुरत —विकल सांजवेळी —विहीणबाई विहीणबाई उठा—शारद सुंदर चंदेरी—शालू हिरवा पाच नि — शूर अम्ही सरदार —शोधितो राधेला श्रीहरी
शोधू मी कुठे कशी — सब गुनिजन मिल गावो –साजणी सई ग — सुकुनी गेला बाग — सुख भरुन सांडते —सुखवितो मधुमास हा— सूर येती विरुन जाती — संगीतरस सुरस — संपली कहाणी माझी —संपले स्वप्‍न ते—- सांग सांग नाव सांग — सांगू कशी प्रिया मी — सांज आली दूरातून —स्पर्श सांगेल सारी — स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला — स्वप्‍ने मनातली का — हा दु:खभोग सारा —हा माझा मार्ग एकला— हाऊस ऑफ बॅम्बू —हिरव्या रंगाचा छंद —ही कनकांगी कोण ललना– ही चाल तुरुतुरु—ही वाट दूर जाते — हे बंध रेशमाचे — हे रान चेहर्‍यांचे –हे श्यामसुंदर राजसा –क्षणभर भेट आपुली — ऋतु हिरवा ऋतु बरवा — श्रावणसरी

 

 

shanta shelke poems
संकलन

माधव विद्वांस

Pros

  • +shanta shelke poems

Cons

  • -

Leave a Reply

error: Content is protected !!