Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

sambhaji raje तिथी की तारीख ..?? – ॲड. शैलजा मोळक

1 Mins read

 

 

आज आपल्या शिवपुत्र sambhaji raje संभाजी राजांचा तिथीप्रमाणे बलिदान दिन.. मृत्यूंजय अमावस्या असे या अमावस्येला म्हटलं जातं..

कोणी निश्चित केला हा शब्द माहीत नाही. sambhaji raje संभाजी राजांना कोणी मारले.? कसे मारले ? त्यामागे कोण होते ? त्यांना औरंगजेबाने काय प्रश्न विचारले ? त्यांनी काय उत्तर दिले ? त्यांना कोणी पकडून दिले ? त्यांना मारले म्हणून गुढ्या उभारण्याची प्रथा सुरू झाली का ?

असे विविध प्रश्न व पोस्ट कालपासून फिरत आहेत हे आपणां सर्वांनाच माहीत आहे. याची चर्चा मी करत नाही. आपल्या छत्रपती राजांची जयंती व स्मृतिदिन हा केवळ साजरा करायचा विषय नाहीच तर तो समजून घेण्याचा विषय आहे एवढंच मी म्हणेन.
उद्या चैत्र प्रतिपदा.. मराठी महिन्याप्रमाणे नव वर्षारंभ अर्थात गुढीपाडवा.. आणि तो युगानुयुगे गुढी उभारून साजरा करायची प्रथा आहे. गेल्या काही वर्षात काही नवविचार, परिवर्तनीय विचार पुढे येत गेले. आणि साडीची गुढी उभारू नये, आपल्या राजांची मनुस्मृतीप्रमाणे हत्या केली गेली म्हणून तो साजरा करू नये, उभारलीच गुढी तर भगवा झेंडा उभारून ती उभारावी असे अनेक विचार पुढे आले. व अलीकडच्या काही वर्षात अनेक लोक साडीची गुढी टाळून भगवा झेंडा उभारून गुढी उभारू लागले. ज्याला जसे पटेल व वाटेल तसा तो गुढीपाडवा हा सण म्हणून आपल्याकडे साजरा होत आहे.

     हिंदुत्ववादी कायमच तिथीचा आग्रह धरून अमावस्येला छत्रपती संभाजी राजांचा बलिदान दिवस पाळतात व दुसऱ्या दिवशी गुढ्या, तोरणे व मिरवणुका काढतात. वास्तविक गुढीपाडवा डोळ्यांसमोर ठेवून राजांची हत्या केली असे म्हटलं तर ठीक. पण हत्या केली म्हणून तो साजरा करायची प्रथा नाही हेही आपण लक्षात घेऊयात.
वास्तविक आपण तारखेप्रमाणे तो ११ मार्चला sambhaji raje संभाजी महाराज स्मृतिदिन म्हणून पाळतो.. मग आपण गुढीपाडव्याच्या विरोधी प्रचंड विविध मांडणी करणाऱ्या पोस्ट का करत रहातो..? साडीची गुढी नको हा प्रचार प्रसार किंवा प्रबोधन हे मान्यच पण आपण एक तर तिथीचे समर्थन करत नाही तारखेचे समर्थन करतो. मग आपण परत परत त्या अमावस्येत का अडकतो..??

     गुढीपाडव्याला गुढी ही भगव्या झेंड्याची उभारायची या आवाहनाला आता प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. आपण गुढीखाली sambhaji raje संभाजी राजांच्या फोटोचे पूजन करतो, ते आपण करावेही.. पण जे पारंपरिक पध्दतीने गुढीपाडवा करतात, त्यांचा आनंद त्यांना घेऊ द्यावा.. प्रत्येकाने आपले विचार समजून घेतले पाहिजेत हे मान्य.. आपण बोलत रहायलाच हवे हेही मान्य पण शेजाऱ्याने व आपल्या नातेवाईंकांनी आपले ऐकलेच पाहिजे नाहीतर ते आपले शत्रू असे समजतां कामा नये..!

डॅा. आ. ह. साळुंखे आपल्या ‘मित्रांना शत्रू करू नका..!’ या पुस्तकात आपण सामाजिक कार्यकर्त्यांनी कसे वागावे, वाचावे, बोलावे, समजवावे यासाठी खूप छान मार्गदर्शन करतात.

Also Visit : https://www.postboxlive.com

समाजात वैचारिक घुसळण ही सतत चालूच असते व ती राहाणेही गरजेचे असते. त्यातूनच परिवर्तन होत असते. पण कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या भूमिका ठाम व स्पष्ट घेणे गरजेचे असते. केवळ धर्माला विरोध किंवा त्यांनी असे केले असे सतत म्हणत जुन्या गोष्टींना सतत उजाळा देण्यापेक्षा आपल्याला योग्य वाटतील ते हवे ते बदल करणे आपल्याच हाती असते. आता आपण एखादी धार्मिक व पारंपरिक गोष्ट नाही केली तर शेजारी राहाणारा कोणताही ब्राह्मण ते तुम्ही का केले नाही हे विचारायला येत नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मग आपण किती काळ अजून त्यांनी असे केले/ तसे केले हे म्हणत आपली शक्ती वाया घालवणार आहोत.?

आपण आपल्याला हवे तसे सण समारंभ साजरे करूयात.. परस्परांच्या आनंदात सहभागी होऊयात.

समाजात इतर प्रश्न भरपूर आहेत त्यावर चर्चा करूयात.. व नक्की आपण तिथी की तारीख फोकस करून त्याविषयी ठाम राहूयात.. आपल्या नक्की भूमिका ठरवूयात..!!
आम्ही ११ मार्चलाच शिवपुत्र छत्रपती sambhaji raje संभाजीराजांचा स्मृतिदिन अभिवादन व इतर कार्यक्रम घेऊन साजरा करतो..!!

Also Visit : https://www.postboxindia.com

Leave a Reply

error: Content is protected !!