Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Police Commissioner शहिद पैलवान अशोक कामटे ( पोलीस कमिशनर )

1 Mins read
  • Police Commissioner शहिद पैलवान अशोक कामटे

Police Commissioner  शहिद पैलवान अशोक कामटे (पोलीस कमिशनर)

२६- ११ चे हिरो, मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर पैलवान अशोक कामटे यांचा आज स्मृतिदिन .
सर्व जगाला माहिती आहे अशोक सर एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होते ,
पण बऱ्याच जणांना माहित नाही ते एक नावाजलेले ”पैलवान” होते.
त्यांचे मुळ गाव पुण्याजवळचे चांबळी, तालुका पुरंदर. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९६५.
ज्या पुरंदर ने शिवरायांना हजार हातांचे बळ देवून स्वराज्य वाचवले ,मुरारबाजी सारखा एक वाघ दिला ,त्याच खोऱ्यात या वाघाचा जन्म झाला .

शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील गाव न गाव त्यावेळी पैलवान होते ,त्यातलेच हे गाव चांबळी. गावाला कुस्तीची परंपरा हि वारसा हक्कातच मिळाली होती.
त्यांचे वडील भारतीय सैन्यात कुस्तीगीर होते,त्यांची नेमणूकच कुस्ती या खेळातून होती.जेव्हा ते सैन्यदलातून निवृत्त झाले तेव्हा ते कर्नल होते.. कर्नल एम.आर.कामटे.
तर अश्या कुस्तीच्या समृध्द परंपरेत जन्मलेले अशोक कामटे लहान पनापासूनच तालमीत कुस्तीचे धडे गिरवत मोठे झाले,तरुण वयातच त्यांनी बर्याच नामांकित मल्लांना चित केले होते.
ज्या तांबड्या मातीत ते लहानाचे मोठे झाले ,ज्या पुरांदरकडे पाहत लहानपण संपून तारुण्य आले हे सर्व त्यांना सांगत होते..कि आपल्याला काहीतर विलक्षण मोठे करून दाखवायचे आहे.

याच एका जिद्दीने त्यांनी १९८९ सालच्या भारतीय पोलिस दल (IPS) वर्गामध्ये अधिकारी पद प्राप्त केले.
त्यानंतरचा त्यांचा प्रवास म्हणजे एका चित्रपटातील नायकाप्रमाणे आहे..
त्यांची कारकीर्द पुढील प्रमाण…

1989: भारतीय पोलिस अधिकारी
1991: भंडारा जिल्ह्याचे सहायक पोलिस अधिक्षक
1994: सातारा चे पोलिस अधीक्षक
1997–1999: ठाणे ग्रामीण चे पोलिस अधीक्षक
1999–2000: यु.एन.मिशन बोस्निया.
2000–2002: डेपुटी कमिशनर पोलिस मुंबई
2002–2004: सांगली चे जिल्हा पोलिस प्रमुख
2004–2005: कोल्हापूर चे जिल्हा पोलिस प्रमुख
2006–2008: पोलिस कमिश्नर सोलापूर
June 2008 – November 2008: अतिरिक्त कमिश्नर ऑफ पोलिस मुंबई
1995: विशेष सेवा पदक – नक्ष्लिते विभाग
1999: यु.एन.पदक
1999: वेदेष सेवा पदक यु.एन.विभाग
2004: Awarded Director General’s insignia
2005: आंतरिक सुरक्षा पदक
2006: Police medal

इ पदे आणि विजय चषके मिळवलेले हे गृहस्थ अक्षरश एक कुस्तीगीर होते याचा विसर आज महाराष्ट्राला पडला आहे.
अहो हि तांबडी माती फार विलक्षण असते..हिला अन्यायाची प्रचंड चीड येते..आणि यातूनच एक विलक्षण इतिहास घडतो…त्यातील एक सुवर्ण इतिहास म्हणजे …स्व.पैलवान.अशोक कामटे.
ज्या अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घातल्या मी सांगतो नक्कीच ते सुध्दा क्षणभर स्तब्ध झाले असतील अशी शरीर यष्टी होती त्यांची.
त्यांच्या पोलिसी कारकिर्दीत कित्येक भार्ष्ट राज्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भांडायला सुध्दा ते मागे हटले नाहीत…याची माहिती प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना असेलच…त्यातल्या त्यात सोलापुरकराना .

कित्येक माजलेल्या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या राजकर्त्यांचा विरोध डावलून त्यांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
२००८ च्या हल्ल्यात भलेही पोलिस दलाने एक कुशल अधिकारी गमावला असेल ..पण आम्हा पैलवानांनी आमच्या स्फूर्तीचा एक जिवंत झरा गमावला आहे,
माझे सर्व पैलवानांना आवाहन आहे ..अशोक सरांचे स्वप्न पूर्ण करा.

पोलिस हवालदार या पदाची भरती होण्यापेक्षा अधिकारी व्हा.आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करा. स्वता:ला कमी समजू नका..!!

Leave a Reply

error: Content is protected !!