Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRASANSKRITISANSKRITI DHARA

vijaynarayan-mandir देखणा केशव

1 Mins read
  • vijaynarayan-mandir देखणा केशव

देखणा केशव

हळेबिडची जुळी बहीण बेलूर 

 

हळेबीडपासून १६ किलोमीटर असलेले हे गाव होळसाय राजांची पहिली राजधानी . विष्णूवर्धन याचे राजवटीत हळेबीडची स्थापना झालेवर याचे महत्वही दुसरी राजधानी म्हणून १४व्या शतकापर्यंत अबाधित होते . पृथ्वीवरील विष्णूस्थळ ,तसेच दक्षिण काशी असाही तिचा उल्लेख व्हायचा
बेलूर हे चन्नकेशव (विष्णु )मंदिरासाठी प्रसिद्ध
” चन्न केशव “म्हणजे “देखणा केशव “
विजयनारायण मंदिर असेही सम्बोधले जाते . राज्यसत्ता ज्यावेळी प्रबळ व सुबत्तेत होती त्यावेळीच अशी मंदिरे झाली .त्यावेळच्या राहणीमानाची हे देवळे ओळख देतात .

vijaynarayan-mandir देखणा केशव 1

vijaynarayan-mandir देखणा केशव

बेलूरवरही दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनापती मालीकफूर याने इस १३२६ मध्ये हल्ले केले.विजयनगरचे संस्थापक राजे हरिहरने याचा जीर्णोद्धार केला.येथे सुमारे ११८ शिलालेख सापडले असून काही ताम्रपटही आहेत.त्यावरून त्यातील काही कलाकारांचीही ओळख होते.
उत्तर आणि दक्षिण भारताच्या मंदिर शैलीचा येथे संगम झाला आहे.
देवळात जाताना आपल्याकडे चांगली बॅटरी ठेवावी
रुवारी मल्लितम्मा(मल्ल्यांण्णा) या शिल्पकाराने सुमारे ४० मूर्तीची निर्मिती केली आहे. 
दासोजी व त्याचा मुलगा चवण्णा यांचाही मोठा यात सहभाग होता चवण्णा यांचेकडे मदनिकांचे शिल्प करण्याचे श्रेया जाते.
मल्लितम्मा व दासोजी यांनी मुख्यत्वे प्राणी आणि पक्षी यांची शिल्पे केली.
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मोहिनी शिल्प तसेच गजसुरवध ,जय विजय ,शिलबालिका,अनेक मुद्रांमधील नर्तिका यांची शिल्पेही वेधक आहेत.
गोपुरे ,गाभारा ,सभागृह ,त्यातील छत व खांब अतिशय देखणे आहेत
मी कुटुंबीयांचे समवेत जानेवारी २०१९ मधे गेलो होतो. जायच्या आदले दिवशी प्रवीण धर्माधिकारी यांचे कडुन माहिती मिळाली कि हळेबीड जवळ ८ km अंतरावर बेलवाडी (चिकमंगळूर जिल्ह्यात )येथेही नारायण मंदिर आहे. (केवळ अप्रतिम)अत्यंत शांत असे ठिकाण आहे.
बेलूर– हसन पासून ३५ km व बंगलोर पासून २००km अंतरावर हे ठिकाण आहे . चिकमंगळूर २२km
माझा प्रवास सातारा हुबळी शिमोगा चिकमंगळूर म्हैसूर परत येताना शिमोगा हनगल हुबळी सातारा असा ८ दिवसांचा झाला.
अधिक ३ दिवस वेळ असल्यानस चिकमंगळूर ,शिमोगा ,अगुंबे ,तळकावेरी ,श्रवणबेळगोळ ,गिरसप्पा होऊ शकतो. 

 

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!