Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

poet – d.v.keskar कवी द. वि. केसकर

1 Mins read
  • poet - d.v.keskar कवी द. वि. केसकर

घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे !!

 

 

हे गोड गीत लिहिणारे म्हणून ज्यांची ओळख आहे.असे poet – d.v.keskar कवी द. वि. केसकर यांचा आज जन्मदिन.

त्यांचा जन्म माणदेशातील म्हसवड येथे २५ डिसेंबर १९२८ रोजी झाला .विलक्षण योगायोग म्हणजे त्यांचे निधन पुणे येथे २६ डिसेंबर झाले. त्यांचे वडील सरकारी दवाखान्यात नोकरीस होते. त्यांच्या वडीलांचे ते चार वर्षांचे असतानाच निधन झाले.त्यानंतर त्यांचे काका त्यांना शिक्षणासाठी पुणे येथे घेऊन गेले. त्याचे प्राथमिक शिक्षण ,माध्यमिक शिक्षण ,व माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले.त्यांचे शिक्षण बी.ए :बी.एड पर्यंत झाले.
सुरवातीस ते वालचंदनगर येथे काही काळ शिक्षक म्हणून हजर झाले.त्यानंतर वर्ष १९५७ पासून निवृत्त होई पर्यंत वाईच्या द्रविड हयाकूल मध्ये कार्यरत होते.

अत्यंत हळव्या मनाचे पण मिस्कील असे poet – d.v.keskar  केसकरसर वाईच्या द्रविड हायस्कुल मधील विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते. त्यांच्या सारखे शिक्षक आम्हाला मिळाले हे आमचे भाग्य.कवितेचे रसग्रहण करणे हे तर त्यांचे होमपीछ होते.गावात घर नव्हते अन रानात शेत नव्हते अश्या विपन्नावस्थेत त्यांचे नोकरी लागे पर्यंत आयुष्य गेले. हिंगणे शिक्षण संस्थेच्या अनाथाश्रमात रहणाऱ्या ११वी पर्यंत शिकलेल्या विजय भास्कर जोशी यांचे बरोबर त्यांचा विवाह झाला विवाहानंतर पत्नीला पदवीपर्यंत शिकविले.

माणदेशी जन्माला आलेले poet – d.v.keskar द.वि. केसकर त्यांनी लिहिलेल्या काही कविता नामवंतांनी चोरल्या व स्वतःचे नावावर खपवल्या, त्यावर ते तक्रार न करता म्हणाले म्हणाले ‘असुदे कोणाच्या नावावर असेना ती लोकांचे पर्यंत पोचली याचा मला आनंद आहे ’.ते शिक्षक म्हणूनच जगले.

त्यांना प्रसिद्धीचा मोठेपणाचा कधीही हव्यास नव्हता.ते एकटे असल्यावर कवितेत दंग व्हायचे. त्यांचा “चंद्रफुलांची गाणी “हा काव्य संग्रह प्रकाशित झाला होता त्यातील ५ गाण्यांना संगीतकार यशवंत देव यांनी संगीत दिले होते.बागेतली निशिगंधाची फुले पाहून ते घरी आले व ’प्रतिमा उरी धरोनी’ हे सुंदर गीत त्यांना सुचले हे गीतही लोकांचे ओठावर आहे. ते वालचंदनगरला असताना त्यांच्या शेजाऱ्याचा घरात गोकुळ फुलले व त्या घरातील लहानग्यांच्या चेहऱ्यावरील निष्पाप हास्य पाहून त्यांना” घरात हसरे तारे असता हे गीत सुचले”.हे गीत लतादीदीदीनी गायले व वसंत प्रभू यांनी सांगितबद्ध केले होते.या त्यांच्या गीतामधील ओळींनी निष्पाप निरागसतेचे सुंदर दर्शन घडविले आहे तसेच गोकुळात असलेल्या त्यांच्या आनंदी कुटुंबाचे वर्णनहीं सर्वानाच भावते. ते अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांना आचार्य अत्रे यांचाही सहवास लाभला होता.
ते स्वतः अनेक वाद्ये वाजवायचे तसेच त्यांचा आवाजही चांगला होता.त्यांची गोंदवलेकर महाराजांचेवर अपार श्रद्धा.होती. त्यांचे जन्मगाव म्हसवड त्यामुळे गोंदवल्याला जाणे येणे होतेच व पुण्यातिथीला बरेचदा गोंदवल्यात असायचे.वयोमानानुसार जाणे कमी झाले होते परंतु मनाने गोंदवल्यात असत.ज्या दिवशी पुणे येथे त्यांचे निधन झाले, त्यादिवशी गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी होती, रात्री झोपताना पत्नीला त्यांनी आवर्जून सांगितले होते “ समाधीवर फुले उधळयाच्या वेळेला मला उठव “ पण ते उठलेच नाहीत ते आपल्या दैवताला भेटण्यासाठी अनंतात विलीन झाले होते.

शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केसकरांची कन्या रेणू हिला बक्षीस होते,पदवीदान समारंभात लता दीदीना सन्मानीय डि.लीट .देण्यात आली होती, रेणूने यावेळी बक्षीस घेता घेता त्यांची गाठ घेतली व ओळख सांगितली,त्यावेळी त्यांनी आनंद व्यक्त केला व मुंबई येथे गेल्यावर लताबाईंनी स्वतःचे हस्ताक्षरात पत्र पाठविले, व पत्रात घरात हसरे तारे असता या गीताचा उल्लेख केला यावरून त्यांचे मोठेपण लक्षात येते.
त्यांना तीन कन्या असून थोरली सौ रेणू दांडेकर व तिचे पती राजा दापोली जवळील चिखलगाव येथे “लोकसाधना”नावाची लहान मुलासाठी एक संस्था चालविते, चिखलगाव हे लोकमान्य टिळकांचे मूळ गाव येथे मोठे शैक्षणिक संकुल उभे केले आहे.त्यांच्या आणखी दोन कन्या सौ. संगीता दीक्षित,व सौ.मंजिरी जोशी बँकेमध्ये अधिकारी आहेत. त्यांच्या पत्नीचे माहेर वेळास (नाना फडणीसांचे गाव — कासवांचे गाव) येथे आहे. त्याही शिक्षिका होत्या त्यांचे नुकरतेच निधन झाले.

संकलन

माधव विद्वांस 

Leave a Reply

error: Content is protected !!