POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

कल्पना चावला

कल्पना चावला

कल्पना चावला

अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला

 

 

कल्पना चावला जन्म भारतात १७ मार्च १९६२ मध्ये हरियानातील कर्नल येथे झाला.
त्यांनी चंदिगढ येथे विमानविषयक अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली नंतर त्यांनी टेक्सास विश्वविद्यालय आर्लिंगटन येथे वैमानिक अभियान्त्रिकी मधे विज्ञान नैपुण्य मिळविलेले 1988 में कोलोराडो विश्वविद्यालयात विद्या वाचस्पति हि पदवी मिळविली.

त्यांनी अंतराळात दोन मोहिमांमध्ये भाग घेतला. या मोहिमांत त्या ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात राहिल्या होत्या. कल्पना चावला यांचा जन्म हरयाणा राज्यातील कर्नाळ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री. बनारसीलाल चावला तर आईचे नाव संज्योती होय. त्या चार भावाबहिणीत सर्वात लहान होत्या. कल्पना यांचा विवाह फ्रान्सचे वैमानिक प्रशिक्षक ज्याँ पीर हॅरीसन यांच्याशी झाला होता. त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते.

कल्पना चावला यांनी आपले पहिले अंतराळ उड्डाण STS-८७ कोलंबिया या अवकाशयानमधून १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर १९९७ एवढ्या कालावधीकरिता केले. या मोहिमेत अंतराळामध्ये भारहीनता कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांना प्रभावित करते या विषयीच्या तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे निरीक्षण यावर भर दिलेला होता. सदस्यांपैकी दोन जणांनी एव्हाची (अवकाशात चालण्याची) कृती केली होती, त्यात चावलांचा समावेश होता. ही मोहीम अवकाशात ३७६ तास आणि ३४ मिनिटे राहिली तर अवकाशयानाने पृथ्वीभोवती २५२ वेळा परिभ्रमण केले.

कल्पना चावला यांचे दुसरे व अंतिम उड्डाण १६ जानेवारी ते १फेब्रुवारी २००३, या १६ दिवसांच्या कालावधीचे होते. ही मोहीम विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती. विविध पाळ्यांत काम करून मोहिमेतील सदस्य दिवसातील २४ तास काम करीत होते व त्यांनी त्यात जवळजवळ ८० यशस्वी परीक्षणे केली. मात्र या मोहिमेचा अंत दु:खद झाला. १ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अवकाश यान परतीच्या मार्गावर असतांना जमिनीवर उतरण्याच्या १६ मिनिटेआधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात कल्पनासहित सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना चावला दोन्ही मोहिमांत एकूण ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात होत्या.

कल्पना चावला यांना मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ हॉनर, द नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंगविशड सर्व्हिस मेडल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हरयाणा शासनाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे. पंजाब एंजिनिअरिंग कॉलेज, चंडिगढ ओल्ड बॉइज् ॲसोसिएशनने कल्पना चावला एक्सलन्स ॲवॉर्ड देण्यास सुरुवात केली आहे.

माधव विध्वंस


Discover more from Postbox India

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Content is protected !!

Discover more from Postbox India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading