शिक्षण क्षेत्रातील बाजारी राज कारण

शिक्षण क्षेत्रातील बाजारी राज कारण

 

शिक्षण क्षेत्रातील बाजारी राज कारण

 

 

 

 

‘भारत गिते’ याची राज ठाकरे यांच्या घरासमोर आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी कानावर आली, रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधील कला शिक्षक आणी

आमचा शाळेतील सहकारी, बालमित्र… त्यानंतर अनेक दिवसांची शिक्षण क्षेत्राबद्दल लिहायची इछा होती, पुन्हा सर्व गोष्टी डोळ्या समोर हळू हळू सरकू लागल्या,

शिक्षण क्षेत्रातील बाजार एका लेखात मांडता येणार नाही पण या विषयाला न्याय मिळवून तो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न जरुर करतोय.

मध्यमवर्गीय कामगार, मुस्लिम बहुल वस्तीतील वस्तीतली ‘संत द्न्यानेश्वर विद्यालय’ ही शाळा, आणी त्या शाळेची प्रत्येक वर्षी दहावीचा निकाल १००% लागावा

ही प्रतिष्ठा म्हणा किंवा परंपरा, ती प्रत्येक वर्षी राखली जावी यासाठी संस्था आणी शिक्षक वर्ग यांची मुर्दाड दंडेलशाही,

इयत्ता दहावीला विध्यार्थी पोहोचे पर्यंत त्याची कल्पनाशक्ती, सामाजिक जाणिवा, इतर क्षेत्रातील त्याच्या आवडी निवडी, क्रिडा,

शास्त्रीय समाजशास्त्रीय आवड, नागरीक शास्त्र आणी इतिहास भुगोल यातुन त्याचा बदलणारा दृष्टीकोण याचा कसलाही सारासार विचार न करता,

हे सर्व विषय डावलून फक्त सर्व च्या सर्व विध्यार्थी दहावीच्या बोर्ड परीक्षेत कसेही उत्तीर्ण होतील यावर भर देताना त्या मुलाना मारुन धोपटून

त्याला शिक्षण क्षेत्राची अनास्था वाटेल अशी कृत्ये घडवली जात होती.

कदाचित त्यांचा हेतू विद्यार्थी घडविण्यापेक्षा परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याकडे जास्त असावा आणी तो त्यावेळी त्याकाळी विद्यार्थी वर्तनानुसार योग्य ही असू शकतो

 पण आता काहीसे चित्र बदलले असेल म्हणुन त्या त्या शिक्षकांशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला,

ज्या शिक्षकानी असे प्रकार केले त्यातील अनेकानी आपल्या पाल्याबरोबर परदेशवारी केल्यानंतर खंत व्यक्त केली,

गणिताचे शिक्षक ज्यानी अनेक पिढ्याना गणिते, भूमिती, प्रमेये शिकविली ते त्यांच्या मुलाबद्दल बोलत होते,

अमेरिकेत आयटी क्षेत्रात आहे माझा मुलगा पण वेळ नाही मिळत. आम्हाला नासात फिरायला घेवून गेला होता. वेळ नाही, सतत टेंशन, डोक्यावरचे केस पिकून पांढरा कापूस झाला आहे.

मी विचारले सर शाळा कशी आहे ? काय विचारू नकोस आता सेमी इंग्लिश झालीये शाळा,

“आपटे” बाई गेल्या नंतर श्री. अब्दुल रझाक खत्री आणी संस्थेच्या चेअरमन डॉ. अमिता सुर्वे यांच्या सारख्या शिक्षण क्षेत्रासाठी आणी

गरीब विद्यार्थी यांच्या विषयी आस्था, समाज भान जपणारी व्यक्ती शाळेची धुरा आता योग्य रितीने सांभाळताना बघुन आताच्या शिक्षकांबरोबर विद्यार्थी,

पालकवर्ग देखील समाधानी झाला आहे, तरीही मराठी शाळा म्हण्टले की आताच्या पालकाना अनास्था वाटू लागली आहे किंवा

जागतीक स्पर्धेत आपला पाल्य मागे राहील ही भिती वाटू लागली आहे,मराठी शाळा बंद होण्याची अशी अनेक कारणे असू शकतात,

बेस्ट वसाहती मध्ये फिरून मुलाना शाळेत यायला सांगावे लागते, प्रसंगी हात जोडावे लागतात,

आमच्या नोकऱ्या सुद्धा संस्था आणी त्यांच्या वेतन भत्त्यावर वेतन आयोग मानधनाप्रमाणे टिकल्यात.

सर्व पालक आता इंग्रजी माध्यमात शाळेत मुलाना प्रवेश मिळवत आहेत, शाळेचे अती धार्मिक संस्कार मुलांचा भाबडेपणा बळाविण्याचे कारण देखील आहे

आता या गोष्टी पहिल्या पेक्षा कमी झाल्यात. मराठी शाळा वाचविणे या पेक्षा शिक्षकाना निवृत्ती पर्यंत नोकरी कशी वाचविता येते का याची चिंता जास्त होती.

शाळेतून एखादा नावाजलेला क्रिडापट्टू , समाजकारणी, लेखक , शास्त्रज्ञ, अर्थ ,भूगर्भ, अवकाश शास्त्रज्ञ देशासाठी मोठ्या प्रमाणात नाही घडू शकले,

रोजगारी किंवा नोकरवर्ग तयार करण्याचा कारखाना घडला शेवटी याची जाणिव सराना झाली हे मह्त्वाचे होते माझ्यासाठी. खुप खुप बोलायचे आहे

तुझ्याशी वेळ मिळाला की बोलू असे म्हणून सरानी व्हॉट्स अप चॅट आवरते घेतले.

राज्यशास्त्र आणी समाजशास्त्र फार मनावर घ्यायचे नसते रे, ते फक्त शिकवायचे विषय असतात, आंतरराष्ट्रीय घोटाळेबाज महाविद्यालयीन प्राध्यापकाचे शब्द आठवले.

रहेजा महाविद्यालयाने आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत या शिक्षकाने ‘कृष्णकुंज’बाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तो आमचा बालमित्र भारत गिते हा संबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. परंतु कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे.

कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यामुळे राजसाहेब यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल,

या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याचं शिक्षकाने एका पत्रात लिहिलं होतं. त्यानुसार हा शिक्षक

आज दुपारी बाराच्या सुमारास कृष्णकुंजबाहेर पोहोचला आणि काहीतरी पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राजसाहेब ठाकरेंच्या निवासस्थानी पोलीस तसंच त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते. त्यांनी शिक्षकाला रोखण्याचा प्रयत्न केला.

तरी कोणतातरी द्रव पदार्थ त्याने प्राशन केला असल्याचे निष्पन्न झाले, यानंतर त्याला उपचारांसाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आता हळू हळू त्याची दखल घेतली जाईल पण मागता येईना भिक मग मास्तरकी शिक. हे असेच चालणार का ?

आणखी अशी अनेक प्रकरणे आहेत, शिक्षण क्षेत्राचा बोऱ्या वाजला आहे. शिक्षक आणी संस्था यांच्यातील राजकरणाने निचतम पातळी गाठली आहे.

मुलांचे भविष्य टांगणीला लागले असताना फक्त ॲडमिशन किती झालीत आणी मतदान आणी निवडणुकांमध्ये बैल हवे असतात या बैलांचा नंदी बैल झालाय.

मध्य मुंबईच्या प्रतिष्ठित शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या महाविद्यालयातील एका भाषा विभागातील प्रकार जेव्हा समजला

त्यावेळी शिक्षण क्षेत्रातील राजकारणाची निचतेची सिमा गाठली गेल्याचे दिसले, प्रकार निंदनीयच होता.

एका माजी शिष्याने त्याच विभागाच्या प्राध्यापिकेची असलेली जागा मिळविण्यासाठी त्यांच्यावर विभागप्रमुखाशी

संगनमत करीत आरोप करत त्याना पदच्युत केले होते, मनुवादी विचारांनी प्रेरीत असलेला हा प्राध्यापक पुढे ही जागा टिकवू शकला नाही

आणी शिक्षण क्षेत्रातील गुरु शिष्य नात्याचा देखील इथे विचार झाला नाही.

केवळ अर्थाजन आणी शाश्वत नोकरी उपजीविका भागविण्यासाठी शिक्षण क्षेत्र मर्यादीत राहीले की काय ?

 बाजारी पणा सर्वच क्षेत्रात बोळावला आहे पण शिक्षण क्षेत्रातील या बातम्या शिक्षण क्षेत्राला आलेला रंडवेपणा स्पष्ट दाखवतो.

आपला पाल्य मोठा झाल्यावर शिक्षक व्हावा असे आज किती जनाना प्रामाणिक पणे वाटत आहे यावरून तुम्ही स्वता:ला आरसा दाखवा.

 वैभव जगताप


Discover more from Postbox India

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Content is protected !!

Discover more from Postbox India

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading