Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

baal diwas – बालदिनानिमित्त

1 Mins read
  • baal diwas - बालदिनानिमित्त

baal diwas –  ‘बालदिनानिमित्त

 

‘बालकल्याण संकल्पनेचे प्रणेते छत्रपती राजश्री शाहूमहाराज यांना मानाचा मुजरा 

 

 

‘आमची सर्व प्रजा सुखी असावी. तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थांनची हरएक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी, अशी आमची उत्कट इच्छा आहे’. अ शा व्यापक भावनेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिवछत्रपतींच्या रयतेच्या कल्याणकारी राज्याचा वारसा जपत तो विकसित केला .इतर सर्व घटकांप्रमाणेच बालकल्याणासाठी विशेष प्रयत्न केले.
मुले राष्ट्र घडविणारी भावी पिढी असते. त्यामुळेच कल्याणकारी राज्यात शासनाकडून शिक्षण ,आरोग्य पायाभूत सुविधा, महिला व मागासवर्गीयांच्या विकासाबरोबरच बालकल्याणाला महत्त्व दिले जाते.
या विचारांचे कृतिशील कार्य तब्बल शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात करून दाखवले होते .अनाथालय ,पाळणाघर गाव तेथे शाळा, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सर्व जाती धर्मियांसाठीची विद्यार्थी वसतिगृहे, बालविवाह प्रतिबंधक धोरण ,विविध खेळांना प्रोत्साहन व पाठबळ अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या होत्या.

baal diwas –  बालकल्याणा संदर्भातील विविध अध्यादेश १७ जानेवारी १९१० रोजी राजर्षींनी अनाथ व बेवारस मुलांच्या संगोपनाची व्यवस्था अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये करण्यासाठीचा जाहीरनामा काढला होता .रजपुतवाडी कॅम्प येथील ‘ कर्नल वुडहौसी अनाथ विद्यार्थी बोर्डिंग हाऊस ‘मधील विद्यार्थ्यांच्या जेवण , कपडे ,पुस्तके वगैरेकरिता दरमहा ६०० रुपये याप्रमाणे दर सालचे ७ हजार २०० रूपये बजेट वाढविण्याचे आदेश देण्यात आले होते. तर श्री. स.सौ. राणीसाहेब महाराज यांच्याकडील अनाथ मुलांच्या खर्चासाठी दरमहा ३०० याप्रमाणे दर सालचे ३ हजार ६०० रूपये बजेट वाढवून देण्याचे आदेश राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिनांक ११ जानेवारी १९२० रोजी दिले होते. तसे या अनाथ मुलांचा पुनर्वसनासाठी त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी धार्मिक शिक्षण देऊन पौराहित्य करण्यासाठी ३ मे १९२१ रोजी परवानगी दिली होती.

दुष्काळातील पाळणाघर संकल्पना

राजर्षी शाहूंच्या काळात इसवीसन १८९६ – ९७ व १८९९-१९०० या दोन मोठ्या दुष्काळासह १९०१ – ०२, १९०५- ०६ व १९१८ ‘ १९ या तीन असे एकून ५ दुष्काळ पडले होते.
अशा संकटकाळात राजर्षी शाहूंनी मुक्या जनावरांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाची आवर्जून काळजी घेतली होती .विशेषतः लहान मुलांच्या संगोपन व संरक्षणासाठी पाळणाघरे निर्माण केली होती. दुष्काळामुळे घरातील मोठे रोजगार व पाण्यासाठी घराबाहेर पडायचे.

यामुळे लहान मुले घरात उपाशी रडत बसायची. अशा मुलांसाठी दरबारच्या खर्चाने ठीकठीकाणी पाळणा घरे निर्माण केली. तेथे मुलांचा सांभाळ करण्यासाठी पगारी आया, दूध -पाणी व सकस आहाराची व्यवस्थाही केली होती. या पाळणाघरांमध्ये ४१४६ मुले होती. या योजनेवर ३१ हजार ३५३ रुपये खर्च झाल्याच्या नोंदी आहेत.

राजर्षींच्या baal diwas – ‘बालकल्याण’ कार्याचा वारसा

राजर्षी शाहू महाराजांच्या बालकल्याण संदर्भातील आदर्श व अत्यावश्यक कार्याचा वारसा अनेकांनी पुढे अखंड सुरू ठेवला. छत्रपती राजाराम महाराज यांनी
गोरगरीब अनाथ मुलांना आश्रय देण्यासाठी ‘शिशू वात्सल्य ‘योजना राबवली .सुनबाई इंदुमतीदेवी यांनी मुलींसाठी ‘ललिता विहार ‘ महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र संस्था,
महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय’ सुरू केले. सासने मास्तर यांनी न्यू शाहूपुरी येथे ‘भवानी आश्रम ‘ सुरु केले.

सत्यशोधक रामचंद्र बाबाजी जाधव ऊर्फ दासराम यांनी मुलांची मने घडविणारे ‘ सचित्र बालमासिक ‘
सुरू केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था आणि वस्तिगृह स्थापन केले .बालकल्याण संस्थेच्या छायेत आज शेकडो विद्यार्थी वाढत आहेत.
आज १४ नोव्हेंबर baal diwas –  बालदिन संकल्पनेचे प्रणेते म्हणून प्रथम राजर्षी शाहूमहाराज यांना प्रथम वंदन केले पाहिजे.

लेखन
प्राचार्य जे.के.पवार
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!