Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

birsa munda – भगवान बिरसा मुंडा

1 Mins read
  • birsa munda

birsa munda – शूर – वीर भगवान बिरसा मुंडा

birsa munda – जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 

 

 

 

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील खुटी जिल्ह्यातील उलीहाटू गावात सुगना मुंडा आणि कर्मी हातू यांच्या पोटी गरीब कुटुंबात झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जनजातीच्या हजारो लोकांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्यापैकी एक बिरसा मुंडा .१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धामुळे लोकांमध्ये इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ उसळला होता.
बिरसा लहानपणापासून तीक्ष्ण बुद्धीचे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण आयुभातू येथे झाले. याच काळात बाहेरील लोकांनी येऊन जनजातीच्या लोकांच्या जमिनी बळकावल्या. त्याचा फायदा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी घेतला. ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर तुमच्या जमिनी तुम्हाला परत मिळवून देऊ असे अमिष दाखवले जात होते. या अमिषाने मुंडा जनजातीतील अनेक लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यातच बिरसांचे कुटुंब होते.

birsa munda बिरसांचा बाप्तिस्मा केला गेला. याचा त्यांच्या मनावर मोठा आघात झाला.
ते ज्या छात्रावासात रहात होते, तेथील मुलांना गोमांस खायला देत. त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.
त्याच वेळी ते आनंद पांडे यांच्या संपर्कात आले. आनंद पांडे यांनी रामायण, महाभारत व पौराणिक कथावर केलेल्या प्रवचनांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला .

आनंद पांडे यांना औषधी वनस्पतींची खूप माहिती होती. त्यांनी ती माहिती बिरसांना दिली. त्याचा उपयोग ते आजारी माणसांवर उपचार करण्यासाठी करू लागले .त्यामुळे लोक त्यांना भगवान म्हणू लागले. आनंद पांडे आणि इतर वैष्णव साधूंशी संपर्क आल्याने मुंडा यांनी वैष्णव संप्रदायाचा स्वीकार केला. त्यांनी गावांमध्ये धर्म, संस्कृतीचा प्रचार करण्यास प्रारंभ केला. त्यांनी तरुणांची संघटना उभी केली.

birsa munda – बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध केलेला उठाव उलगुलान (क्रांती ) उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. इंग्रजांनी २५ ऑगस्ट १८९५ ला कपटाने त्यांना अटक केली .त्यांचा छळ करण्यात आला. मुंडा यांची ३० नोव्हेंबर १८९७ रोजी तुरुंगातून सुटका झाली. त्यांनी ‘ बिरसाईत ‘ नावाचा पंथ स्थापन केला. या पंथाच्या लोकांनी जमिनदारांकडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध जनजागृती केली. त्यामुळे इंग्रज सरकार पेटून उठले. बिरसा यांनी ९ जानेवारी १९०० रोजी डोंमबारी पहाडावर खूप मोठी सभा घेतली. त्यावेळी इंग्रजांनी लोकांवर तीन ते चार तास गोळीबार केला. त्यात हजारो महिला ,पुरुष, मुले मारले गेले. बिरसांची सेना धनुष्य ,भाले, घेऊन इंग्रजांशी लढत होती.

मात्र इंग्रजांच्या बंदुकापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. बिरसा तेथून निसटले आणि जंगलात भूमिगत राहून काम करू लागले. सरकारने त्यांना पकडण्यासाठी पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले. काही लोकांनी फितुरी केली आणि ३ फेब्रुवारी १९०० रोजी इंग्रजांनी birsa munda बिरसा यांना अटक केली . birsa munda बिरसा यांनी ९ नऊ जून १९०० रोजी तुरुंगातच अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचे वय अवघे २५ वर्षे होते .त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचे म्हटले जाते. birsa munda बिरसा मुंडा यांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले. जयंतीनिमित्त birsa munda बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन.
केंद्र सरकारने बिरसा मुंडा यांच्या सन्मानार्थ झारखंडमध्ये रांची विमानतळाला त्यांचे नाव दिलेले आहे.

अशा या शूर वीर भगवान birsa munda बिरसा मुंडा यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन

लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Reply

error: Content is protected !!