Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

chatrapati sambhaji maharaj छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव

1 Mins read

             छत्रपती शिवरायांच्या राणीवशात कन्यारत्नाची काही कमी नव्हती. साऱ्या कन्यांचे स्वागतही थाटामाटात झाले होते.स्वराज्याच्या गादीला आत्ता वारस हवा होता .

सईबाई राणीसाहेब पुरंदरेश्वराकडे उजवा कौल मागत होत्या. छत्रपती शिवरायानंतर भोसल्यांच्या गादीला रक्ताचा वारस हवा होता. सईबाई राणीसाहेब आपल्या माहेरच्या कुलदैवतेला निमजाई देवीला कळवळून प्रार्थना करत व म्हणत ,की स्वधर्माची गुडी सतत आकाशात फडफडत ठेवणारा असा सद्गुणी पुत्र आम्हास दे. गेल्या पंधरा-सोळा वर्षात सईबाई राणीसाहेबांनी आई भवानीकडे खूप काही मागितले, असंख्य नवस बोलले पण त्यांच्या नवस बोलण्यात कोणताही स्वार्थ नव्हता .

जे मागत होत्या ते हिंदवी स्वराज्यासाठीच! स्वराज्याला आता एका chatrapati sambhaji maharaj छाव्याची गरज होती. हिंदवी स्वराज्याचे मनोहर स्वप्न साकार करण्याकरता एक पुत्र हवा होता. भोसल्यांच्या कुळाला वारस पाहिजे होता.

            सखुबाई ,रानुआक्का ,अंबिकाबाई या तीन मुलींच्या पाठीवर राजांना स्वराज्याच्या पाईकाची आस लागली होती. आपल्या पश्चात भोळ्या भाबड्या पण निधड्या छातीच्या मर्द मावळ्यांना योग्य मार्गदर्शन लाभले नाही तर नव्याने उभ्या राहणाऱ्या स्वराज्याचे काय होईल. याची चिंता राजांना लागून राहिली होती .हे शल्य राजांना दिवस रात्र सतावत होते.

म्हणून राजांना आपल्या सुराज्यासाठी निधड्या छातीचा शूर व बलशाली असा सेनानी हवा होता. त्यामुळे सईबाई राणीसाहेबांना स्वराज्यासाठी एका पुत्राची आस लागून राहिली होती.

          राणीसाहेब आजवर तीन वेळा आऊसाहेब झाल्या होत्या .परंतु यावेळी सईबाई राणीसाहेबांचे डोहाळे काही वेगळेच होते. राणीसाहेबांना कडक डोहाळे लागले होते .त्यांनी अन्नपाणी वर्ज्य केले होते.

पाण्याचा घोटही पचेना झाला होता.मेवामिठाई- फळ -फळावळ पंचपक्वान्न काहीच नको झाले होते .हत्तीवर बसावे, डोंगर चढावे ,हाती तलवार घेऊन युद्ध करावे, सोन्याच्या तख्तावर बसावे आणि मस्तकावर शुभ्र छत्र धरवून मोठमोठे दानधर्म करण्याची, उंच उंच ध्वज उभारण्याची ,आणि नौबती चौघड्यांचा दणदणाट ऐकावा हीच इच्छा राणी साहेबांना होऊ लागली होती.

धनुष्यबाण,भाला , तलवार इत्यादी शस्त्रे घेऊन आणि अंगावर चिलखत घेऊन लढाया करण्याची इच्छा सईबाई साहेबांना होऊ लागली होती.मोठ मोठे विजय मिळवण्याचे डोहाळे राणीसाहेबांना लागले होते.
        पार्वती ,सुभद्रेप्रमाणे, भवानी आईप्रमाणे हातात शस्त्र घेऊन वाघावर बसू वाटत होते .

सईबाईं राणीसाहेबांच्या मनामध्ये कुरुक्षेत्र घुमत होते व व्युह भेदण्याची कला त्या कारभार्यांकडून शिकून घेऊ लागल्या होत्या .स्वराज्याला वारस हवाच आणि तो आपण दिलाच पाहिजे या एकाच विचाराने राणीसाहेब बेचैन होत होत्या.

महाभारतातील कथा कृष्ण चक्रव्यूह भेदाचे रहस्य सुभद्रेला सांगत आहे . त्याच्या मनातील अर्थ काय हे शोधण्यासाठी राणीसाहेब प्रयत्न करत होत्या. त्यांच्या उदरात कलेकलेने भोसल्यांचा अंश वाढत होता. उद्याच्या स्वराज्याला उचित आणि निधड्या छातीचा सेनानी प्राप्त व्हावा हाच सईबाई राणीसाहेबांचा उद्देश होता.

सईबाईसाहेब राणीसाहेब मनोमन आई भवानीला विनवीत होत्या.” माते स्वराज्याला आणि स्वारीना खरच निराश करू नको. आमच्या दौलतीला हवा तसा सेनानी आम्हाला दे” पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. हीच विनवणी मनोमन राणीसाहेब करत होत्या.

          छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी राजांना पराक्रमाचा वारसदार मिळायला हवा, हीच आस सईबाई साहेबांना लागून राहिली होती. माँसाहेबही एका चपळ छाव्याचा शोधात होत्या. वारंवार सईबाई राणीसाहेबांना सांगत होत्या, आमची इच्छा यावेळी पुरी करा.

सर्वांनाच भोसले कुळाच्या वारसाची आस लागून राहिली होती. शहाजीराजांना तर कधी आपल्या लाडक्या सुनेचे कौतुक करायलाही वेळ मिळाला नाही ,तर मग सुनेकडून सेवा करून घेणे दूरच राहिले.

परंतु आजोबांनाही वाटत होते भोसले कुळाला chatrapati sambhaji maharaj एका सूर्याची आवश्यकता आहे. असा सूर्य हवा आहे की जो भोसले कुळाचे नाव वाढवेल .सार्यांची इच्छा पूर्ण करण्याची राणी साहेबांना ओढ लागली होती तो दिवस लवकरच येणार होता.

              पुरंदर किल्ल्याभोवती आकाशातील ग्रह ,तारे ,शुभ नक्षत्रे हेही येऊन थांबले होते. अवघा पुरंदर आता श्वास रोखून बघत होता .एक एक क्षण युगासारखा वाटत होता. गुरुवारचा दिवस! आदल्या रात्रीपासूनच राणी साहेब वेदनेने माशाप्रमाणे तडफडत होत्या. त्यांची तब्येत अगदी तोळामासा झाली होती. परंतु एकच ध्यास मनामध्ये घेतला होता तो म्हणजे chatrapati sambhaji maharaj स्वराज्याचा छावा.आणि तो आता जन्म घेणार होता.

            लेखन
          डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
               संदर्भ
  शिवपत्नी महाराणी सईबाई
       संस्कृती प्रकाशन

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: