Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Indian politician मधु लिमये यांची स्मृतिशताब्दी…!

1 Mins read

मुकेश बामणे

१ मे २०२२ रोजी दिवंगत संसदपटू Indian politician मधु लिमये यांची शंभरावी जयंती होती. मधु लिमयेंच्या पिढीनं स्वप्नवत वाटावं असं कार्य केलेलं होतं. लिमयेंच्या बाबतीत यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, Indian politician मधु लिमये आमच्याकडं हवे होते. पंडित नेहरुंच्या अखेरच्या काळात लिमयेंनी पोटनिवडणूकीद्वारे संसदेत प्रवेश केला होता. त्यांनी पंडित नेहरु, इंदिरा गांधी, शास्त्री, मोरारजी देसाई या प्रधानमंत्र्यांच्या कारकिर्दीत लोकसभा गाजवली होती.

Indian politician मधु लिमये हे केवळ व्यासंगी राजकारणी नव्हते तर, लोकमतांची कदर करणारे प्रामाणिक लोकप्रतिनिधीही होते. १९७६ साली प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी लोकसभेची पाच वर्षांची मुदत संपूनही लोकसभा विसर्जित न करता विशेष अधिवेशन बोलावून लोकसभेची मुदत एक वर्षांकरिता वाढविली होती. त्यावेळी लिमयेंनी सांगितलं होतं की, मला मतदारांनी पाच वर्षांकरिताच निवडून दिलंय. तेव्हा माझी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. मी माझ्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. एवढंच नव्हे तर पत्नीला फोन करून शासकीय निवासस्थान रिकामं करायला सांगितलं होतं. तेव्हा ते मुंबईत राहात होते. पत्नीनं घरातलं सारं सामान काढून रस्त्यावर आणून ठेवलं होतं. त्यावेळी तिथून एक पत्रकार जात होता, त्यानं हे सारं पाहून लिमयेंचं सामान आपल्या घरी नेलं आणि आपल्या पत्नीला सांगून चंपा लिमये यांना आश्रय दिला होता. एवढं करुन Indian politician मधु लिमये थांबले नाहीत तर खासदारकीचं पेन्शनही त्यांनी घेण्याचं नाकारलं होतं.

भारतात तो राजकीय आणीबाणीचा काळ होता. लिमये आपल्या खर्चासाठी वृत्तपत्रात लिखाण करीत असत. विशेषतः इंग्रजी वृत्तपत्रातून कारण तिथं कदर केली जात होती आणि मेहनतानाही बऱ्यापैकी मिळत होता. मधुजींच्या चाहते वर्गात सर्व पक्षीय खासदार होते. तसंच विदेशातलं अनेक राजनितीज्ञ त्यांच्या डिबेटिंगवर फिदा होते. लिमये राजकारणी, व्यासंगी विचारवंत होते. त्यांचा सारा वेळ वाचन आणि लिखाणात खर्च होत असे. राजकारण म्हणजे कुटील कारस्थानाचं लाक्षागृह असतं. पण लिमयेंचं सारं आयुष्य भारतीय राज्यघटनेचा रक्षक म्हणूनच देशासाठी समर्पित झालं होतं.

१९७७ साली जनता पक्षाची सत्ता केंद्रात आली होती. Indian politician लिमयेंनी मिळत असलेलं मंत्रीपद स्विकारलं नव्हतं. नानासाहेब गोरे त्यांना म्हणाले होते की, ‘मधु तुझा निर्णय मला पटला नाही. डॉ. राममनोहर लोहिया आणि तुझ्या विचारांची प्रत्यक्ष कार्यवाही करुन दाखविणं हेही एक आव्हान होतं. ते तू स्विकारायला हवं होतं!’

१९९० साली जनता दलाचं सरकार केंद्रात येण्याचे संकेत मिळू लागले; विश्वनाथ प्रतापसिंग हे लिमये यांचे मार्गदर्शन घेत होते. त्यांनी त्याकाळात मधुजींना गुरुच केलं होतं. फर्नांडिस, रवि रे, मधु दंडवते आदी नेते त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असत. देवीलाल,चंद्रशेखर हेही त्यांना भेटत होते. भेटीत जो काही सल्ला द्यायचे त्यांचे प्रत्यंतर पुढील एक-दोन दिवसात यायचं. फर्नांडिस हे रेल्वे खातं दिलं म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यांना मोठं खातं हवं होतं, त्यावर लिमयेंनी सल्ला दिला की, रेल्वे तर रेल्वे घे. आपल्या भागाची महत्त्वाची कामं पार पाड. सगळेजण तेच करतात. तू कोकण रेल्वे हाती घे यशस्वी हो. बॅरिस्टर नाथ पै नंतर तुझं नाव कोकणात घेतलं जाईल. जॉर्जनं सल्ला मानला मनापासून काम केलं आणि कोकण रेल्वेवर नाव कोरलं गेलं.

१९७१ साली Indian politician मधु लिमयेंना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांना सांगितलं होतं की, मधुच्या घरी महिना हजार रुपये पोचते करीत जा. तेव्हा गाडगीळ म्हणाले होते की, मधु मला कच्चा खाईल. पुढच्याच वर्षी लिमये एका पोटनिवडणुकीत विजयी होऊन लोकसभेत पोचले होते. कॉंग्रेसला माणसं खरेदी करण्याचा,नाद होता.

जनसंघीयांकडून त्यांच्यावर आरोप केला जात होता की, जनता सरकार पाडण्याला मधु लिमये जबाबदार होते. त्यावर ते म्हणाले होते की, ते सरकार आपल्याच गुणांनी पडलं होतं. त्यावेळी दुहेरी निष्ठेचा प्रश्न उपस्थित झाला नसता तरी ते पडणारच होते. जनता पक्षात राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निष्ठा ठेवायची हे चालू देता कामा नये एवढीच Indian politician लिमयेंची मागणी होती. हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा सगळ्यांच्या नाकावर टिच्चून सगळे बडे नेते संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात हजर होते. त्यांनी आपली छायाचित्रं वृत्तपत्रात प्रसिद्ध होतील, अशी व्यवस्था करवून घेतली होती. तिथंच जनता पक्षाचा शेवट व्हायचं निश्चित झालं होतं. एवढं होऊनही नानाजी देशमुखांपासून तर अडवानी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंतचे सगळे नेते लिमयेंशी व्यक्तिगत संबंध ठेवून होते. महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर अनेकदा हे नेते त्यांचा सल्लाही घेत होते.

अनेकांना धक्कादायक वाटेल पण ते कॉंग्रेसजनांनाही सल्ला द्यायचे. त्यांच्या अंगात लोकशाही मुरली होती, ती अशी. केंद्रात १९७७ साली जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हा गृहमंत्री चरणसिंग चौधरी होते. त्यांचा राजकीय आणीबाणीत इंदिरा गांधींनी जो उपमर्द केला होता. त्याबद्दल ते अतिशय चिडून होते. ते इंदिरा गांधींवर डूख धरुन होते. त्याचबरोबर जर १९७७ साली इंदिरा गांधी पुन्हा निवडून येऊन पंतप्रधान झाल्या असत्या तर जॉर्ज फर्नांडिस यांना फाशीची शिक्षाही होऊ शकली असती. कारण त्यांच्यावर देशाविरुद्ध युध्द पुकारल्याचा आरोप ठेऊन देशद्रोही म्हणून घोषित केलं असतं. म्हणून फर्नांडिसही इंदिरा गांधींच्यावर संतप्त झाले होते. तेही इंदिरा गांधीचा बदला घेण्याची संधी शोधत होते. आता तर ते केंद्रात मंत्री होते. त्यामुळं त्यांनी आणि गृहमंत्री चौधरी चरणसिंग यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना तुरुंगवास घडवायचाच असा ध्यास घेतला होता. दोघंही सूडानं पेटलेले होते. इंदिरा गांधी यांना याची कुणकुण लागताच त्यांनी मधु लिमयेंचा सल्ला घेतला होता. मधु लिमयेंनी त्यांना सांगितले की, देशाची माफी मागावी आणि प्रकरणावर पडदा टाकावा. इंदिरा गांधी या गोष्टीवर राजी झाल्या होत्या. त्यावर लिमयेंनी चौधरी चरणसिंग यांना प्रकरण मिटवून घेण्यास सांगितले होते. पण गृहमंत्री चौधरी चरणसिंगांच्या डोळ्यातून आग बाहेर पडत होती. ते सूडानं वेडे झाले होते. त्यांनी इंदिरा गांधींवर आरोपपत्र तयार करून त्यांना तुरुंगात पाठवलं होतं. पण आरोपपत्र इतकं कमकुवत आणि दुबळं होतं की, इंदिरा गांधींना न्यायालयानं जामीन देऊन मुक्त केलं होतं. देशभर बाईला अटक केली म्हणून सहानुभूतीची लहर निर्माण झाली होती. तिथंच इंदिरा गांधींचं राजकीय पुनर्वसन केलं गेलं. त्यानंतर बिहार राज्यातील बेलछी येथील अकरा दलित व्यक्तींच्या हत्याकांड प्रकरणी इंदिरा गांधी भर पावसात चिखलातून हत्तीवर बसून त्या गावात जाऊन पिडितांना भेटून सांत्वन केले होते. त्यामुळं इंदिरा गांधींना सहानुभूती आणि सरकार विरोधी जनक्षोभ उसळला होता. हे असे घडेल हे मधु लिमये जाणून होते. पण त्यांचा सल्ला मानला नव्हता.

इंदिरा गांधी राजकारणी म्हणून कठोर होत्या पण व्यक्ती म्हणून सुसंस्कृत होत्या. जयप्रकाश नारायण यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी पंतप्रधान इंदिरा गांधी उपस्थित होत्या. विधी आटोपून त्या पाटणा विमानतळावर वेटींग रुममध्ये संजय गांधी यांच्यासोबत बसून होत्या. त्याचवेळी Indian politician मधु लिमयेही अंत्यविधीला उपस्थित राहून पाटणा विमानतळावर आले होते. त्यांनी वेटींग रुममध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींची भेट घेतली आणि उभ्याउभ्याच बातचीत करीत होते. इंदिरा गांधी अस्वस्थ झाल्या आणि संजय गांधी यांना म्हणाल्या की, तुला एवढाही सेन्स नाही की, मोठी व्यक्ती आल्यानंतर उठून उभं राहावं त्यांना बसायला जागा द्यावी. हा किस्सा गुलाम नबी आझाद यांनी सांगितला होता.

लोकसभेतील त्यांच्या कार्याबद्दल इथं सांगणार नाही. कारण ते बहुसंख्य वाचक जाणतात. पण त्यांचा एक किस्सा इथं सांगायला हवा. ते लोकसभेत हिंदीतच बोलत असत. इंग्रजीचा वापर अजिबात करीत नसत. त्यांना संस्कृत चांगलं येत होतं, हे कोणालाच ठाऊक नव्हतं. विशेषतः मालविकाग्निमित्रम मधील श्लोक मुखोद्गत होते. लोकसभेत अश्लीलतेच्या कायद्यावर बोलताना त्यांनी, ‘पुराणमित्येव न साधु सर्वत्र’ म्हणजे जुने ते सर्व सोनेच नसते. या श्लोकाचा हवाला दिला होता. ते ऐकून सारी लोकसभा थक्क झाली होती. मधु लिमये संस्कृत श्लोक तालासुरात म्हणताहेत आणि अटलबिहारींसारखे अनेक खासदार त्यांना साथ देताहेत हे आगळे दृश्य त्या दिवशी लोकसभेत दिसले होते. प्रेस गॅलरीतही खळबळ उडाली होती. पीटीआय चा वार्ताहर धावत येऊन लिमयेंना श्लोकाचा अर्थ विचारत होता.

Indian politician मधु लिमये अपघातानं राजकीय क्षेत्रात उतरले होते. मधु लिमये म्हणतात की, मी फर्ग्युसन महाविद्यालयात असताना इतिहास आणि शासनव्यवस्था हे विषय शिकविण्यासाठी प्रा.एच.डी.केळावाला नावाचे पारशी प्राध्यापक होते. माझ्या आयुष्यात फार मोठं परिवर्तन घडवून आणण्यास ते कारणीभूत झाले होते. मधु लिमये कॉलेजमधील प्रत्येक उपक्रमात उत्साहानं भाग घेत असत. वादविवाद सभा, क्रिकेटचं मैदान, सगळीकडं त्यांचा संचार चालू होता. लिमयेंना प्रा.केळावाला यांनी,१९३५ च्या ‘फेडरेशन अॅक्ट’वर पेपर लिहायला सांगितलं होतं. त्या निमित्तानं लिमयेंचा घटनाशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर सखोल अभ्यासास प्रारंभ झाला होता. प्रांतिक स्वायत्तता आणि संघराज्य घटनेवर प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समजावून घेण्याच्या निमित्तानं अच्युतराव पटवर्धन, एसेम जोशी, नानासाहेब गोरे इ. मंडळींना भेटणं झालं होतं. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून लिमयेंमध्य राजकीय कुतूहल निर्माण झालं होतं. त्यानिमित्तानं बुध्दीला नवी चालना मिळाली होती. नवनव्या राजकीय नेत्यांचा जवळून परिचय झाला होता.

त्यांच्या मनातील त्याग, बलिदान, देशसेवा या भावनांना खतपाणी मिळालं होतं.

कॉलेजच्या फर्स्ट इयरच्या पहिल्या टर्ममध्ये डिबेटिंग कमेटीतर्फे श्री अच्युतराव पटवर्धनांचे ‘War on the horizon’ या विषयावर व्याख्यान झालं होतं. अच्युतरावांबद्दल तरुणांमध्ये फार आदर आणि कुतूहल होतं. कारण ते कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे वयाने सर्वात लहान सदस्य होते. त्यावेळच्या वर्किंग कमिटीचे स्थान आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळापेक्षा मानाचे होते. त्यामुळं त्यांचे निर्णय महत्त्वाचे आणि मोलाचे होते. साहजिकच अच्यतरावांच्या व्याख्यानाला तुफान गर्दी झाली होती. त्यांच्या विचार आणि विवेचनाचा लिमयेंवर विलक्षण परिणाम झाला होता. त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली होती. प्रा.केळावालांच्या प्रोत्साहनानं लिमयेंना विश्वेतिहासाच्या सखोल अभ्यासाची प्रेरणा मिळाली होती. लिमयेंनी डोळसपणे आणि जाणीवपूर्वक स्वातंत्र्य चळवळ आणि राजकारण यामध्ये उडी घेतली होती. लिमयेंना अभावितपणे राजकीय क्षेत्राकडं न्यायला प्रा.केळावाला कारणीभूत झाले होते, हे निःसंशय.

Indian politician मधु लिमये लिहितात की, राजकीय प्रबंधाच्या निमित्तानं पुढाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. १९३७ साली एसेम जोशी यांच्याशी भेट झाली होती. ते नारायण पेठेतील एका घरात तिसऱ्या मजल्यावर राहत होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाची मनावर सखोल छाप पडली होती. साधी राहणी, त्यागमय जीवन, चमकदार बुध्दीमत्ता,आकर्षक वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, सौजन्य, शुचिता आणि गरिबांच्या दुःखांना समजून घेण्याची वृत्ती या गुणांमुळं आकर्षित झालो होतो.
मधुजी लिहतात की,अच्युतराव पटवर्धन यांच्या ओजस्वी वक्तृवाचं आकर्षण होतं, पण त्यांच्याजवळ डॉ लोहियांसारखी अलौकिक प्रतिभा नव्हती. डॉ. लोहिया यांची बुध्दीमत्ता असामान्य आणि प्रतिभा नवनवोन्मेषशालिनी होती. Indian politician मधु लिमयेंना एसेम अभ्यास मंडळाला घेऊन गेले होते. ते नानासाहेब गोरे यांच्या घरी भरले होते. तेथे पां.वा.गाडगिळ बौद्धिक घेत होते. तेथेच बंडू गोरे यांची मैत्री झाली होती. एसेम जोशी अर्थशास्त्र आणि कम्युनिस्ट जाहिरनामा यांवर बौद्धिक घेत होते. कम्युनिस्ट आणि कॉंग्रेस सोशॅलिस्ट पार्टीत विद्यार्थी ओढून नेण्याची तीव्र चढाओढ सुरु होती. मधु लिमयेंना ओढण्याचा जोरदार प्रयत्न, कम्युनिस्ट आणि रॉयिस्ट करीत होते. पण बंडू गोरे,अण्णा साने, माधव लिमये, गंगाधर ओगले यांनी मधु लिमयेंना सोडलं नाही. विशेषतः बंडू गोरे Indian politician मधु लिमयेंना धाकट्या भावासारखं जपू लागला होता.
१९३८ साली मधु लिमयेंची ओळख मिनू मसानींशी झाली. लिमये लिहतात की, मसानी स्वभावानं तुटक आणि तुसड्या वृत्तीचे होते. पण अतिशय बुद्धिमान व्यवस्थित अभ्यासू होते. त्यांचं भाषण आणि लेखन तर्कशुद्ध, रेखीव होतं. त्यात फाफटपसारा नव्हता, की शब्दजंजाळ नव्हतं. अतिशय कार्यक्षम मनुष्य होता.
लिमये म्हणतात की, युसुफ मेहेरअलींजवळ जिव्हाळा होता ओलावा होता मित्र जोडण्याची कला होती. ते जगन् मित्र होते. त्याच काळात एसेम जोशी पुणे जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे चिटणीस होते. त्यांना पत्रव्यवहारात मधु लिमये मदत करीत होते. तेथेच केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांची, भेट झाली होती. केशवराव जेधेंनी पश्चिम महाराष्ट्रातील बहुजन समाजाला राष्ट्रीय आंदोलनात खेचण्याचं महान कार्य केलं होतं. अशी नोंद लिमयेंनी केली होती. त्याचबरोबर शंकरराव मोरे हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे आणि व्यासंगी विद्वान होते. असे सांगताना लिमये पुढे म्हणतात की, त्यांची जीभ फार तिखट होती. ते पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते, त्यांच्या गुणांचे चीज लोकांनी केलं नाही. शंकरराव मोरेंनी संसदीय कार्यपद्धतीवर (parliamentary procedure) पहिला ग्रंथ लिहिला होता. त्यांचा स्वभाव फटकळ होता, हांजीहांजी वृत्ती नसल्यानं त्यांचे लोकसभेच्या सभापतींशी कायम खटके उडत होते.

Indian politician मधु लिमयेंचे पहिले अधिकृत राजकीय पदार्पण १९३७ साली शनिवार वाड्यावरील जाहीर सभेतील पहिल्या जाहीर भाषणाने झाले होते. कॉंग्रेस सोशॅलिस्ट पार्टीने अंदमानातील राजबंद्यांच्या सुटकेसाठी ‘अॅंटिफेडरेशन डे’ साजरा केला होता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्यांदाच मधु लिमयेंचं नाव आणि भाषण वृतांत छापून आला होता. वडिलधाऱ्या पुढाऱ्यांनी मधु लिमयेंचं कौतुक केलं होतं. त्यामुळं मधु लिमयेंच्या आयुष्याचा सांधा बदलला होता. आणि मधु लिमये व्यासंगी राजकारणी झाले होते. त्यावेळी मधु लिमयेंचं वय होतं. सोळा वर्षांचं. मधु लिमये आणि साने गुरुजींची प्रत्यक्ष भेट १९४१ धुळ्यातील तुरुंगात झाली होती. गुरुजी तोपर्यंत समाजवादी बनलेले नव्हते. कम्युनिस्टांना गुरुजी कॉम्रेड वाटत होते. कारण त्यांना मार्क्सवादाचं आकर्षण होतं. तर कॉंग्रेस पक्षाला गुरुजी कॉंग्रेसचा गुलमोहर वाटत होता. गुरुजींना कम्युनिस्टांचं आकर्षण होतं. हे खरं होतं पण गुरुजी कम्युनिस्ट नव्हते. तुरुंग ही शाळा असते मधु लिमयेंच्या सानिध्यात,गुरुजी समाजवादी बनले होते.

म्हणून कम्युनिस्ट गट Indian politician मधु लिमयेंना अक्षरशः शिव्या घालत होता. तर कॉंग्रेस समाजवादी पक्ष मधु लिमयेंचं कौतुक करीत होता.
मधु लिमये सांगतात, की मी शिव्या देणाऱ्यांचा अपराधही केला नव्हता आणि कौतुक करणाऱ्यांसाठी पुण्यही केलं नव्हतं. गुरुजींचा स्वतःचा निर्णय होता. लिमये श्रेय घ्यायला तयार नव्हते, तर गुरुजी तुरुंगातून सुटेपर्यंत समाजवादी कसे बनले होते? गुरुजी तुरुंगातून बाहेर पडले ते समाजवादी बनूनच. डॉ. हर्डीकर, पंडित नेहरु, कॉंग्रेस समाजवादी पक्ष यांनी त्याच सुमारास सेवा दलाची स्थापना केली होती. गुरुजी आणि लिमये यांची जवळीक वाढली होती. गुरुजींना लिमयेंचा लळा लागला होता की, मधुजींना गुरुजींचा हे सांगणं कठीण असलं तरी ‘दो जिस्म है, मगर ईक जान है हम’ अशी अवस्था झाली होती. दोघंही एकमेकांच्या अंतकरणाला स्पर्श करीत होते. गुरुजींच्या अखेरच्या काळात लिमये त्यांच्या सोबतच दौऱ्यांवर जात असत. डॉ. लोहियांच्या एका उत्कृष्ट लेखाबद्दल मधु लिमये भरभरून बोलत होते. गुरुजींनी तो लेख वाचून भाषांतर करून साधनेत छापला देखील कदाचित त्यांना त्या लेखात आपल्या विचारांचं प्रतिबिंब गवसलं असेल. गुरुजींच्या श्रध्दांजली लेखात लिमये म्हणतात, ‘त्यांचे कार्य महान होते. वीस वर्षे त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला भूषविलं आणि समाजवादी चळवळीच्या भव्य परंपरेत मोलाची भर टाकली. सेवा, त्याग, प्रेमळपणा यांत त्यांची बरोबरी कोणी करु शकणार नाही!’

Indian politician मधु लिमयेंनी स्वतःला पूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले होते आणि महाविद्यालयीन शिक्षणाला रामराम ठोकला होता. त्याबद्दल लिमये म्हणतात, ‘अनेक लोक मला विचारतात, तुम्ही उच्च शिक्षण पूर्ण का केलं नाही?’ त्याचं उत्तर असं आहे की, मी कॉलेजमध्ये गेलो नसतो तरी माझं जीवन खुरटलं असतं. माझ्या व्यक्तीमत्वाची व जीवनाची हत्या झाली असती. कॉलेजच्या मनमोकळ्या वातावरणामुळं माझं व्यक्तिमत्त्व फुललं क्षितीजं विस्तारली. मन मुक्त झालं. माझ्या दृष्टीनं ते खरोखरच विश्वविद्यालय ठरलं. नंतरच्या दीड-दोन वर्षात या जीवनापासून जे काही मिळवायचे होते ते मिळवून झालं होतं आणि नव्या विश्वात प्रवेश करायला मी तयार झालो होतो. त्यामुळं मला कॉलेज सोडल्याचा कधीच पश्चात्ताप झाला नाही. तसं पाहीलं तर, मी जीवनभर विद्यार्थीच राहिलो. नित्य नव्या विषयाचा व्यासंग करीत मी मुमुक्षू साधकाच्या भावनेने अखंड ज्ञानसाधना करीतच राहिलो. माझ्या लेखी विश्वविद्यालयाच्या पदव्यांचे काहीच मूल्य राहीले नाही. कधी माझ्या मनात न्यूनगंडाची भावनाही डोकावली नाही. कॉलेज आणि विश्वविद्यालये जे जे देऊ शकत होते ते ते मी आत्मसात केले!’

‘मात्र मी कॉलेजमध्ये गेलो नसतो तर, मला ही संधी मिळाली नाही म्हणून, जन्मभर हळहळत राहिलो असतो. त्यानंतर पुढे शिकत राहून मी एम एस. पीएच डी. झालो असतो तरी माझ्यात फारशी भर पडली नसती. उलट कॉलेज सोडल्यावर पुढच्या काही वर्षांतजे ज्ञान, जे जीवंत अनुभव मी मिळवले ते अनमोल होते. ते कोणतेही महाविद्यालय,वा विद्यापीठ मला देऊ शकले नसते. विशाल जीवन हेच माझे खरे विद्यापीठ ठरले!’

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर Indian politician मधु लिमयेंना तीव्र दुःख झाले होते. त्यावेळी ते विदेशात होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता न मानणाऱ्यांचा समाचार घेताना लिमये म्हणतात, ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्यांचं योगदान शून्य आहे, राजकीय आणीबाणीत ज्यांनी शेकडो माफी पत्रे, राज्यकर्त्यांकडे पाठवून त्या लढ्याची तेजस्वी प्रतिमा मलिन केली त्यांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता या गुणविषेणाने का संबोधले याचे मर्म समजणार नाही. सुभाषबाबूंनी गांधीजींना राष्ट्रपिता संबोधताना भारतीय धार्मिक परंपरा आणि एकमेकांशी भांडणाऱ्या कर्मठ संस्कृतीच्या राज्याचे राष्ट्रपिता म्हणून पदवी प्रदान केली नव्हती. तर ज्या राष्ट्राची एकच राज्यघटना आणि एकच केंद्र सरकार आहे अशा आधुनिक भारत या राष्ट्राचे राष्ट्रपिता म्हणून नेताजींनी महात्मा गांधींना राष्ट्राच्या रास्त हक्काने संबोधले. आजच्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि फक्त महात्मा गांधीच असू शकतात. हा इतिहासाचा दाखला आहे.

१ मे २०२२ मधु लिमयेंची, जन्मशताब्दी होती, लिमयेंच्या सानिध्यात थोडे क्ष मिळाले होते. त्यांनी सहजगत्या खांद्यावर ठेवलेल्या हाताच्या पंज्याचा छाप अजूनही पुसला नाही. त्यावरील धुळाक्षरे अजूनही वाचतच आहे. म्हणूनच त्यांच्या आदरांजलीपर लिहू शकलो.

– मुकेश बामणे

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: