Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Ahirani Language बहिणाईची गाणी ’अहिराणी’तून ’तावडी’त

1 Mins read

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच संपलं. अधिवेशनाच्या अखेरीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील आपल्या भाषणातून सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना विंदा करंदीकर यांच्या ‘तेच ते, तेच ते’ या Marathi Song कवितेची दोन कडवी वाचून दाखवली.

त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या Marathi Song ‘कधी व्हशीन मानूस’ ह्या कवितेतल्या चार ओळी वाचून दाखवल्या.

ह्या दोन्ही कवितांच्या तपशिलासह ११ एप्रिल २०२२ च्या ’चित्रलेखा’चे ‘माकड छाप मानूस, सत्तेसाठी कानूस’ हे ‘आजकाल’ मी लिहिले. त्यात मुख्यमंत्र्यांप्रमाणेच मीही बहिणाबाईच्या कवितेचा Marathi Song उल्लेख ’अहिराणी’ Ahirani Language भाषेतील कविता असा केला.

हा ’चित्रलेखा’ प्रकाशित झाल्यावर दोनच दिवसांनी जळगावचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. प्रकाश सपकाळे यांचा ’व्हॉट्स अॅप मेसेज’ आला. ”बाहिणाईची गाणी ‘Ahirani Language अहिराणी’त नसून ती ‘खानदेशी- तावडी बोली’त आहेत!” प्रकाश सपकाळे हे शीघ्रकवी आहेत.

मराठी भाषा आणि त्यातल्या विविधतेचे संशोधन हा त्यांचा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे. ते शीघ्रकवी असले तरी एखाद्या विषयावर खंडकाव्य लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे.

ह्याच बळावर त्यांनी ‘स्वाध्याय’कार पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या बनेलपणाचा नेमक्या शब्दांत चिरफाड करणारा ‘दादागिरी’ हा काव्यसंग्रह लिहिला आहे. अलीकडेच त्यांचा ‘प्रबोधनकार : संत तुकाराम’ हा ग्रंथ प्रकाशित झालाय. त्यात तुकोबांचं चरित्र व प्रबोधन कार्य यांचं दर्शन होतं.

हाच त्यांचा ‘डॉक्टरेट’ मिळवून देणारा प्रबंध होता.’खोप्यामधी खोपा’ ही बहिणाबाईवरील चरित्र कादंबरी आणि ‘साहित्य अकादमी’ने प्रकाशित केलेल्या ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ ह्या ग्रंथ मालिकेतील ‘बहिणाबाई चौधरी’ यांची साहित्यिक ओळख करून देणारे पुस्तक लेखक; अशी प्रकाश सपकाळे यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.

त्यांची लेखणी मर्मभेदी आहे; तशीच गुणग्राही आहे. ‘तावडी माटी’ ह्या त्यांच्या काव्यसंग्रहामुळे ‘तावडी’ आणि Ahirani Language ‘अहिराणी’ बोलीतला फरक माझ्या लक्षात आला होता; पण लक्षात राहिला नव्हता.

Also Read : https://www.postboxindia.com/शरद-पवार-सामना-आता-निकराच/

पुस्तकं-पाठ्यपुस्तकातून बहिणाबाईंच्या Marathi Song कविता-गाण्याची ओळख करून देताना Ahirani Language ‘अहिराणी’ बोलीचा उल्लेख होत असल्याने मुख्यमंत्र्याप्रमाणे माझीही गफलत झाली.

प्रकाश सपकाळे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलल्यावर ‘तावडी-अहिराणी’ Ahirani Language तला फरक अधिक स्पष्ट झाला. जळगाव जिल्ह्याचे ‘बोली’भाषेनुसार ‘अहिराणपट्टी’ आणि ‘तावडपट्टी’ असे दोन भाग पडतात. जळगाव जिल्ह्याच्या पश्चिमेकडील म्हणजे नाशिककडील- चाळीसगाव, भडगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, चोपडा (‘पाचोरा’चा काही भाग) ह्या तालुक्यांच्या भागात ’अहिराणी’ बोली बोलली जाते. तर, जिल्ह्याच्या पूर्वेकडील म्हणजे बुलडाणाकडील – जळगाव शहर, पाचोरा, जामनेर, भुसावळ, यावल, बोदवड, रावेर, मुक्ताईनगर ह्या तालुक्यात आणि सोयगाव ( जिल्हा : औरंगाबाद ), मलकापूर, मोताळा (जिल्हा : बुलडाणा) व बर्‍हाणपूर (मध्य प्रदेश) परिसरात ‘तावडी’ बोली बोलली जाते.

तिलाच ‘खानदेशी’ बोली असेही म्हणतात.
बहिणाबाई चौधरी ह्यांचं ‘असोदा’ हे गाव जळगाव शहरापासून पाचेक किलोमीटरवर आहे. तिथे ‘तावडी’ बोलली जाते. तीच बहिणाबाईंच्या कविता-गाण्यात उतरलीय.

त्यांचा भावानुवाद प्रा. प्रकाश सपकाळे यांनी Ahirani Language ‘अहिराणी’ बोलीतही केलाय.

त्यानुसार –
मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस
लोभासाठी झाला, मानसाचा कानूस
ह्या ’तावडी’तील ओळी ’अहिराणी’त अशा होतात –
मानसा मानसा, कही व्हसीन मानूस
लोभासाठे झाया, मानूसना रे कानूस

ह्या दोन्ही बोलीभाषेतील फरक अधिक स्पष्ट करताना प्रा.सपकाळे सांगतात, ”मी धुळ्याला गेलो. हे वाक्य अहिराणीत ‘मी धुयाला गयथू’ असे होते. तर ‘तावडी’त ‘मी धुयाले गेल्तो’ असे होते.

” यातील Ahirani Language ‘अहिराणी’वर गुजराती आणि नाशिककडच्या बागलाणी व गुजरात कडच्या ‘भिल्ली बोली’भाषेचा काही भागात प्रभाव आहे. तर ‘तावडी’वर मध्य प्रदेशातील मेळघाटी-घाटोळी आणि वर्‍हाडी- मराठवाडी भाषेचा प्रभाव आहे. ‘अहिराणी’ व ‘तावडी’ ह्या बोली या परिसरात पूर्वापार बोलल्या जातात.

त्या या भागातील मूलनिवासी बहुजनांच्या बोली आहेत. यात बहुजन समाजातील सर्वच जाती येतात. याशिवाय, गुजरातेतून आलेल्या गुजर पाटील यांनी अहिराणी पट्ट्यात स्थिरावताना आपली ’गुजराऊ बोली’ घरापुरतीच ठेवली आणि Ahirani Language ‘अहिराणी’ स्वीकारली;

तर जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात गुजरातेतून येऊन स्थिरावलेल्या लेवा पाटीदारांनी ‘तावडी’ म्हणजे ‘खानदेशी’ बोलीला आपलीशी केली. हेच राजस्थानातून आलेल्या रजपूतांनी केले.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

प्रा. सपकाळे म्हणतात, ”इथल्या रजपूत पाटील, मराठा पाटील यांच्याप्रमाणे खानदेशात स्थिरावलेल्या लेवा पाटीदारांनीही आपली मूळबोली सोडून इथल्या बहुजनांची बोली स्वीकारली. परंतु, अलीकडे जाणीवपूर्वक ‘लेवा गणबोली’ असा शब्दप्रयोग वापरत आहेत. जी बोली रेडिमेड स्वीकारली आहे, तिला ‘लेवा गणबोली’ असा शिक्का मारण्याचे कारण काय? गाई-म्हशीचे दूध प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून त्यावर ‘विकासचे दूध’, ‘चितळेचे दूध’, ‘अमूलचे दूध’ असा शिक्का मारतात. तसा हा प्रकार आहे.”

खानदेशी-तावडी बोली भाषकांचे विभाजन टाळण्यासाठी प्रकाश सपकाळे नानाप्रकारे युक्तिवाद करतात. ”खानदेशी झालेल्या लेवा पाटीदारांनी ‘लेवा गणबोली’च्या आधारे स्वतंत्र बाणा दाखवू नये,” असा त्यांचा आग्रह आहे. बहिणाबाई चौधरी यांचा ‘बहिणाईची गाणी’ हा गाजलेला काव्यसंग्रह ‘खानदेशी-वर्‍हाडी’ बोलीत आहे,असं आचार्य प्र.के.अत्रे यांनी म्हटलंय. ते बहिणाई-पुत्र सोपानदेव चौधरी यांनाही मान्य होतं.

त्यांनी ”बहिणाईची गाणी ‘लेवा गणबोली’त आहेत,” असे म्हटलेलं नाही. इंग्रजी व भाषाविज्ञानाचे प्राध्यापक डॉ.भालचंद्र नेमाडे हे कुठेही ‘लेवा गणबोली’ असा शब्दप्रयोग करीत नाहीत. बोलीभाषेचा आग्रह हा प्रांतनिहाय असतो. त्यातून त्या प्रांताची ओळख होत असते. ती टिकून राहाण्यासाठी प्रा. प्रकाश सपकाळे बहिणाबाईंच्या काव्य परिचयाला Ahirani Language ‘अहिराणी’तून ‘तावडी’त आणत असतात.

बोलीभाषेवरील आक्रमण, त्यातील साहित्याची पळवापळवी, कलमीकरण ते रोखत असतात. त्यांचं हे कार्य ‘तावडी’ पुरतंच मर्यादित नाही. ते व्यापक आहे. त्यात मराठी भाषेच्या जतनाचा आणि विकासाचा अट्टहास आहे. ह्याच अट्टहासाने त्यांनी Ahirani Language ‘अहिराणी’ आणि ‘तावडी’तला फरक मला पुन्हा सांगितला.

चूक दाखवताना दुरुस्तीही करवून घेतली. मतभिन्नता राहाणार; पण माहितीत चूक नको, असा माझाही आग्रह असतो. तो मराठी भाषेइतकाच ‘बोली’ भाषांबाबतही आहे.

कारण, प्रकाश सपकाळे यांच्याच शब्दांत थोडा फेरफार करून सांगायचे तर –
अस्तित्वाचा शोध घेते, बोलीभाषा तत्त्वज्ञान
तत्त्वज्ञान कळू लागे, तेव्हा येते आत्मभान
हे आत्मभान कृतीत येणं, ही वर्तमानाची आत्यंतिक गरज आहे. कारण भाषा, प्रांत, धर्म, पंथ, जाती, आहार, पोषाख यांतील खुसपटं काढून सामाजिक सलोखा बिघडवून टाकणे, हा सत्ताधाऱ्यांचा ‘अखिल भारतीय’ कार्यक्रम झालाय.

ज्ञानेश महाराव

Leave a Reply

error: Content is protected !!