Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRA

How to Copyright Content – कॉपीराईट व पेटंट म्हणजे काय?

1 Mins read
  • How to Copyright Content - कॉपीराईट व पेटंट म्हणजे काय ?

How to Copyright Content – कॉपीराईट व पेटंट म्हणजे काय ?

How to Copyright Content – कॉपीराईट आणि पेटंट हे दोन्ही बौद्धिक संपत्तीचे प्रकार आहेत.

 

 

 

कॉपीराइटिंग – 

 

१. जेव्हा कोणी एखादे उत्पादन तयार करते जे खाली दिलेल्या गोष्टींपैकी असते, जे मूळ म्हणून पाहिले जाते आणि त्यास तयार करण्यासाठी बौद्धिक संपत्ती वापरावी लागते किंवा ती आवश्यक असते, तेव्हा हे उत्पादन बौद्धिक संपत्ती बनते ज्यास अनधिकृत डुप्लिकेशनपासून संरक्षित केले जाणे आवश्यक आहे.

२. बौद्धिक संपत्तीच्या उदाहरणांमध्ये संगणक सॉफ्टवेअर, कला, कविता, ग्राफिक डिझाईन्स, संगीत गीत आणि रचना, कादंबऱ्या, चित्रपट, मूळ वास्तू डिझाइन, वेबसाइट सामग्री इत्यादींवर आपण कायदेशीर हक्क याद्वारे घेऊ शकतो.

३. कॉपीराइट बौद्धिक मालमत्तेच्या मालकाचा कायदेशीर अधिकाराचा/ हक्काचा संदर्भ देते. सोप्या शब्दांत, कॉपीराइट हा कॉपी करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा आहे की उत्पादनांचे मूळ निर्माते आणि ज्याला त्यांनी अधिकृतता दिली आहे केवळ तेच काम पुनरुत्पादित करू शकतात.

४. कॉपीराइट कायदा ज्याला आपण कॉपीराइट ऍक्ट १९५७ म्हणतो त्या नुसार, मूळ सामग्रीच्या निर्मात्यांना हा कायदा पुढील वेळी वापरण्याचा आणि त्या वेळेस काही प्रमाणात डुप्लिकेट बनविण्याचा अधिकार देतो आणि तोसुद्धा काही मर्यादित काळासाठी.

५. हा कायदा इतर कोणासही आपली कॉपीराइट घेतलेली संपत्ती वापरण्यापासून किंवा कॉपी करण्यापासून प्रतिबंधित करते व त्यावर मूळ मालकाला त्याचा हक्क देऊन आर्थिक उपभोग मिळवून देतो.

६. भारतीय कॉपीराइट ऍक्ट १९५७ नुसार एक पेक्षा जास्त जण जर त्या बौद्धिक संपत्तीचे मालक असतील म्हणजेच ते त्यांनी दोघांनी मिळून समान काम केले असेल तर त्यावर त्यांना जॉईंट ऑथोरशिप मिळते जेणेकरून ते दोघे जण त्या कॉपीराइट घेतलेल्या बौद्धिक संपत्तीचा उपभोग घेऊ शकतात.

७. कॉपीराइट हक्काची मर्यादा मूळ मालकाच्या मृत्यूनंतर ६० वर्षापर्यंत असते म्हणजेच, त्याच्या जन्मभर तो त्या बौद्धिक संपत्तीवर आर्थिक उपभोग घेईलच शिवाय त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा ६० वर्षानंतर त्या बौद्धिक संपत्तीचे हक्क त्याच्याकडेच असतील व ६० वर्षानंतर ती संपत्ती सगळ्यांसाठी खुली करण्यात येईल.

८. भारतीय कॉपीराइट ऑफिस दिल्ली येथे आहे.

 

पेटंट म्हणजे काय?

 

पेटंट हा एक बौद्धिक मालमत्तेचा हक्क आहे जो इतरांना आपले संशोधन वापरण्यापासून म्हणजेच विकणे, बनवणे यापासून परावलंबित करते.
बुद्धिसंपदेचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी एक म्हणजे पेटंट. पेटंट नावावर करणे म्हणजे जी गोष्ट आपण आपल्या बुद्धीचातूर्यावर मिळवली आहे, त्या मालकाने त्यावर हक्क मिळवणे, उदा. एखादे नवीन उपकरण, एखाद्या रोगावर नवीन औषध, इत्यादी.
कसल्या गोष्टींचे पेटंट घेतले जाऊ शकते?

त्यामध्ये खाली दिलेल्या गोष्टी आल्या पाहिजेत तरच त्याला पेटंट म्हणून मान्यता मिळते.

नावीन्य

ती बौद्धिक संपत्ती पेटंटेबल मॅटर आहे कि नाही.

याचा काही औद्योगिक उपयोग होतो कि नाही.

शोधपूर्ण आहे कि नाही.

ती गोष्ट स्पष्ट नसलेली हवी, म्हणजेच ती गोष्ट कॉमन सेन्स मधून आलेली नको.

उदाहरणार्थ – एक प्रक्रिया किंवा पद्धत, एखादी मशीन, नवीन औषध किंवा त्याची नवीन रचना, नवीन उपकरण, संगणकाशी निगडित काही नवीन, इलेक्ट्रिक सर्किट, यादी मोठी आहे, यांचे आपण पेटंट घेऊ शकतो.
कशाचे पेटंट घेतले जाऊ शकत नाही ?

वैज्ञानिक सिद्धांत किंवा गणिताची पद्धत.

सौंदर्यनिर्मिती, एखादी योजना.

एखादी मानसिक कृती करण्यासाठी एखादी खेळ.

व्यवसाय.

किंवा एखादा संगणक प्रोग्राम.

माहितीचे सादरीकरण.

शल्यक्रिया किंवा रोगनिवारणविषयक उपचार किंवा निदानाची प्रक्रिया मानवांवर किंवा प्राण्यांवर करता येणाऱ्या चाचण्या,
जैव तंत्रज्ञानात मानवी क्लोनिंगच्या पद्धती इत्यादी.

जेव्हा कुणी पेटंट च्या मालकाच्या परवानगी विना ती वस्तू वापरतो, बनवतो आणि विकतो तेव्हा या कायद्याचे उल्लंघन होते त्याला आपण पेटन्ट इंफ्रिजमेन्ट असे म्हणतो.

भारतीय पेटंट १९७० कायद्यानुसार पेटंट ची मर्यादा २० वर्षासाठी पेटंट च्या मालकाला बहाल केली जाते, आणि त्यानंतर ते सर्वांसाठी खुले केले जाते.

भारतामध्ये ४ पेटंट ऑफिस आहेत त्यापैकी हेड ऑफिस कलकत्ता येथे आहे तर उर्वरित ३ चेन्नई, मुंबई आणि दिल्ली येथे आहेत. आपण आपले संशोधन जर पेटंटेबल असेल तर वरीलपैकी कोणत्याही ऑफिस येथे त्याला रजिस्टर करू शकतो.

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!